Sunday 17 February 2013

कारगिलचे दुस्साहस आणि त्या मागची फौजी चांडाळ-चौकडी



कारगिलचे दुस्साहस आणि त्या मागची फौजी चांडाळ-चौकडी

-
मूळ लेखक: खलीक कियानी, अनुवाद सुधीर काळे, जकार्ता

कारगिलच्या दुस्साहसात पाकिस्तानचा वाजलेला बोर्‍या ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेले जाणते लोक जरी त्याबद्दलची गुपिते सतत सांगत आले असले तरी सेवानिवृत्तीपूर्वी पाकिस्तानी लष्करात “चीफ ऑफ जनरल स्टाफ” ही जागा भूषविलेले ले. ज. शाहिद अजीज (या पुढे त्यांचा उल्लेख ’अजीज असाच केलेला आहे) यांनी मात्र १९९९ सालच्या उन्हाळ्यात त्यांनी पाहिलेल्या रहस्यांबद्दल चुप्पी साधली होती. पण “हे दुस्साहस जनरल्सच्या चांडाळ-चौकडीने केलेले होते आणि या दुस्साहसाबद्दलचा तपशील सुरुवातीला लष्कराच्या इतर सेनानींपासूनसुद्धा लपवून ठेवलेला होता असे त्यांनी अलीकडेच उघड केले.
पाकिस्तानी सेनादलातील एकाद्या वरिष्ठ सेनानीने कारगिलच्या दुस्साहसातील फजीतवाड्याबद्दल इतक्या तपशिलात जाऊन आणि इतके मोकळेपणाने माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अजीज यांच्या माहितीनुसार सुरुवातीला कारगिलच्या चढाईबद्दलची माहिती फक्त सरसेनानी ज. मुशर्रफ, तत्कालीन चीफ ऑफ जनरल स्टाफ ले. ज. महंमद अजीज, FCNA चे सेनानी ले. ज. जावेद हसन आणि १०व्या सेनापथकाचे सेनानी[१] ले. ज. महमूद अहमद यांनाच होती.

अजीज म्हणतात कीं बहुतांश सेनापथकांच्या सेनानींना आणि प्रधान मुख्य अधिकार्‍यांना[१] या कारवाईबद्दल पूर्णपणे अंध:कारात ठेवण्यात आलेले होते. ते म्हणतात कीं ले. ज. तौकीर झिया यांच्यासारख्या तत्कालीन डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सच्या या हुद्द्यावरील ज्येष्ठ अधिकार्‍यालासुद्धा या कारवाईबद्दलची माहिती नंतरच मिळाली. ले. ज. अजीज स्वत: त्यावेळी ISI च्या analysis wing चे director general होते. त्यांनाही याबद्दलची माहिती नंतरच मिळाली.

ज. मुशर्रफ यांनी आपल्या सरसेनापतित्वाच्या आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत "गरज असेल त्यालाच माहिती मिळेल" या धोरणानुसार काम केले. म्हणजेच एकाद्या हुकुमाची अंमलबजावणीत ज्या अधिकार्‍यांचा संबंध असे त्या अधिकार्‍यालाच मुशर्रफ आज्ञा देत असत. आधी आपल्या सेनापथकाच्या सेनानींशी आणि इतर लष्करी अधिकार्‍यांशी विचारविनिमय करून मग आज्ञा देण्याची त्यांची धोरण नव्हते असे त्यांनी सांगितले.
कारगिलच्या चढाईची सुरुवात १९९९च्या उन्हाळ्यात झाली आणि पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले व त्यांनी भारताच्या बाजूच्या कांही महत्वाच्या जागा काबीज केल्या. याचा परिणाम भारताच्या रसदीच्या नाड्या आखडल्या जाण्यात झाला.  अचानक झालेल्या या घटनेमुळे भारताला विस्मयाचा एक धक्काच बसला.

सुरुवातीला पाकिस्तानने "हे आमचे सैनिक नसून स्वातंत्र्यसैनिक आहेत" अशी मखलाशी केली होती पण ते फार वेळ या मुखवट्याआड लपू शकले नाहींत. शेवटी भारताचा प्रतिहल्ला आणि आंतरराष्ट्रीय दबाव या दुहेरी भडिमारामुळे पाकिस्तानला आपले लष्कर मागे घेणे भाग पडले!

पण या दुस्साहसाचा परिणाम म्हणून मुशर्रफ आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यातील परस्परसंबंधांत तणाव आला व लोकनियुक्त पंतप्रधान शरीफ यांना ऑक्टोबरमध्ये पदच्युत करून लष्कराने सत्ता हाती घेण्यात त्याचा शेवट झाला.

कारगिलच्या चढाईत नियोजनाचा अभाव
मुशर्रफ यांना कारगिलची चढाई ही एक मोठी व बराच वेळ चालणारी मोहीम असेल असे वाटलेच नाहीं व कदाचित् त्यामुळे या मोहिमेचे पाकिस्तानी लष्कराने नीट नियोजनच केले नव्हते. अजीज म्हणतात कीं फक्त FCNA (आणि कदाचित १०वे सेनापथक) यांनाच या मोहिमेशी संलग्न केले गेले होते त्यामुळे ही मोहीम भारताच्या गुप्तहेरखात्याच्या दृष्टीने एक मोठे अपयशच ठरली.

या चढाईबद्दलच्या चर्चेला उत्तर देताना "ही एक चुकीच्या आडख्यावर आधारलेली मोहीम होती, या मोहिमेची उद्दिष्टें स्पष्ट नव्हती आणि या मोहिमेच्या दूरगामी परिणामांचेही नीटपणे मूल्यमापन केले गेले नव्हते" असेही अजीज म्हणतात.

इस्लामाबाद पासून ३० किमीवर असलेल्या आपल्या निसर्गरम्य फार्महाऊसमध्ये अजीज यांच्याशी लेखक कियानींचा वार्ताविलाप चाललेला होता आणि या मोहिमेबद्दल अजीज मोकळेपणाने बोलत होते.

"या मोहिमेची उद्दिष्टें आणि परिणाम आपल्याच लोकांपासून व राष्ट्रापासून लपवावे लागले, या मोहिमेला कुठलेही सुस्पष्ट उद्दिष्ट नव्हते, तिचे नीट नियोजन केले गेले नव्हते आणि आजही त्यात किती सैनिक धारातीर्थी पडले याबाबत पक्की माहिती कुणालाच नाहीं अशा अनेक कारणांमुळे या मोहिमेच्या बोर्‍या वाजला. " असेही ते म्हणतात.

या मोहिमेची नेमकी कोणती आणि किती माहिती शरीफ यांना दिली होती याबद्दल स्वत: अजीजना नक्की माहिती नाहीं पण त्यांना परिपूर्ण माहिती नक्कीच नव्हती असे त्यांचे मत आहे.

पण एका सनाधिकार्‍यांबरोबरच्या अनौपचारिक बैठकीत "तुम्ही आम्हाला काश्मीर कधी देयाय्?" असा प्रश्न नवाज शरीफ यांनी विचारल्याचे अजीजना एका जनरलच्या हुद्द्यावरील अधिकार्‍याने सांगितले होते. त्यावरून या मोहिमेबद्दल शरीफसाहेब कमीत कमी पूर्णपणे अंधारात तरी नसावेत असे अजीजना वाटते[२].

त्यांना भारतीय सैन्याच्या आपसांतील चाललेल्या (आणि त्यांनी चोरून ऐकलेल्या) बिनतारी संदेशांमुळे भारतीय सैनिकांची तारांबळ उडविण्याजोगे कांहींतरी घडते आहे असा अंदाज आला व त्यावरून या मोहिमेची माहिती कळली.

या चोरून ऐकलेल्या संदशांमुळे भारतीय सैनिकांची घडी विस्कटवणारे कांहीं तरी घडते आहे याचा त्यांना अंदाज आला व त्याची आपल्याला माहिती कशी नाहीं याचे त्यांना आश्चर्य आणि चिंता वाटली (अजीज त्यावेळी ISIचे च्या analysis wing चे director general होते)! म्हणून तिथे काय चालले आहे हे शोधण्यासाठी त्यांनी आपले दोन अधिकारी तिथे पाठविले. तेंव्हां कुठे त्यांना कळले कीं कारगिल-ड्रास विभागातील (sector) कांहीं भाग पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असल्याचे भारतीय सैनिकांना कळल्यामुळे ही तारांबळ उडाली आहे. पण त्यांना हे कळत नव्हते कीं ते स्वातंत्र्यसेनानी आहेत कीं पाकिस्तानी सैनिक आहेत. मग अजीज यांनी या चोरून ऐकलेल्या संभाषणाच्या ध्वनीफीती ISIचे तत्कालीन डायरेक्टर जनरल ले. ज. झियाउद्दीन बट्ट यांच्याकडे नेल्या आणि त्यांच्याकडे त्याबद्दल चौकशी केली.

तेंव्हां कुठे अजीजना ज. बट्ट यांच्याकडून कळले कीं पाकिस्तानी लष्कराने कारगिल विभागातील भारताच्या ठाण्यांवर कबजा केलेला आहे.
हे जे घडले ते योग्य नव्हते असेच अजीज यांना वाटले. त्यांच्या मते या प्रस्तावित मोहिमेबद्दल त्यांना आगाऊ माहिती द्यायला हवी होती कारण मग ते पाकिस्तानी लष्कराला वेळेवर त्यांचे विश्लेषण किंवा मीमांसा देऊ शकले असते.

याच्या पुढच्याच दिवशी बट्टसाहेबांनी अजीजना बोलावून त्यांना लष्कराच्या मुख्यालयात कारगिलबद्दलच्या मार्गदर्शनाच्या बैठकीत बोलावल्याचे सांगितले.

शेवटी निदेशनासाठी बैठक बोलावली गेली
या बैठकीला सर्व प्रमुख अधिकारी हजर होते व त्यांना डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) ले. ज. तौकीर झिया यांनी NLI[३] आणि पाकिस्तानी सैनिकांनी ड्रास-कारगिल विभागातील कांहीं ठाणी काबीज केल्याबद्दलची माहिती दिली.

हे निदेशनपर स्पष्टीकरण जरी स्वत: DGMO असलेले तौकीर झिया यांनी देले असले तरी त्यांनासुद्धा या मोहिमेची सुरुवातीपासून माहिती नव्हती असाच समज अजीज यांचा झाला.

वरील बैठकीच्या दुसर्‍या दिवशी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत प्रथमच कारगिल संघर्षाबद्दल वृत्ते आली. गमतीची गोष्त अशी कीं भारतीय प्रसारमाध्यमांत या युद्धाच्या बातम्या त्या आधीच एक दिवस आल्या होत्या. याचाच अर्थ असा कीं अशा गंभीर आणि महत्वाच्या मोहिमेची माहिती लष्करी नेतृत्वालासुद्धा ती मोहीम सुरू झाल्यानंतरच देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही माहिती ठिबकत-ठिबकत प्रसारमाध्यमांपर्यंत पोचली होती.

या बैठकीत श्रीनगर-ड्रास-कारगिल-लेह या मार्गावरील "झोजीला खिंड" बंद करणे आणि परिणामत: भारताचे सियाचेनला रसद पुरविणारे मार्ग बंद करणे, सियाचेनपर्यंत होणारी भारताच्या सैनिकांची ये-जा थांबविणे व असे करून भारताला सियाचेनमधून माघार घ्यायला भाग पाडणे ही या मोहिमेची उद्दिष्टें होती असे तौकीर झिया यांनी सांगितले. पण असे झाले नाहीं हे आता जगजाहीर आहे! भारताने केलेल्या निकराच्या आणि कडव्या प्रतिकाराबद्दलचे आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत जे पडसाद उमटले त्याबद्दलचे पाकिस्तानी सेनानींचे अंदाज साफ चुकले हीच कारगिलच्या पराभवाची प्रमुख कारणे होती असे मत ज. झियांनी वर्तवले!

पश्तून भाषेतील पूर्वध्वनिमुद्रित संदेशाचे बिनतारी मार्गाने प्रसारण करून ते भारतीय सैन्याला ऐकवण्याच्या आणि त्याद्वारे त्यांच्यात गोंधळ माजवायच्या  योजनांबद्दलही माहिती ज. झियांनी या बैठकीत सांगितली. या संदेशांद्वारे कारगिलची ठाणी पाकिस्तानी स्वातंत्र्यसैनिकांनी काबीज केलेली नसून अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेली आहेत असा गैरसमज पसरविण्याचा पाकिस्तानचा हेतू होता असेही त्यांनी सांगितले. पण या योजनेला अजीज यांनी विरोध केला कारण हे मनसुबे फारच सहज उघडकीला येतील असे त्यांना वाटले. यावर खूप सखोल चर्चा झाली व शेवटी सत्य परिस्थिती फार काळ लपविता येणार नाहीं या मताशी ज. झिया सहमत झाले.

मागे वळून पहाता आजही “NLIच्या[३] सेनापथकाचे सैनिक जरी कारगिलच्या मोहिमेवर पाठविले गेले असले तरी या चढाईला निमलष्करी सैनिकांनी केलेली कारवाई असे संबोधणे चुकीचेच ठरेल कारण NLI चे सेनापथक लष्कराच्या हुकमतीखालीच आहे” असेच अजीज मानतात. (या उलट “पाकिस्तानी रेंजर्स”चे सेनाप्रमुख जरी लष्करातून आलेले असले तरी ते सेनापथक गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.)

या पराजयाचे कधीच न झालेले अन्वेषण!
ही मोहीम पण ज. अजीज यांच्या वैयक्तिक पातळीवर जरी आटोपली असली तरी हा विषय त्यांच्या मनातून निघून गेलेला नाहीं.
त्यांची chief of general staff  म्हणून पदोन्नती झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकबळ आणि पैसा यांचे जे नुकसान झाले ते कुठल्या चुकीच्या अंदाजांमुळे  हे शोधून काढण्यासाठी २००४ साली त्यांनी एक छोटे अन्वेषण करण्याचा हुकूम दिला. प्रत्येक संबंधित बटालियनलाही त्यांनी तपशील देण्याचा हुकूम दिला.

पण मुशर्रफ यांनी या अन्वषणाविरुद्ध तात्काळ आणि खूप तीव्र प्रतिक्रिया दिली!
संतापलेल्या ज. मुशर्रफनी ् अजीजना फोन केला आणि या अन्वेषणामागचा उद्देश काय आहे याची पृच्छा केली.अजीजनी उत्तर दिले कीं अशा अभ्यासातून आपण केलेल्या चुकांबद्दलचे  आणि पराजयाबद्दलचे एक व्यावसायिक स्वरूपाचे कारण समजेल. पण ज. मुशर्रफ यांनी असा अभ्यास करायची ही वेळ योग्य नाहीं असे सांगून ते अन्वषण जबरदस्तीने बंद करविले!

अनुवादकाचे दोन शब्द: आधीसुद्धा बर्‍याचदा उल्लेखल्याप्रमाणे भारत-पाकिस्तानात युद्धसदृश परिस्थिती सातत्याने चालू ठेवण्यात फक्त एका संस्थेला स्वारस्य आहे आणि ती संस्था म्हणजे पाकिस्तानी लष्कर. पाकिस्तानी लष्कराने अद्याप एकही युद्ध जिंकलेले नाहीं पण आपल्या Public Relations द्वारा ते आपला रुबाब मात्र चांगलाच राखून आहे. प्रत्येक युद्ध हरलेल्या या संस्थेबद्दल पाकिस्तानी वृत्तपत्रांत वाचकांच्या प्रतिसादातील अर्ध्या प्रतिसादांत या लषराचा उल्लेख आजही "पाकिस्तानचा एकुलता एक तारणहार" असा केला गेलेला मी वाचला आहे. ती त्यांची लायकी नसली तरी ते रुबाब बाळगून आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यास हा रुबाब तर पार नाहींसा होईलच पण या संस्थेचे महत्वही शून्यावर येईल. शिवाय सैनिकांच्या संख्येत आणि लष्करी सामुग्रीच्या खरेदीत खूप कपात होईल व त्याचा परिणाम लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या "ऊपरकी कमाई"वर होईल. असे होऊ नये म्हणून लष्करातील वरिष्ठ अधिकारी शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाना खीळ घालते. म्हणूनच अचानक कारगिल युद्ध होते, अचानक २६/११ चा अतिरेकी हल्ला होतो, अचानक नियंत्रण रेषेवर आपल्या जवानांच्या देहाची विटंबना केली जाते. या सार्या घटना अतीशय योजनाबद्ध पद्धतीने आखल्या जातात व त्यांवर अंमलही केला जातो. म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेवून भारताने पाकिस्तानी मुलकी सरकारला वार्‍यावर न सोडता "आपल्या लष्करावरचा लगाम जोरदारपणे कसून धरा" असा सल्ला देत त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टेकू दिला पाहिजे असे मला वाटते.


हा लेख सर्वप्रथम "डॉन" या वृत्तपत्रात २९ जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित झाला. दुवा आहे:
http://dawn.com/2013/01/29/kargil-adventure-was-four-man-show-general/
टिपा:
 [१] FCNA म्हणजे Force Command Northern Areas आणि Corps Commander, Principal Staff Officers
[२] एकाद्या हलक्या-फुलक्या आणि अनौपचारिक बैठकीतील चर्चेच्या आधारे असे विधान करणे म्हणजे "नरो वा कुंजरो वा" जातीचेच विधान वाटते.
[३] Northern Light Infantry
या लेखाला सकाळच्या वाचकांकडून आलेल्या प्रतिक्रिया:
============
Sudhir Kale - शनिवार, 27 एप्रिल 2013 - 07:26 PM IST
Dear Mr Pankaj, I didn't understand what you wish to say and to whom! 
============
Pankaj - रविवार, 14 एप्रिल 2013 - 04:47 AM IST
Me dull. You smart. That's just what I nedeed. 
============
सुधीर काळे - सोमवार, 18 मार्च 2013 - 05:43 PM IST
अनेक घटना घडल्या ज्याला तर्कशुद्ध उत्तरच नाहीं. पाकिस्तानचे पंतप्रधान इथे "खासगी" कारणासाठी आले. एका दर्ग्याला भेट द्यायला,म्हणून त्यांना दहशतवादाच्या विषयावरील अनेक विचारण्यात आले नाहींत. भेट खासगी होती मग सलमान खुर्शीद कशाला त्यांना जेवू घालायला आले? खासगी भेट असेल तर सगळा स्वागत समारंभ कशाला आणि जर खासगी नसेल तर अवघड प्रश्न कां नाहीं विचारायचे? सगळाच आतबट्ट्याचा व्यवहार! 
============
सुधीर काळे - रविवार, 17 मार्च 2013 - 05:55 PM IST
विजय-जी, या बाबतीत आपले १०० टक्के एकमत आहे. मला आता नरेंद्र मोदी हा एकाच आशेचा किरण दिसतो आहे., १२ ता, पासून आजपर्यंत मी इस्पितळात होतो. आजच बाहेर आलो आहे.. एक-दोन दिवसात जरा सविस्तरपणे लिहीन. 
============
विजय - शनिवार, 16 मार्च 2013 - 07:00 PM IST
काळेसाहेब, दुर्दैवाने आपल्या राजकीय नेत्यात काहीही धमक नाही. १९९३ पासून भरत दहशतवादी हल्ले सुरु आहेत निरपराधी लोक मरतायत आणि आपल्याला त्याचे काही सोयर सुतक नाही. कुणीही येत आणि आपल्याला जोडे मारून निघून जात. इथ दोन शिपुर्डे निघून जातात अंड सरकार इटली चा काहीही वाकड करू शकत नाही. पाकिस्तानशी मुत्सदी गिरी करायला कॉंग्रेस आणि भाजप मध्ये कोणीही दिसत नाही. 
============
Sudhir Kale - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:53 AM IST
Dear Mr Deshpande, if I get an opportunity to visit Pakistan, I am reasonably sure to grab the opportunity. What is this talk of "spoiling of the passport"? If going to Pakistan will cast shadow on my otherwise upright career, then so be it! 
============
Sudhir Kale - सोमवार, 11 मार्च 2013 - 11:50 AM IST
If I get an opportunity to visit Pakistan, I am reasonably sure to grab the opportunity. What is this talk of "spoiling of the passport"? If going to Pakistan will cast shadow on my otherwise upright career, then so be it! 
============
Sudhir Kale - शनिवार, 9 मार्च 2013 - 06:59 AM IST
विजय-जी, आपले स्वत:चेच वाचन खूप प्रगल्भ आहे हे आपल्या अभ्यासू प्रतिसदांवरून लक्षात येतेच. मग असे असताना मला सल्ला देण्यां ऐवजी आपण स्वत:च लेखणी हातात कां घेत नाहीं? मला तर तुमच्यात एका सुप्त लेखक स्पष्ट दिसतो! तुमच्या प्रतिसादांची मला खूपच चाहत आहे, ते देतच रहा! पण स्वतःसाठीही लेखणी उचला! 
============
A Ra Deshpande - शनिवार, 9 मार्च 2013 - 03:06 AM IST
काळेजी पाकिस्तानी म्हणजे पिसाळलेली कुत्री आहेत, उभ्या pakistanche जे दोन तुकडे bharatane kele ते hya janmaat tari ते visarane shakya नाही, मग तो तिथला सामान्य माणूस असो किंवा नेता किंवा सैनिक. ते लोक वर वर गोड बोलतात किंवा खरेच असतात सुधा पण त्यांच्या त्या जखमा ओल्या केल्या कि ते पिसालातात. तुम्ही तिथून एक दोन लेखकांशी बोलत असाल किंवा जास्तीत जास्त राजकीय दृष्ट्या उदासीन असलेल्यांशी पण मी कराचीच पूर्ण ऑफिस Singapore मधून तीन वर्ष हातालात होतो. एक गोष्ट ठरवली होती कि आयुष्यात कधी पाकिस्तान पाय ठेवायचा नाही आणि पासपोर्ट सुधा खराब करून घ्यायचा नाही त्यामुळे अनेक वेळा संधी मिळून सुधा कधी गेलो नाही आणि जाणार नाही. भारत आणि पाकिस्तान हे एका नदीचे दोन किनारे आहेत जे कधीच इकात्र येवू शकणार नाही आणि त्याबद्दल कुणालाच खेद नसावा. ह्या परिस्थितीला जास्त करून पाकिस्तान जबाबदार आहे. 
============
prasadd - शुक्रवार, 8 मार्च 2013 - 05:59 PM IST
सुधीरजी, सुंदर लेख. ज्ञानात भर पडली. तुमच्या मनातील पाकी जनतेच्या वागणुकी बद्दलचे कुतूहल मलाही आहे ; पण मला वाटते त्यांचे हे दिखाऊ प्रेम असावे, अन्यथा पाकिस्तानात हिंदूंचे हाल व्हायचे काहीच कारण नव्हते. आपण एकवेळ असे गृहीत धरू शकतो कि भारतातील अतिरेकी हल्ले पाक कडून होतात किंवा भारतातील अतिरेक्यांना पाक लष्कर प्रशिक्षण व पाठींबा देते, पण मग प्रत्यक्ष पाकिस्तानात हिंदूनवर जे अत्याचार झाले व होत आहेत ते सर्व काही पाक लष्कर करत नाही. हे अत्याचार तर तिथले जिहादने पेटलेले मौलवी व सामान्य पाक नागरिकच करतात. फाळणी पूर्वी पाकमध्ये २२% हिंदू होते पण आज मात्र केवळ १.५ ते २%. कुठे गेले हे सगळे हिंदू? कधी जाब विचारला भारत सरकारने?विषयांतर होवू न देता, असे सांगावेसे वाटते कि आपण जेंव्हा अधिकृतपणे अथवा पाहुणे म्हणून त्यांना एखादी गोष्ट विचारतो तेंव्हा ते प्रचंड आदरातिथ्य दाखवितात व आपण त्यांना ओळखण्यात चुकतो. आजवर अनेक भारतीय मेणबत्त्या घेऊन सीमारेषेवर गेले, परंतु काय परिणाम झाला हे आपण बघतोच आहोत. पाकिस्तानी अतिशय धूर्त आहेत व आपण मात्र झोपलेलो आहोत.
============
विजय - बुधवार, 6 मार्च 2013 - 05:38 PM IST
काळेसाहेब; आता जरा मोठ्या वर्तुळात प्रवेश करावा अस माझ मत आहे. जर चीन, अमेरिका, युरोप इत्यादींचा पंक्तीत बसू या . पाकिस्तान एक थर्डक्लास राष्ट्र आहे, आणि काहीही केल तरी सुधारणा अशक्य आहे. अर्थात भारता करिता पाकिस्तान nuisance value आहे , म्हणून दोन चार भाकर तुकडे त्यांचा तोंडावर फेका. After all they have never been, neither are, nor will be our equals. 
============
Sudhir Kale - शुक्रवार, 1 मार्च 2013 - 09:44 AM IST
सायली, पाकिस्तानची निर्मितीच भारतद्वेषातून झाली व हा द्वेष या देशाने अद्यापपर्यंत नेटाने टिकवून धरलेला आहे. हा द्वेष चालू ठेवायला या देशाने स्वत:ला अमेरिकेसारख्या देशाकडे गहाण टाकले व तिथली सद्दी संपल्याची जाणीव झाल्यापासून आता तो चीनशीसुद्धा शय्यासोबत करू लागला आहे. त्यामुळे मला या देशाबद्दल प्रचंड कुतुहल आहे. गंमत म्हणजे सर्वसाधारण पाकिस्तान्यांच्या मनात ही द्वेषभावना दिसत नाहीं. खोलात असेल सुद्धा पण वरवर तरी दिसत नाहीं. उलट पाकिस्तानी भारतीयांशी खूपच मैत्रीने वागतात. कायम दुसर्याने टाकलेल्या तुकड्यांवर जगलेला हा देश अद्याप अशी गुर्मी कशी काय चालू ठेवू शकतो हाही एक भाग या कुतुहलाच्या मागे आहेच. आतापर्यंत जितक्या लेखकांकडे मी भाषांतरासाठी परवानगी मागितली त्यांना मी भारतीय असल्याचे लिहिले होते व "मी विनामूल्य लिहितो व म्हणून मोबदल्याची अपेक्षा ठेवू नये" हेही लिहिले होते, पण प्रत्येक वेळी उलट मेलनेच परवानगीचे उत्तर आले. आयाज अमीर या पाकिस्तानी खासदाराने तर "लाहोरला आलात तर कळवा, एक जेवण एकत्र घेऊ" असेही लिहिले होते! तर अशी आहे प्रेमावर-तिरस्कारावर आधारलेल्या या कुतुहलाची कहाणी! 
============
Sayali Barve - गुरुवार, 28 फेब्रुवारी 2013 - 08:03 PM IST
काळे काका पाकिस्तानच नाव घेतल्या शिवाय तुम्हाला झोप येत नसावी. 
============
Sudhir Kale - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2013 - 07:16 PM IST
Yes, of course! I have DAWN's permission TO translate as long as I give credit to the author & to DAWN for being its first publisher. Wherever the author's e-mail is available, I also take his permission too. 
============
anamik - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2013 - 03:49 PM IST
खालिक कियानी ची तुम्ही परवानगी घेतली होती का लेख भाषणत्र करायच्या आधी... 
============
Sudhir Kale - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2013 - 02:35 PM IST
Dear Mr Santosh Patil, My article on Balochistan can be read by opening the link below: tp://www.esakal.com/esakal/20111219/4737779147087300078.htm 
============
Bhushan - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2013 - 05:33 AM IST
मला तर काही समजत नाही. अगदीच घाबरलो आहे. 
============
Sudhir Kale - रविवार, 24 फेब्रुवारी 2013 - 10:34 PM IST
Mr Vijay, Actually, Nawaz should be (and is) CJP's favorite son. After coming to power, PPP dragged its feet regarding reinstallation of judiciary, while Nawaz undertook "Long March" & forced the issue. That is why CJP supported Nawaz's petitions that led to Gilani's dismissal while as Ashraf has managed to circumvent the issue till now purely on some silly technicality. So my feeling is Nawaz, if elected PM, will have minimum problems with judiciary as long as current CJP is on the bench, 
============
Sudhir Kale - रविवार, 24 फेब्रुवारी 2013 - 09:38 PM IST
Mr Vijay, Pl read my letter in JP "Root cause of instability in Pakistan" wherein I have appealed to all democratic parties to unite". It looks like poor CJP is scared of goons of military. m.thejakartapost.com/news/2012/07/04/your-letters-root-cause-instability-pakistan.html 
============
Vijay - रविवार, 24 फेब्रुवारी 2013 - 06:33 PM IST
काळेजी, विनय जांभळी म्हणतात ते बरोबर आहे, सुप्रीम कोर्ट पासून नवाझ शरीफ न धोका आहे. नवाझ शरीफ चा पण corruption कासेस, आहेत गुगल करा. मिया नवाझ शरीफ ना खालील तीन धोके आहेत: १. जनहित याचिकेतून शरीफ साहेबाना अडकवून ठेवणे आणि सुप्रीम कोर्टा तून सदोदित बलाद्या लावणे आणि फालतू कटकटी निर्माण करणे. २. जर शरीफ साहेबाना ५० टक्के अधिक एक जागा मिळाल्या नाही तर त्यांना coalition government स्थापन करावे लागेल अनो छोट्या पार्टी चे ऐकावे लागेल. ३. विरोधी पक्ष त्यांचे एक हि बिल पास होऊन देणार नाही आणि प्रत्येक parliament session मध्ये काहीतरी विघ्न आणेल. वरील तिन्ही strategies सध्या विरोधी पक्ष सध्या भारत, अमेरिका, आणि इस्रायेल मध्ये अवलंबत आहेत. शेवटी हा शरीफ साहेबांचे प्रोब्लेम आहेत आणि त्यांनाच सोडवायचे आहेत. जर भारत आणि अमेरिकेने हस्तक्षेप केला तर वाईट परिणाम होतील. २०१२ चा अमेरिकन निवडणुकीत netanyahu नि romney ची बाजू घेतली होती आणि महिन्या पूर्वीच्या इस्राएली निवडणुकीत netanyahoo ना किंमत चुकवावी लागली. 
============
Sudhir Kale - रविवार, 24 फेब्रुवारी 2013 - 10:37 AM IST
Vyankatesh-ji, You didn't give your e-mai ID! 
============
Vyankatesh - रविवार, 24 फेब्रुवारी 2013 - 12:18 AM IST
Kharch sunder lekh Kale sir. Tumhi ullekh kelyamule mi maza email id dila ahe . Krupaya apalya ya adhichya vividh bhaganchya links dilyat tar khupach chan 
============
Sudhir Kale - शनिवार, 23 फेब्रुवारी 2013 - 01:00 PM IST
Nobody should take Pak Army or ISI lightly. Nobody does! But today it is t its weakest thanks to its abominable show in Abbottabad, Karachi Naval Base, etc. Nawaz Sharif has some experience. International wind is also agaist military. So if not now, when? 
============
vinay jambhali - शनिवार, 23 फेब्रुवारी 2013 - 11:14 AM IST
We need to be careful.But Pak Army and ISI are a strong force than the Democraticy ..Supreme court is another fascist .. 
============
Sudhir Kale (Excerpts from Chapter 15 of Nuclear Deception) - शनिवार, 23 फेब्रुवारी 2013 - 08:14 AM IST
(कारगिलहून सैन्य मागे घेतल्यानंतर) शरीफ यांनी लष्करावर प्रतिहल्ला केला. १९९१ साली जसे त्यांनी बेग व गुल यांच्याविरुद्ध कारवाई केली होती तशीच त्यांनी मुशर्रफ यांच्याबाबत करण्याची योजना आखली. ऑक्टोबर १९९९ मध्ये मुशर्रफना श्रीलंकेकडून एका लष्करी परिषदेचे आमंत्रण आले होते. ते तिथून १२ ऑक्टोबर रोजी PIA च्या विमानात बसून कराचीला परत येत असताना शरीफ यांनी त्यांचे विमान उतरण्याच्या बेतात असताना कराची विमानतळ त्यांच्या उड्डाणाला बंद केले. पायलटने सांगितले कीं ही आज्ञा त्यांच्यामुळे देण्यात आली होती व त्याच्याकडे पक्त एक तासापुरते इंधन होते. मुशर्रफना वाटले कीं हा कट त्यांच्याविरुद्ध आहे व त्यापायी अनेक निष्पाप लोकांचे जीव जाणार होते. मुशर्रफना विमान भारतात उतरायला नको होते व त्यांनी वैमानिकाला उडत रहायचा सल्ला दिला. मुशर्रफ यांनी नागरिक उड्डान खात्याशी, लष्कराच्या मुख्यालयाशी व शरीफ यांच्या घरी मोबाइल फोनवरून झालेल्या संतापयुक्त संभाषणानंतर शरीफनी त्या विमानाला उतरायची परवानगी दिली. दरम्यान लष्कराने विमानतळाचा ताबा घेतला होता. त्यांचे विमान ...... कराचीला उतरले व त्यांनी शरीफना पदच्युत केले. 
============
Sudhir Kale - शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2013 - 04:15 PM IST
Vijay-ji, if anybody can "fix" Pakistani Army, it is Nawaz Sharif. He had done it in 1999 and the only guy to be fixed was Musharraf. But Nawaz played a silly trick of not allowing Musharraf's plane to land when there were other civilian passengers on board. That act gave sympathetic aura to Musharraf and Nawaz got bad publicity. If he had waited for Musharraf to return and then got rid of him, he would have been successful. Pl read Nuclear Deception! 
============
Sudhir Kale ( - शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2013 - 03:43 PM IST
राहुल-जी, सगळे पाकिस्तानी नेते एकाच माळेचे मणी असले तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून नवाज शरीफ हे “तुका म्हणे त्यातल्या त्यात” या न्यायाने अंमळ जास्त समंजस नेते आहेत. व्यावसायिक असल्याने (पोलाद कारखान्यांचे मालक आहेत) जरा विचारी आहेत. १९८८ साली झिया उल हक यांच्या मृत्यूनंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात लष्कराने (यात कुप्रसिद्ध ज. बेग व ले.ज. हमीद गुल हे प्रमुख!) बेनझीरबाई गादीवर येऊ नयेत म्हणून IJI (Islami Jamhoori Ittehad) या एका युतीचे गठन केले व नवाज शरीफ यांना त्या युतीचा नेता म्हणून निवडले. पण बेनझीरबाईच निवडून आल्या पण त्यांना पुरेसे एकमत मिळाले नाहीं. मग त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले व नवाज शरीफ पंतप्रधान झाले. पण बेनझीरला कसे एकाद्या कठपुतळीसारखे नाचविण्यात आले याचा वृत्तांत मी अनुवाद केलेल्या "न्यूक्लियर डिसेप्शन"वर वाचायला मिळेल. हा अनुवाद मालिकेच्या रूपात ई-सकाळवर प्रकाशित झालेला आहे. जरूर वाचावे. ज्यांना त्यात रस असेल त्यांना मी त्या मालिकेचे दुवे पाठवू शकतो. गंमत म्हणजे एके काळी नवाज शरीफ स्वत:ला "अमीर" घोषित करून पाकिस्तानात शारिया कायदाही लागू करायला निघाले होते! 
============
Vijay - शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2013 - 08:22 AM IST
मी किशोर्जीन शी सहमत आहे, नवाझ साहेब कितीही चांगले असले तरी पाकिस्तानी लष्कर आणि ISI त्यांना भारताशी जवळीक करून देणार नाही. काळेजी तुमचे आतापर्यंत पाकिस्तानवर बरेच लेख प्रसिध्द झाले आहेत. तुमचे लेख सखोल असतात आणि बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रिया वास्तवाला अनुसरून असतात. हे जर सर्वसाधारण वाचकांना कळू शकते तर राजकारण्यांना का कळू नये? पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक भारताने करू नये, पाकिस्तान कितीही कपटी, विश्वास घातकी, दुतोंडी, असला तरी बिनडोक मुळीच नाही. प्रतिस्पर्धी आणि शत्रूला कमी लेखणे आत्मघातकी असते. किती दिवस आपण पाकिस्तान ला दोष देत बसणार? WE NEED TO BEAT THEM AT THEIR OWN GAME, UNFORTUNATELY WE DONT HAVE STATESMAN ALL WE HAVE IS TWO BIT POLITICIANS. 
============
Sudhir Kale - शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2013 - 05:47 AM IST
Dear Mr Patil, I wrote one or two articles on e-Sakal on Balochistan. I will post the said links in a separate post. The problem is the availability of 'reliable' material. There is a Baloch columnist, presently based in USA, with whom I have established contact. But he also seems somewhat silent. 
============
Santosh Patil - गुरुवार, 21 फेब्रुवारी 2013 - 08:23 PM IST
काळे साहेब, आपल्या लेखांमुळे खूप चांगली माहिती उपलब्ध होते. माझी अशी विनंती आहे कि आपण बालोचीस्तान प्रश्नावर थोडा प्रकाश टाकणारा लेख प्रकाशित करावा. म्हणजे भारत पाकिस्तानातील फुटीरता वाद्यांना का हवी तशी मदत करत नाही. जेणे करून गृह युद्धा मुळे पाक जेरीस येवू शकेल. मी काही ठिकाणी वाचले आहे कि इंदिरा गांधींच्या मनात अशा योजना होत्या. 
============
Kishor W - गुरुवार, 21 फेब्रुवारी 2013 - 03:07 PM IST
नवाझ शरीफ हे देखील अखेर लष्कराचे ताटाखालचे मांजर ठरणार आहे. कारण कोणीही जरी निवडून आले तरी ISI आणि लष्कर त्याला कुठले हि विधायक कार्य करून देणार नाही. ISI आणि हक्कानी तालीबंयान्सोबत राहणार आणि पाकिस्तानी लष्कर त्याला साथ देणारच. त्यामुळे पकिस्तानी जनतेचे काही खरे नाहि आन्हि काश्मिरी जनता ही त्यात भरडली जाईल. 
============
मिलींद कारंडे - गुरुवार, 21 फेब्रुवारी 2013 - 11:36 AM IST
पाकिस्थान प्रत्येक प्रश्न उदा.कारगिल, काश्मिर हा आंतरराष्ट्रीय स्थरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण याबाबत भारताने हा प्रश्न स्वबळावर सोडविणे आवश्यक आहे. आता स्वबळ म्हणजे काय ते शासनाने ठरविणे योग्य राहील. 
============
vikrant,chicago (3rd attempt) - गुरुवार, 21 फेब्रुवारी 2013 - 02:10 AM IST
काळे साहेब, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! पाकिस्तानात लहानपणापासून बर्याच भागात इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाकिस्तानी सैन्याची टिमकी वाजविलेली असते. १९४८, १९६५ आणि आश्चर्य म्हणजे १९७१ चे युद्धही पाकिस्ताननेच जिंकले असा धडधडीत खोटा प्रचार केला जातो. साहजिकच पाकिस्तानी लोक सैन्य म्हणजे देव आणि बाकी सगळे शून्य आणि निकामी अशा भावनेने वाढलेले असतात. त्यात धर्मांध मुलांची भर! यामुळे मुलकी सरकारला सैन्यावर अंकुश ठेवणे कठीण जाते. बिन लादेनच्या कारवाईत सैन्याची झालेली नामुष्की आणि इंटरनेटमुळे खरे काय आणि खोटे काय हे पडताळून बघण्याची उपलब्धता यामुळे हे चित्र भावी काळात बदलेल अशी आशा आहे. नवाझ शरीफ आले तर पाकिस्तानचे संबंध भारताशी सुधारतील पण मुशर्रफ आणि त्यांचे पित्त्ये यांची सैन्यावर आणि आय एस आय वर अजूनही पक्कड आहे आणि त्यामुळे नवाझ शरीफ यांना निवडून न आणण्यासाठी ते कुठल्याही ठरला जाण्याची शक्यता आहे.
============
Rahul - गुरुवार, 21 फेब्रुवारी 2013 - 01:36 AM IST
सुधीर काळे साहेब, माझ्या प्रतिक्रियेची दखल घेतलीत त्याबद्दल आभार!! माझ्या मते पाकिस्तानी नेते सगळे एकाच माळेचे मणी!!!!!!!! पण नवाझ शरीफ हे सध्या उपलब्ध पर्यायांमध्ये भारतासाठी कमीतकमी हानिकारक पर्याय!!! इम्रान खानचा काही भरवसा नाही. लष्कराच्या भरवशावर किंवा दबावाखाली तो कारगिल सारखे एखादे धाडस करू धजेल.. नवाझ हे पण लष्करी राजवटीच्या तालमितूनच एक बाहुले म्हणून पुढे आलेत.. पण ते व्यवहारी आणि काळाचे भान असलेले आहेत... आर्थिक विकासाला आणि शांततेला निदान युरोप अमेरिकेच्या दबावापोटी का होईना पण ते प्राधान्य देतात.. शिवाय पाकचे अफगाणिस्तान होऊ नये असे वाटणार्यांपैकी नवाझ हे एक धूर्त पण दूरदृष्टीचे राजकारणी आहेत.. पाक लष्कराला बराकीतच मर्यादेत ठेवू शकेल असा नेता म्हणजे नवाझ शरीफ.. लष्करी राजवटीला आणि लुडबुडीला विरोध हा प्रमुख मुद्दा आहे.. भाराष्टाचार आणि कादरी यांची लाट हे दोन मुद्दे पण बरेच प्रभावी ठरतील... बघुयात काय होतंय ते!!! घोडा मैदान जवळच आहे!!!!!!!!!!!!!! 
============
Sudhir Kale - बुधवार, 20 फेब्रुवारी 2013 - 10:33 PM IST
Thank you, Rahul-ji for your comprehensive response. We seem to be in full agreement on many points. If Nawaz comes to power, he will try to 'fix' the armed forces. He almost succeeded in 1999... He will also try to improve relations with India. That is where he might be crossing swords with them again! 
============
Sudhir Kale - बुधवार, 20 फेब्रुवारी 2013 - 07:40 PM IST
Rahul-ji, many thanks for your comprehensive response wherein, I am happy to note, we seem to agree on most of the points. Very gratrful, indeed! 
============
Rahul - मंगळवार, 19 फेब्रुवारी 2013 - 05:12 PM IST
सुधीर काळे साहेब, आपला अंदाज बरोबर आहे.. येत्या निवडणुकीत मिस्टर टेन परसेंट (झरदारी) आणि त्याची भ्रष्टाचाराने बरबटलेली टीम घरी बसेल हे नक्की.. बेनझीर हत्येमुळे सहानुभूतीच्या लाटेवर टीम झरदारी सत्तेत येऊ शकली.. नवाझ शरीफ सध्या पाकिस्तानी जनतेची पहिली पसंती ठरू शकतील.. इम्रान खान हा लष्कराचा बहुला आहे हे उघड गुपित आहे.. जबाबदार आणि जागरूक पाक जनतेला आणि मिडीयाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गे लष्कराची सत्ता किंबहुना लुडबुड सुद्धा नकोय.. शहरी भागात तरी नवाझ यांचेच पारडे जड असेल.. डोंगराळ आणि ग्रामीण भागात इम्रान खान (ड्रोन विरोधी भूमिकेमुळे) तसेच इतर कट्टर पंथी पक्ष (अमेरिका आणि भारत द्वेष तसेच इस्लामची हक देऊन गोळा केलेली पब्लिक जे बहुतांश अडाणी आणि दरिद्री आहेत) यांना चांगला पाठींबा मिळेल.. लष्करामुळे भुत्तो-झरदारी तसेच नवाझ आणि त्यांचे नेते, पक्ष कार्यकर्ते चांगलेच होरपळलेले आहेत..त्यामुळे आत्ता जसे झरदारी सत्तेत आणि नवाझ बाहेरून पाठींबा नेमके याउलट नवाझ सत्तेत आणि झरदारी बाहेरून (अगदी देशाबाहेरून) पाठींबा अशी पुढची ५ वर्षे सुखाने सत्ता उपभोगतील.. 
============
Sudhir Kale - मंगळवार, 19 फेब्रुवारी 2013 - 12:35 PM IST
Some correction! Please read win absolute majority in place of "win the abs e thT majority" and PPP is a history in place of "PPP is s history" and aam Pakistani awam in place of "aam Pakistani swam"! 
============
Sudhir Kale (attempt No. 2) - मंगळवार, 19 फेब्रुवारी 2013 - 07:29 AM IST
Thank you Mr Vijay for your encouraging words. It is true that it is election time in Pakistan. From whatever i am reading & concluding from news coverage in pakistani English Press, Imran Khan will meet his Waterloo though he is making big noise about drone attacks. I suspect him to be also the stooge of Armed Forces. This will also go against him. I wouldn't be surprised if Nawaz emerges as the leader of biggest party though he may not win the abs e thT majority. PPP is s history. I wish I could read Urdu (but I can't as yet) to assess what 'aam' Pakistani swam feels. It is my fervent hope that Nawaz, a true statesman, is Pakistan's next PM. 
============
Vijay - सोमवार, 18 फेब्रुवारी 2013 - 08:04 PM IST
काळे साहेब एक चांगला अनुवाद आणि उत्तम विश्लेषण. आता लौकरच पाकिस्तानात निवडणुका आहेत, बघूया किती दहशतवादी मुक्त वातावरणात होतात त्या? माझा मते तालिबानी आणि मुल्ला मंडळी अमेरिका आणि ड्रोन चा बागुलबुवा करून सत्ता काबीज करतील, आणि पाकिस्तानी लष्कर आपले महत्व जपण्य करिता प्रयत्न करेल, हाफिज साय्येद साहेब (माझी नव्हे कॉंग्रेस ची उपाधी) आणखी आगीत तेल ओततील. अमेरिकेला अंतर्गत राजकीय परिस्तिथी आणि पैसा नसल्या मूळे मध्यपूर्वेत काहीही स्वारस्य उरलेले नाही (इस्रायेल ची सुरुक्षा वगळून) . जर राहुलजी पंतप्रधान झाले तर भारताला कठीण आहे. 
============
Sudhir Kale - सोमवार, 18 फेब्रुवारी 2013 - 03:08 PM IST
शिंदेसाहेब, मला आपल्या म्हणण्यापेक्षा AJ-साहेबांचे म्हणणे जास्त पटते. एकाच वेळेला अमेरिका आणि चीन या जागतिक महसत्तांबरोबर उघडपणे शय्यासोबत करून आपले उखळ पांढरे करून घेणार्‍या पाकिस्तानला गनिमीकाव्यात किंवा कूटनीतीत बिनडोक समजण्यात आपली चूकच होईल. भारताकडे पाकिस्तानबाबत दूरदर्शी आणि एकसूत्री परराष्ट्रधोरण नक्कीच नाहीं, सत्तेवर येणार्‍या पक्षाबरोबर ते बदलत जाते. या विरुद्ध चीनचे धोरण खूपच सातत्यपूर्ण असते. पाकिस्तानबद्दल बोलायचे तर माझ्या मते पाकिस्तानी लष्कर परराष्ट्रधोरणात मुलकी सरकारला लुडबुड करू देत नाहीं. म्हणूनच आपण जोपर्यंत दूरदर्शी आणि एकसूत्री परराष्ट्रधोरण राबवत नाहीं तोपर्यंत पाकिस्तान आपल्याशी एक पाऊल पुढेच रहाणार. पण अलीकडे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाकिस्तानला कवडीचीही किंमत न उरल्यामुळे आणि आपल्या आर्थिक प्रगतीमुळे आपला आवाज ऐकला जाऊ लागला आहे. आता आपली तूलना पाकिस्तानबरोबर केली जात नाहीं. आपण जणू स्वयंभू झालो आहोत. पण आपल्या परराष्ट्रधोरणात दूरदर्शीपणा आणि एकसूत्रीपणा यायला हवाच आहे. आपल्याकडे प्रांतीय भावनाही वाढीला लागल्याचे भयावह दृष्य अलीकडे डोके वर काढू लागले आहे. 
============
AJ - रविवार, 17 फेब्रुवारी 2013 - 09:35 AM IST
पाकिस्तान चाणाक्ष आणि उपद्रवी देश आहे. भारताकडे पाकिस्तानशी वागण्याचे दूरदर्शी आणि एकसूत्री धोरण नाही. भारत जो पर्यंत असे धोरण तयार करत नाही आणि ते उघडपणे, चिवटपणे आणि दूरदृष्टीने राबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारतावर कुरघोडी करत राहील. कारगिल सारख्या छोट्या लढाया भारत कदाचित जिंकेल, पण मोठे युद्ध हरण्याचा धोका सतत राहील. 
============
Prabhakar Shinde - शनिवार, 16 फेब्रुवारी 2013 - 08:49 PM IST
पाकला ना गनिमी कावा जमला ना कूट नीती बिन डोक लेकाचे आता विश्लेषण करताहेत आणि जबाबदारी दुसर्यावर ढकलण्याची शर्यत चालू आहे. दुसरीकडे NDA सरकारने ढेपाळलेल्या हेर खात्यावर मात करून युद्धात सेनेला जबाबदार पाठींबा दिला. आमच्या जवानांच्या शौर्याला तोड नाही. अन कॉंग्रेस कफ़न पेट्यावर चिखलफेक करीत राहिले हि तेव्हाची सत्य परिस्थिती. आजही पाकड्या प्रमाणे धिंडोरा पिटत बसले नाही . 
============
Pramod Mukkamwar - शनिवार, 16 फेब्रुवारी 2013 - 08:07 PM IST
Attack on Pakistan for showing Indian Power of real war and not a property of running mouse by dirty cat. 
============
anil kulkarni sangli - शनिवार, 16 फेब्रुवारी 2013 - 06:18 PM IST
भारताने आता दुर्लक्ष करू नये... पाकिस्तानला एकदाच चागला धडा शिकवावा..काश्मिर प्रश्न पाकिस्तानला धडा देऊनच सुटेल.... 
============
ek vachak - शनिवार, 16 फेब्रुवारी 2013 - 05:55 PM IST
ते सगळे (पाकिस्तानी) दम नसलेले भित्रे आहेत. THEY ARE SIMPLY GUTLESS COWARDS