Wednesday 17 August 2011

दुसर्‍या स्वातंत्र्याकडे भारताची आगेकूच!

esakal.comhttp://www.esakal.com/esakal/20110817/5266424372071605546.htm
eSakal
(’ई-सकाळ’वर १७ ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित)
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत! आताशा तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10‌^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेली (पण कधीही न वापरलेली) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असली एककें (units) नव्याने वापरावी लागत आहेत. गुंडांत लोकप्रिय असलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत. 2G, CWG नंतर प्रचारात आलेले व याच 'खाबूवीरां'च्या 'सन्मानार्थ त्यांचीच नावे वापरून केलेले नवे अंकगणितच आता उपयोगी पडेल असे वाटते. (त्यात शेवटचे नांव कुणाचे होते हे बहुतेकांना आठवत असेलच.)

सध्या भल्या-भल्या नेत्यांना व त्यांच्या "पुण्यकर्मा"त सहभागी झालेल्या त्यांच्या साथीदारांना देशाची अगणित संपत्ति हडप केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. पण या संपत्तीचे जे आकडे वाचायला मिळतात त्यांचा हिशेब तोंडी तर सोडाच, पण सामान्य कॅलक्युलेटरवरही करता येणे शक्य नाहीं. त्यासाठी "स्प्रेडशीट"च वापरावा लागेल. ही हडप केलेली सर्व संपत्ती भारतीय जनतेची, दरमहा १० हजार ते लाखांपर्यंत पगार मिळविणार्‍या लोकांच्या करांतून जमविलेली आहे. तीच हडप केल्यामुळे ही जनता संतापल्यास नवल ते काय? पूर्वी एक-दोन लाख खाल्ले तरी "अबब" व्हायचे, पुढे कोटी रुपये खाल्ले तरी कांहीं वाटेनासे झाले. संवयच झाली म्हणा ना! मग चारा-घोटाळ्यापासून (fodder scam) हजार कोटींचा आकडा वाचनात येऊ लागला (व पचूही लागला). पण आता? "इतके लक्ष कोटी"पर्यंत मजल गेली. काय करणार आहेत ही नेतेमंडळी मंडळी या पैशांचे? त्यांना कांहीं लाज, लज्जा, शरम?

मला असेही वाटते कीं अकाउंटिंगच्या अभासक्रमात मूलभूत बदल करण्याची गरज असून त्यात असे हडप केले जाणारे पैसे कसे पकडता येतील या विद्येचा समावेश करायला हवा.

पण आपल्या सरकारचे रागरंग पहाता त्याला अद्याप जनतेच्या क्षोभाच्या तीव्रतेचा किंवा तो क्षोभ किती खोल आहे याचा अंदाजच आलेला नाहीं. कालची राजघाटावरील अण्णांच्या चिंतनाबद्दलची बातमी टीव्हीवर पाहिल्यावर असे वाटले कीं सरकारने नीट विचार केला नाहीं तर राजघाटाचा किंवा जयप्रकाश नारायण उद्यानाचा तेहरीर चौक व्हायला वेळ लागणार नाहीं. मनिष तिवारींचे अण्णासाहेबांच्या बाबतीत ’तुम’ ’तुम्हारी’ सारखे सौजन्यहीन उद्गार, कपिल सिब्बल यांच्या चेहर्‍यावरचे "अतिहुशारी" दर्शविणारे लबाड हास्य आणि अंबिका सोनींचे एकाद्या ४-५ वर्षाच्या मुलाला समजावे तसे जनतेला सांगणे म्हणजे कहरच झाला आहे असे वाटते.

पण अण्णांना उपोषण करायला बंदी घालून सध्याचे सरकार इंदिराजींचे अनुकरणच करत आहे असे दिसते. त्यांना या देशात पुन्हा आणीबाणी आणयची आहे काय? हे देशाचे तारू भरकटत कुठे न्यायचे आहे त्यांना? काय म्हणून उपोषण करण्याचा अधिकार अण्णांना हे सरकार नाकारीत आहे? आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेलेच नाहीं असे जे अण्णा म्हणाले ते खरेच आहे. फक्त "गोर्‍या इंग्रजां"च्या जागी "सावळे इंग्रज" आले! जी बंदी गोर्‍या इंग्रजांनी महात्मा गांधींच्या उपोषणावर घातली नाहीं ती बंदी हे गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आजच्या युगातल्या गांधींच्या नव्या अवताराला कां नाकारत आहेत? आणि ते आता बंदिवासातच उपोषणाला बसले आहेत. मग अटक करून सरकारने काय साधले? आज भारतभर-अगदी केरळ-तामिळनाडूपासून उत्तरेत हरियानापर्यंत व राजस्थानपासून आसामपर्यंत सारे लोक अण्णांच्या मागे उभे आहेत. एकादी ठिणगीच पडायचाच अवकाश आहे. मग असे पेटेल कीं कैरोतल्या तेहरीर चौकाचीच पुनरावृत्ती होईल.

मागे फिलिपीन्समध्ये जेंव्हां अशीच चळवळ कोरी अक्वीनोबाईंनी सुरू केली त्यावेळी असाच प्रचंड जनसमुदाय चौकात जमला होता. त्यातल्या महिलांनी मशीनगनधारक थायलंडच्या सैनिकांना गुलाबाची फुले दिली. ती कृती इतकी परिणामकारक ठरली कीं या सार्‍या सैनिकांनी निदर्शकांवर कारवाई करण्यास नापसंती दर्शविली. हळू-हळू ते कोरीबाईंच्या बाजूला येऊ लागले व शेवटी रामोस हे संरक्षणमंत्रीही कोरीबाईंना येऊन मिळाले. आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी. मग हे "बंधू" या निदर्शकांवर हल्ला करतील? काय बिशाद!

अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यासाठी २२ अटी? कशाला? एक नि:शस्त्र अहिंसावादी देशभक्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला उभा रहातोय् व तेही फक्त स्वत: अन्न नाकारून, तर यात पोलिसांना "सुरक्षे"ची काय समस्या दिसली? अतिरेक्यांना सोडून ते या आधुनिक महात्म्याच्या कां मागे लागले आहेत? आणि तीनच दिवसांची परवानगी काय म्हणून? आमरण उपोषण तीन दिवसात कसे संपेल? शिवाय ५००० पेक्षा जास्त लोक येणार नाहींत याची खात्री अण्णा कसे देतील? (खरे तर आज सकाळी झी आणि समय वाहिन्यांवर पाहिले कीं तिहारसमोर हजारोंच्या संख्येने लोक जमले आहेत. या जमावाच्या संख्येचे जर पोलिस स्वत:च नियंत्रण करू शकत नाहींत तर जेपी पार्कवर अण्णांनी ५००० पेक्षा जास्त लोक जमा होऊ देऊ नयेत ही अट घालणे म्हणजे एक लंगडी सबबच त्यांच्या तोंडावर फेकण्यासारखे आहे!) गर्दीचे योजनाबद्धपणे नियंत्रण करून ती व्यवस्था पोलिसांनाच करायला हवी! कार पार्कमध्ये ५० पेक्षा जास्त गाड्या किंवा दुचाकी वाहने चालणार नाहींत हीही जबाबदारी अण्णांची कशी? ती व्यवस्थाही पोलिसांनीच नको कां पहायला?
झी आणि समय वाहिन्यांवर पाहिले आताच घोषणा देणार्‍यांतील एकाने मनमोहन सिंग यांच्या लाल किल्ल्यावरून दिलेल्य़ा अभिभाषणातील "सरकारके पास कोई जादूकी छडी नहीं है कि वह एक मिनिटमे भ्रष्टाचार खतम करे"या वाक्याला उद्देशून म्हटले कीं "मगर हमारे पास अब झाडू है आप सबको निकाल देनेके लिये!"! बहुत खूब!

असे ऐकण्यात/वाचण्यात आलेले आहे कीं कुठल्याशा आतल्या आवाजाने "पुकार" दिल्यामुळे आपले सध्याचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (त्यांच्याही ध्यानी-मनी नसताना) पंतप्रधान झाले. आता मनमोहन सिंग यांच्या आतल्या आवाजाने अशीच पुकार द्यायची वेळ आली आहे असे मला वाटते. हीच वेळ आहे योग्य धोरणाच्या समर्थनार्थ पायउतार होऊन जनतेच्या बाजूने उभे रहाण्याची. ही वेळ त्यांनी दवडली तर आयुष्यात एकाद्याच वेळेला येणारी सुवर्णसंधी हुकेल. उद्या ते फक्त माजी पंतप्रधान म्हणून ओळखले जातील, पण अण्णांबरोबर लढाईत उतरल्यास त्यांना "भारतहृदयसम्राट" ही जनतेच्या प्रेमाची उपाधी मिळेल जी "माजी पंतप्रधान" या बिरुदावलीपेक्षा अनेक पटीने मोठी आहे. ते असे करतील काय?

आज अण्णांच्या मागे उभा असलेला सबंध देश पाहिल्यावर "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे या श्लोकाची आठवण झाली व वाटले कीं भगवान श्रीकृष्णच तर नाहीं ना अण्णांच्या रूपात आपल्यात आले आहेत?

"सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" असे म्हणणार्‍या लोकमान्यांची आज उणीव भासते आहे. सरकारला सुबुद्धी सुचो व या "भ्रष्टासुरा"चा संहार होऊन "दुष्कृतां"चा विनाश होवो ही आशा करत आता पुढच्या शुभ वार्तेची वाट पाहू या!
वाचकांचे प्रतिसाद

On 17-08-2011 07:54 PM kishor said:
party, so called

On 17-08-2011 07:53 PM kishor said:
The principles and policy of the Democratic party, so called. new DEFINATION OF DEMOCRACY Government by the LEADERS; a form of government in which the supreme FAMILIES are retained and directly exercised on the people Government by popular CORRUPTORS; a form of government in which the supreme FAMILIES are retained by the LEADERS, but is directly exercised through a system of representation and delegated authority periodically(?) renewed; a constitutional CORRUPT government; a AUTOCRATIC

On 17-08-2011 07:52 PM kishor said:
DEFINATION OF DEMOCRACY Government by the people; a form of government in which the supreme power is retained and directly exercised by the people. Government by popular representation; a form of government in which the supreme power is retained by the people, but is indirectly exercised through a system of representation and delegated authority periodically renewed; a constitutional representative government; a republic Collectively, the people, regarded as the source of government.

On 17/08/2011 07:44 PM piyush said:
फेसबुक चा वापर करणार्यान साठी like चे बटन पाहिजे होते ..

On 17/08/2011 07:42 PM piyush said:
खरच प्रोसहान देणारा लेख आहे ..अतिशय छान !

On 17/08/2011 06:44 PM DRKAMLAKaRBDESHPANDE said:
महात्मा गांधी -राष्ट्र पिता - अन्न हजारे -राष्ट्र ताता - कॉंग्रेस -- राष्ट्र कर्ता तेवे सर्वांनी राष्ट्र चे रक्षण करावे -आंदोलने करून समस्या वाढतात -सुटत नाहीत नुकसान राष्ट्र चे होते .माणसे दुरावतात तेवा सर्वांनी बंधू भाव जपावा

On 17/08/2011 05:53 PM ganesh said:
खूपच छान विश्लेषण .. शब्दातून सुधा चीड दिसत आहे .. चेहरा बघण्याची गरज नाही. आताच पंतप्रधान (बोलका बहुला) संसदेमध्ये वक्तव्य करून गेले कि संसदेपेक्षा देशात काही मोठे नाही .. अरे संसद दगडी इमारत आहे त्यात बसलेल्याला लोकांना या चिडलेल्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेने निवडले आहे मग संसद श्रेष्ठ कशी ? आणि मनमोहन स्वतः निवडून आले नाहीत ते आशीर्वादाने आले आहेत त्यांना म्हण्याचे असेल १० जनपथ जगात सर्व श्रेष्ठ आहे .. चुकीने दुसरे काही तरी बोलले ---nice and the artical also very very good!!! we support anna!

On 17/08/2011 05:16 PM Vande matram said:
पडून taka हे भ्रष्ट सरकार नको आम्हाला अस्लीये नेते

On 17/08/2011 04:47 PM jayraj said:
खतरनाक लिखाण आहे !!! उदेश हि चांगला आहे. संपूर्ण भारत वर्ष आण्णाच्या पाठीशी उभे आहे. खरे पाहता विनाशकाली विपरीत बुद्धी आशी गत मनमोहन सरकारची झाली आहे. तो सिब्बल तर डोक्यावर पडला आहे, म्हणून असे बेजबाबदार वक्तव्य करत आहे. खरे पाहता आजकालच्या नेत्यांनी स्वातंत्र्य लढा पहिला नाही, आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले ह्याची जाणीव त्यांना नाही, गांधींच्या विचारांवर चालणारा कॉंग्रसे पक्ष त्यांच्याच विचारणा लाथाडत आहे. मनमोहन सरकारच्या चड्डीची नाडी आता जनतेनी खेचली आहे; म्हणून त्यांची पळताभुई झाली आहे.

On 17/08/2011 04:26 PM Trupti Raulkar said:
खूप छान आहे. सरकारला अद्दल घडलीच पाहिजेत...

On 17/08/2011 04:17 PM Ajit said:
Hats off to Anna Hazare who started new Anti-Corruption movement. Wish Whole republic will join him for the cause

On 17.08.2011 04:04 Gokul said:
अप्रतिम लेख .......

On 17/08/2011 03:54 PM Mangesh Thube said:
हीच खरी वेळ आहे दुसऱ्या स्वातंत्र लढ्याची. चला लोकहो सर्व जागे व्हा आणि पेटून उठ या सरकारच्या विरोधात. थेंबे थेंबे तले साचे तसे आपण एक एक जन जमा होऊन ह्या आंदोलनात सहभागी होऊया आणि ही लढाई लढूया आणि आपण जिंकानाराच !!!!!!!!!1

On 17/08/2011 03:53 PM सतीश सोनवणे said:
सकाळचे मनापासून अभिनंदन........ लेख छापल्याबद्दल! सकाळ ने समाजजागृतीला हातभार लावावा.....[ बरेच पुणेकर फक्त सकाळ वाचतात....त्यामुळे भ्रष्टाचार विरोधात पुणेकर त्यामानाने कमी जागृत आहेत असे वाटते.] श्री गणेश महाडिकांची प्रतिक्रिया एकदम भावली...PG...नुसते पंतप्रधानांनी नाही तर समस्त पोलीसदल / सैन्यदल यांनी लेख वाचवा असे वाटते......"मतपरिवर्तन काय कधीही / कुठल्याही वयात होऊ शकते... जर वाल्याचा श्री वाल्मिकी होतात तर...भ्रष्टाचार्यांना देखील उपरती शकते..संपत्ती सरकारजमा होऊ शकते..चला आशा करू यात!

On 17/08/2011 03:43 PM Bj said:
आपण नुसते लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष लढ्यामध्ये सामील व्हायला पाहिजे तरच तो लढा यशस्वी होईल आपण सगळ्यांनीच सामील व्हायला हव लेख खूपच चं आहे पण या राजकारणी लोकांच्या डोक्यावरून जाईल.

On 17/08/2011 03:35 PM pyarelal chaudhary said:
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सरकारी तिजोरीला गंडा घालून बुडवले गेलेले एक लाख श्याहात्तर हजार कोटी म्हणजे किती शून्ये रे भाऊ ?

On 17/08/2011 03:17 PM VISHAL said:
वेरी NICE

On 17-08-2011 03:10 PM Somnath Sake said:
आपण दुसरया स्वातंत्र्यासाठी लढत आहोत पण हा लढा फार कठीण आहे.इंग्रजांनी जे काही कमावले ते त्यांच्या देशासाठी त्यामुळे तो लढा इंग्रज विरुद्ध हिंदुस्तानी असा होता.आता लढा हा स्वार्थी स्वकीयान विरुद्ध आहे.त्यामुळे हिंदुस्तानींची एकजूट असणे महत्वाचे आहे.हे राजकारणी काही न काही तरी करून त्यांचा कार्यभाग पूर्ण करतील असे वाटते.महाभारताप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता लढावे लागेल.तरच या भ्रष्टाचारी राक्षसांवर विजय मिळवता येईल.
On 17/08/2011 03:09 PM manoj mule said:
जय ho

On 17/08/2011 03:04 PM ashadeep said:
अतिशय "समर्पक अप्रतिम आणि अतिशय विचारपूर्वक" लेख लिहिलेला आहे हा. हा लेख कॉंग्रेस चे बगळे वाचणार नाहीतच आणि चुकून वाचलाच तर त्यांना" उलट्या .मळमळ, जुलाब "ला सुरवात झाली असेल . हॉस्पिटल बुक करून ठेवा .......................

On 17/08/2011 02:56 PM सुहास कुलकर्णी said:
खूप छान लेख. गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आता घाबरले आहेत. झाल्या प्रकाराबद्दल एकही नेता चकार शब्द काढावयास तयार नाही. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे लोकपाल बिल पास झालेच पाहिजे. जे आतापर्यंत झाले ते पुरे झाले. या लढ्यात आम्ही सर्व अण्णांच्या पाठी उभे आहोत.सध्याचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग "भारतहृदयसम्राट" ही जनतेच्या प्रेमाची उपाधी स्वीकारण्यास तयार आहेत का?

On 17/08/2011 02:54 PM Ashok said:
चला सर्वजण अण्णांना सपोर्ट करू .......................... अण्णा झिंदाबाद.........

On 17/08/2011 02:35 PM mahesh said:
very intresting chapter

On 17/08/2011 02:31 PM Nitin Gulhane said:
India is a country of corrupt people. Of greedy people. No laws and bills can make Indians honest. There are ways to honesty but it will be a very painful path. I don't think we have enough people who can walk the difficult path of corruption free India. At least not yet.

On 17/08/2011 02:17 PM jayant kulkarni said:
अभिनंदन ..छान लेख आहे. धन्यवाद सकाळ.

On 17/08/2011 02:13 PM GANESH MAHADIK said:
आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी." --रामबाण वाक्य .... पण जर राखी बांधून घ्यायला नकार दिला तर बांगड्या भरायला पण विसरू नका .........

On 17/08/2011 02:11 PM saurabh said:
एकच नंबर लेख आहे!! जय हिंद!!

On 17/08/2011 01:46 PM Avinash K thoray said:
khup chan

On 17/08/2011 01:43 PM PG said:
खूपच छान !! मला वाटते आशेच लेखाचे पंतप्रधानांना व्यक्तीक लेख द्यावा. तसेच लोकांच्या प्रतिक्रिया पण वाचायला द्यावा.

On 17/08/2011 01:39 PM nitin said:
खूपच छान लेख आहे. आण्णा तरुण पिढी तुमच्या बरोबर आहे. खरच सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीं.

On 17-08-2011 01:31 PM amar said:
WE support अन्नाहाजरे

On 17/08/2011 01:27 PM Chinmay said:
फारच छान लेख आहे !! But what I think is - instead of shitting on social networking sites, etc, let us participate in the rally to support Annaji. The impact of physical presence is far more effective than this one. Look at the other countries like Lybia, Egypt, etc - after all it is Jana Shakti
On 17/08/2011 01:21 PM shrinivas said:
anna tum aage badho hum tumahare saath hai

On 17/08/2011 01:14 PM sameer said:
जनता कुठपर्यंत सहन करणार ...आता बस

On 17/08/2011 01:09 PM sawan said:
लई भारी ! छान विचार मांडलेत. प्रत्येकाने असे जसे शक्य आहे तसे जागरण/आंदोलन केले पाहिजे. कारण आजपर्यंत या राज्यकर्त्यांना लोकांचे ऐकायची सवय नव्हती. आता त्यांना ते शिकवले पाहिजे. हे राज्य लोकांचे आहे आणि लोकांसाठी आहे. ना कि राज्यकर्त्यांचे--राज्यकर्त्यासाठींचे, ज्याचा या लोकांना विसर पडला आहे. लोकशाहीत जर राज्यकर्ते लोकांचे ऐकत नाहीत तर .... सगळ्यांनी या लढ्यात सामील झाले पाहिजे.

On 17/08/2011 01:03 PM Vinayak Potghan said:
खूपच छान लेख आहे...

On 17/08/2011 12:57 PM Rohit Sonawale said:
एकदम बरोबर आणि स्पष्ट. अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या नव्या भारताचे नवे रूप पाहण्यास उत्सुक आहोत. जय हिंद ! जय भारत ! रोहित सोनावले - भारतीय नागरिक

On 17/08/2011 12:55 PM अजित काजळे, सिडनी, ऑस्ट्रेलिया said:
सकाळने हा (असला वास्तव्य दाखवणारा) लेख छापायचे धैर्य केले घरच्या लोकांचा विचार न करता ह्या बद्दल सकाळचे अभिनंदन

On 17/08/2011 12:54 PM lal said:
ho shevatache naav कोणाचे te कळले; pan te ase aspasht ka chapale asave????

On 17/08/2011 12:51 PM Raje said:
ब्रिटिश काळातही असे नियम नव्हते. तर अण्णांवर असे कडक नियम लावून लोकांच्या आंदोलन करण्याच्या अधिकारावर सरकार गदा आणत आहे. मुळात एवढी लोक अण्णांच्या पाठिशी का आहेत. त्या लोकभावनेचा विचार सरकार करत नसून, मुठभर वकिलांच्या सल्ल्यावर ते अशी समाजविरोधी कृती करत आहेत

On 17/08/2011 12:49 PM pradip said:
खूप छान लेख मला आवडला! लेखकाचे छान लिहिल्या बद्दल आणि सकाळ चे त्याला प्रसिद्धी दिल्या बद्दल आभार आणि कौतुक ...

On 17/08/2011 12:41 PM प्रतिभा said:
आज देशात जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कॉंग्रेस वाले करत आहेत पण जनता आण्णा हजारे बरोबर आहे आणि हे कॉंग्रेस वाले पचवू शकत नाहीत म्हणून दंडुकेशाही वापरली जात आहे, इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले पण या दुसर्या स्वातंत्र्य पासून देशाला सुटका मिळेल ती पण खूप महत्वाची वाटते आज आपण जगात याच कारणाने मागे पडत आहोत म्हणून.

On 17/08/2011 12:41 PM Sameer,Nagpur said:
आम्ही गांधीजी पुस्तकात वाचले पण आण्णांच्या रूपाने त्यांना अनुभवत आहोत. जय हो ! वंदे मातरम !! ह्या नालायक साकारला खाली खेचा ह्यांचे आता अति झाले आहे .....

On 17/08/2011 12:37 PM sai said:
अतिशय सुंदर लेख आहे , आज खरच आपली लोकं जागी झालेली आहेत. जाग उठा है आज देश का वाह सोया अभिमान प्राची कि चंचल किरणो पर आया स्वर्ण विहान .. स्वर्ण प्रभात खिला घर घर मे जागे सोये वीर युद्ध स्थल मे सज्जीत होकार बढे आज रणधीर आज पुनः स्वीकार किया है असुरोंका आव्हान जाग उठा है आज देश का वाह सोया अभिमान भारतमाता कि जय.

On 17/08/2011 12:34 PM r v mangrulkar said:
आपण दुसरया स्वातंत्र्यासाठी लढत आहोत पण हा लढा फार कठीण आहे.इंग्रजांनी जे काही कमावले ते त्यांच्या देशासाठी त्यामुळे तो लढा इंग्रज विरुद्ध हिंदुस्तानी असा होता.आता लढा हा स्वार्थी स्वकीयान विरुद्ध आहे.त्यामुळे हिंदुस्तानींची एकजूट असणे महत्वाचे आहे.हे राजकारणी काही न काही तरी करून त्यांचा कार्यभाग पूर्ण करतील असे वाटते.महाभारताप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता लढावे लागेल.तरच या भ्रष्टाचारी राक्षसांवर विजय मिळवता येईल.

On 17/08/2011 12:33 PM Pralhad Patil said:
माझ्या मनातल लिहिलात राव पण सत्तेला चटावलेले हे लोक तशी खुर्ची सोडणार नाहीत . श्री कृष्णाने जसे कंसाला झिपर्या धरून सिंहासनावरून खाली ओढले आणि छातीवर बसून बुकलून ठार केले त्याच लायकीचे हे सुद्धा आहेत . आता वेळ आली आहे ह्यंना बुकलून ठार करण्याची . ज्याप्रमाणे रक्ताला चटावलेल्या वाघाला गोळीच घालावी लागते तसलेच हे सरकार आणि सर्वच राजकीय लोक आहेत .

On 17/08/2011 12:30 PM sameer inamdar said:
मला असे वाटते कि अन्ना विरुद्ध सरकार असे मतदान झाले पाहिजे. म्हणजे या भ्रष्ट सरकार ला समजेल कि जनतेला काय हव आहे. जर हे विधेयक पास झाले.(अन्ना ना हवे त्या अटी वर) तर आपण सर्वजन १ का वर्षात दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा करू.... जयहिंद!

On 17/08/2011 12:28 PM Sunil Pune said:
Best critisized artical.. Anna alone fighting againt these corrupted politician (they are missusing common men's money) for us and our future generatton. Govt now confused and afrading to face situation. They know they are correpted and fraud. सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" They are loosing their confidence to face all common indian's protest. Common India... Its time to make Big noise.. for Tranperent india

On 17/08/2011 12:28 PM Jai Ganesh said:
'sarakarache doke thikanavar aahe kay',Jantar-mantarachi chaval,JP Parkche uposhan,lathimar,morcha kharach hi tar navin swatantrachalavalichi nandi nahina. Nakkich bharat sarakar britishanchya ammala khali kam karate ahe.far motha swatyantra sangra honar ahe ha. congressla desh sodun bretain la paalun jawe lagnar.

On 17/08/2011 12:24 PM dk said:
अतिशय उत्तम विचार आण्णा हजेंचा विजय असो !!! जय हिंद !!!

On 17/08/2011 12:23 PM shantaram said:
तो सगळे पैसे परत भारतात परत आले तर खरोखर आपण खूप जोरदार विकास करू शकतो. अनांनी सुरु केलेल्या या लढ्यामुळे सगळे भ्रष्टाचारी घरात लपून बसले आहेत. पैसे खाता आणि परत मताची भिक पण मागतात. जय हो लोकपाल!

On 17/08/2011 12:21 PM poonam said:
खूप सुंदर लेख! माझ्या मते हा लेख माननीय पंत प्रधान आणि त्यांच्या सहकार्यांनी जरूर vachava......

On 17/08/2011 12:17 PM sarang said:
खूपच छान विश्लेषण .. शब्दातून सुधा चीड दिसत आहे .. चेहरा बघण्याची गरज नाही. आताच पंतप्रधान (बोलका बहुला) संसदेमध्ये वक्तव्य करून गेले कि संसदेपेक्षा देशात काही मोठे नाही .. अरे संसद दगडी इमारत आहे त्यात बसलेल्याला लोकांना या चिडलेल्या रस्त्यावर उतरलेल्या जनतेने निवडले आहे मग संसद श्रेष्ठ कशी ? आणि मनमोहन स्वतः निवडून आले नाहीत ते आशीर्वादाने आले आहेत त्यांना म्हण्याचे असेल १० जनपथ जगात सर्व श्रेष्ठ आहे .. चुकीने दुसरे काही तरी बोलले

On 17/08/2011 12:16 PM hari said:
अप्रतिम लेख आहे. तुमचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे....

On 17/08/2011 12:15 PM Ashok said:
भ्रष्टाचार हा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे व त्याला कॉंग्रेसचे सरकार जबाबदार आहे. या देशातील बरेचसे राजकीय नेते भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे या देशात महागाई वाढली असून सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुले या परिस्थितीत अण्णा हजारेना पाठींबा देऊन त्यांनी सुरु केलेल्या क्रांतीला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे.

On 17/08/2011 12:15 PM Anoop said:
कॉंग्रेस संपायची आता वेळ आली आहे आणि सर्वच पोलीतीकाल मेक ओवेरची भारताला आज नितांत गरज आहे.

On 17/08/2011 12:12 PM Shrihari Kulkarni said:
Criticism of Anna Hazare's movement must get backfired on the government when Cabinet ministers were asked at a briefing if there was one set of standards for Congress scion Rahul Gandhi and another for the Gandhian. Rahul had violated Section 144 of CrPC in Uttar Pradesh when he visited the villages of Bhatta-Parsaul earlier this year. The move was not just supported by the Congress but was positioned as the party lending its voice to the 'aam aadmi'.

On 17/08/2011 12:05 PM sadashiv Pethi said:
एक सूर, एक ताल... जनलोकपाल

On 17/08/2011 12:05 PM Vijay Raichurkar said:
महात्मा अण्णा हजारे कि जय !!! , अण्णा या लढया मध्ये तुम्ही एकटे नाहीत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत . करो या मरो. भारत मत कि जय ,वंदे मातरम. काले इंग्रज गादी/संसद छोडो .

On 17/08/2011 12:02 PM sameer punekar said:
पेटी आणि खोका याच्या बरोबर आता "टाकी'" हा शब्द प्रचलीत आहे , आणि लेखक महाशयांनी अण्णांना देव वगैरे बनवण्याच्या फालतू लफड्यात पडू नये असे मला प्रामाणिक पणे वाटते कारण महापुरुष हे महापुरुषाच असावेत त्यांना देव बनवल्याने त्यांचे अनुकरण करता येत नाही! आणि स्वतः अण्णा सुद्धा अश्या खुळचट गोष्टींवर विश्वास ठेवत नाही .

On 17/08/2011 12:00 PM Guru said:
khup chan aani mojakya shabdat sarvsamanyachya bhvana mandlya ahet. sarv bhartiy (samanya) swamanane rastyavar ale ahet, ya sarkarla thada shikvayala.

On 17/08/2011 12:00 PM Sharad said:
अप्रतिम लेख.. खूप आवडला..!!

On 17/08/2011 11:56 AM ajay said:
एक नंबर लेख आहे ...वाह वाह .... "आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी." --रामबाण वाक्य ....

Thursday 11 August 2011

इंडोनेशियन भाषेवरील गीर्वाणवाणीची छाप

लेखक व संकलक - सुधीर काळे, जकार्ता
हा लेख ’ई-सकाळ’च्या "पैलतीर" या सदरात प्रसिद्ध झाला आहे. वाचकांच्या प्रतिक्रियाही वाचण्यासारख्या आहेत. दुवा आहे: http://www.esakal.com/esakal/20110615/5124682573298412566.htm
मी जेव्हा इंडोनेशियाला पहिल्यांदा आलो तेव्हा येथील संस्कृतीवरील हिंदू धर्माची छाप व त्यांच्या भाषेतली (या भाषेला Bahasa Indonesia म्हणतात. इथेही Bahasa हा शब्द 'भाषा'वरूनच आला आहे). संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो. आपल्या पूर्वजांनी प्रवासाच्या आजच्यासारख्या सोयी नसतानाही इतक्या दूर प्रवास करून, इथे प्रथम बौद्ध धर्मावर (श्रीविजय) आधारित आणि त्यानंतर हिंदू धर्मावर (मोजोपाहित) आधारित साम्राज्ये स्थापली व पुढे इथल्या बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतरही हिंदू धर्माची छाप आजही इथे-विशेषतः मध्य व पूर्व जावा भागात-दिसून येते. आजही इथले मुस्लिम लोक रामायण-महाभारतावर आधारित नाटके, एकांकिका सादर करतात. आजही आपल्याला विष्णू (Wisnu) हे नाव असलेले मुस्लिम लोक भेटतात. घटोत्कच (गटोट) तर एकदम लोकप्रिय! अर्जुन, भीम (Bima), धर्म (Dharma), लक्ष्मण (इथे या शब्दाला एक नावाव्यतिरिक्त एक आणखीही अर्थ आहे, तो म्हणजे दर्यासारंग-Admiral!), सीता इथे सिता म्हणून वावरते, श्री (Sri) हे नाव आजही तुफान लोकप्रिय आहे व ५-१० टक्के मुलींचे नाव 'श्री' असते.

आता इंडोनेशियन भाषेतील संस्कृत शब्दांकडे वळू या. असे मी वाचले आहे, कीं इंडोनेशियन भाषेने जवळ-जवळ २० टक्के शब्द संस्कृत भाषेतून घेतले आहेत. आता खाली मी मला आतापर्यंत वापरून माहीत झालेले शब्द दिले आहेत. वापरायला आणि शोधायला सोपे जावे म्हणून त्यांची मुळाक्षरांनुसार (alphabetical order) रचना केली आहेत. यापुढे आणखी शब्द आठवतील तसे वेळोवेळी घालेन व ते ठळक अक्षरात असतील.


ही माहिती इथल्या वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
Acar (आचार) - लोणचे
Angkasa अंकसा - अवकाश [Outer space]
Anugerah, Nugraha (अनुगरा, नुग्राहा) - अनुग्रह
Arjuna (अर्जुना) - अर्जुन, महाभारतातील नांव
Arti (आर्ती) - अर्थ या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ तोच आहे meaning (आपा अर्तिन्या? म्हणजे What does it mean?)
Aryaduta (आर्यादूता) खाली ’Duta’ पहा. या नावाचे हॉटेल जकार्तात आहे
Atau (आताउ) - अथवा
Bagi (बागी) भागणे
Bahagia (बहागिया) - 'भाग्य'वरून आलेला शब्द. पण अर्थ आहे 'आनंदी'!
Bahagiawan-भाग्यवान
Bahasa (बाहासा) - भाषा
Bahaya (बाहाया) - 'भय'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ तोच! भय, धोका!
Bahayangkara (बायांकारा) - भयंकर या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे पोलिस. आहे ना सार्थ शब्द?
Bahu (बाहू) - बाहूवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र खांदा!
Bangsa (बांग्सा) - हा शब्द वंश या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे Nationpeople, race! पण खाली दिलेले negara व negeri हे शब्दही पाहा
Bapak (बापा) - शेवटच्या 'क'चा उच्चार करत नाहींत. बाप, वडील पण जास्त करून वडिलांसाठी आया (ayah) हा शब्द वापरला जातो. bapak जास्त करून आदरार्थी 'श्रीयुत' म्हणून वापरतात
Barat (बारात) - भारत या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पश्चिम
Basmi (बास्मी) नायनाट करणे (उंदीर, डांस वगैरे). एखाद्या रोगाचे निर्मूलन करणे, एखादी गोष्ट जाळून भस्म करणे ’भस्म’वरून आलेला शब्द
Biaya (बिआया/बियाया) - व्यय खर्च cost
Bijaksana (बिजाक्साना) Wise, farsighted, prudent, tactful, discreet kebijaksanaaan - कबिजक्सनाआन - wisdom, prudence
Biji (बिजी) Seed बीज, अंडाशय
Biksu (बिक्सू), Biksuni (बिक्सूनी) - भिक्षू, बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी (का भिक्षुईण, nun)
Bima (बीमा) - महाभारतातील नाव. डॉ. वर्तक यांनी लिहिलेले भीम हा अतिशय बांधेसूद व चपळ पुरुष होता, असे प्रतिपादन करणारे एक पुस्तक माझ्या वाचनात आलेले असले, तरी आपल्या डोळ्यासमोर भीमाची प्रतिमा एका स्थूल पुरुषाची असते. इंडोनेशियात मात्र तो एक चपळ पुरुष मानला जातो व इथल्या डेक्कन क्वीनला Bima Express म्हणतात
Bisa (बिसा) Poison (It also means 'can'; saya bisa lihat: I can see)
Buana (बुआना) - 'भुवन'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ घर नव्हे पण जग, त्रिभुवन!
Budi (बुदी) - बुद्धी या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र 'विचार' असा आहे! पण बुदीमान म्हणजे मात्र बुद्धीवान (wise, prudent, sensible)
Bupati (बूपाती) - 'भूपती'वरून आलेला शब्द. अर्थ आहे जिल्हाधिकारी, District collector
Busana (बुसाना) 'भूषण'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे कपडे, दागिने
Candra (चांद्रा) - चंद्र. खूप पुरुषांचे नाव Candra/Condro असते
Candrasangkala (चांद्रासांगकाला) Lunar calendar सांग हा शब्द आदरार्थी वापरतात. उदा. 'सांग द्विवर्ना' हा शब्द दुरंगी राष्ट्रध्वजासाठी वापरतात
Catur (चातुर) - चतुर? अर्थ आहे ’बुद्धिबळ’
Cempaka - (चंपका) - चाफा
Cenderamata - चंदरामाता Souvenir (शब्दशः अर्थ चंद्राचे नेत्र!)
Cenderawasih - (चंदरावासी) Bird of paradise
Cerita (चरिता) - 'चरित्र'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थही तोच आहे. story, narrative, account of an event
Cinta (चिंता) - चिंता या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रेम असा आहे. चिंता सायांग म्हणजे love and affection
Cita (चिता) - feelings
Citra (चित्रा) - चित्र, image
Dada (डाडा) - बहुदा ’धड’ या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे 'छाती'
Desa (देसा) - आलाय देश या शब्दावरून, पण अर्थ खेडे!
Deva (देवा) - देव
Dharma (धार्मा) - महाभारतातील नांव (शिवाय duty, obligation, service, good deed पुण्य but not exactly religion)
Dhupa (धूपा) - धूप म्हणजे अगरबत्ती!
Dosa (दोसा ) - ’दोष’ वरून आलेला शब्द, पण बहासा इंडोनेशियात अर्थ आहे ’पाप-sin'
Duka (दुका) - दु:ख
Dukacita (दुकाचिता): दु:खचित्त profound sorrow
Duta (दूता) - दूत, राजदूत, ambassador - दूता बसार (मोठा दूत) Kedutaan (कदूताआन) म्हणजे Embassy
Dwi (द्वी) - द्वी. द्वीवार्ना म्हणजे इंडोनेशियाचा लाल-पांढरा द्विरंगी झेंडा (सांग द्वीवार्ना)
Gada (गादा) गदा
Gajah (गाजा) - गज, हत्ती
Gapura (गापूरा) - गोपूर
Garuda (गारुडा) - गरुड. गंमत म्हणजे भारताला आपल्या अधिकृत एअरलाईनचे नाव 'गरुड' असे ठेवायची हिंमत झाली नाहीं, पण इंडोनेशियाच्या अधिकृत एअरलाईनचे नाव आहे Garuda Indonesian Airways!
Guna (गुना) - गुण, उपयोग (आपा गुना न्या-त्याचा काय उपयोग?), गुनावान हे नाव 'तुफान' लोकप्रिय आहे!
Guru (गुरू) तोच अर्थ!
Gatot गटोट - घटोत्कच. महाभारतातील तुफान लोकप्रिय नांव
Indra (इंद्रा) इंद्र (हे नावही खूप लोकप्रिय आहे)
Isteri (इस्तरी) - स्त्रीवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. स्त्रीला 'परंपुआन (perempuan) असा वेगळा शब्द आहे. puan (पुआन) म्हणजे 'बाईसाहेब' असा आदरार्थी शब्द
Jaya (जाया) - अर्थ आहे ’की जय’! 'इंडोनेशिया जाया' म्हणजे 'इंडोनेशियाकी जय'! १५२७ साली पोर्तुगिजांचा पराभव करून त्यांना त्यांच्या आरमारासह 'कलापा सुंडा' या बंदरामार्फत हाकलून दिल्यानंतर आमच्या शहराचे 'जयाकार्ता' असे पुनर्नामकरण करण्यात आले त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे जकार्ता झाले
Jelma - (जल्मा) Incarnation/जन्म, creation, transformation, assume a form
Jelamber (जलांबर)
Jiwa (जीवा) - जीव या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आत्मा किंवा लोकसंख्या 'बरापा जीवा' म्हणजे किती (सजीव) लोक!
Kaca (काचा) कांच
Kala (काला) Time, Era, Period
Kelahi (कलाही) भांडण. हा शब्द 'कलह' या संस्कृत शब्दावरून आलेला आहे
Kalpataru (काल्पातारू) - कल्पतरू, अर्थ तोच
Karena (कारना) अर्थ 'कारण' मी उशीरा आलो Karena गाडी लेट आली
Karunia (कारुनिया) - कारुण्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र ’बक्षीस, भेटवस्तू’ असा खूप वेगळा आहे!
Karyawan/wati (कार्यावान.वाती) - कार्यवान/वती, कामगार
Kepala: (कपाला) कपाळ, डोकं. एकाद्या खात्याचा प्रमुख असतो kepala bagian
Kirana (किराना) किरण
Kota कोटा म्हणजे शहर (कोट हा संस्कृत शब्द आहे का?)
Kusuma (कुसुमा): कुसुम, फूल
Laba (लाबा) Profit, benefit, gain ’लाभ’वरून आलेला शब्द.
Laksamana (लाक्सामाना): लक्ष्मण पण दर्यासारंग (Admiral) या अर्थाने जास्त वापरतात.
Laksana (लाक्साना): लक्षण, पण अर्थ आहे जरासा तिरकस quality, characteristic, किंवा 'सारखा' (like, resembling)
Maha esa (महा एसा) हा शब्द बहुदा महेश वरून आलेला आहे. अर्थही सर्वश्रेष्ठ असाच आहे. साधारणपणे 'अल्ला' (देव) ला तुहान यांग (जो) महा एसा म्हणतात
Malas (मालास) - Lazy, not inclined to do something 'आळस' वरून आला असावा!
Mega (मेगा) - मेघ, इंडोनेशियाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षेचं नांव आहे 'मेगावाती सुकार्नोपुत्री'
Mentri मंत्री
Mulia (मुलिया) - मूल्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे थोर, उच्च कुळातला nobleman थोडक्यात ’मौल्यवान’
Nada (नादा) - Intonation, tone, note, pitch of sound/voice
Nadi (नाडी) - नाडी, pulse, artery (पायजम्यातल्या नाडीला मात्र 'ताली-Tali' म्हणतात)
Nama (नामा) - तोच अर्थ
Negara (नगारा) - देश तामू नगारा=शाही पाहुणा (state guest)
Negarawan (नगारावान) - Statesman
Negeri (नगरी) - country, land, village
Neraka (नराका) - नरक
Paduka पादुका पण अर्थ आहे Excellency. साधारणपणे ’श्रीपादुका’ (His Excellency)म्हणतात
Panca (पांचा) - पंच, पाच
Paramaisuri - (परामाईसुरी) - त्रैलोक्यसुंदरी
Paripurna पारिपुर्ना (अर्थ जवळ-जवळ तोच आहे. 'संपूर्ण'. पण विशेषकरून राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाच्यावेळी जेंव्हा लोकसभा व राज्यसभा यांच्या एकत्र सत्राला (Joint session of the House) संबोधित करतात अशावेळी हा शब्द खासकरून वापरला जातो
Pekaja (पकाजा) Lotus ’पंकज’वरून आलेला शब्द
Pendeta (पंडेता) - पुरोहित, भटजी
Perdana Menteri (परदाना) - प्रधानमंत्री
Peristiwa- (परिस्तिवा) incident, phenomenon , ’परिस्थिती’वरून आलेला शब्द!
Perkara (परकारा) matter, Lawsuit 'प्रकार'वरून आलेला शब्द
Pertama (परतामा) - प्रथम अर्थ तोच. Pertama-tama (परतामातामा)-सर्वात आधी, at the outset
Pidana - Criminal, punishment 'पीडा'वरून आलेला शब्द
Prambanan (प्रंबानान) परब्रह्म. या नावाचे हिंदू देव-देवतांचे प्रसिद्ध देऊळ जोगजकार्ताजवळ आहे
Prasaran (प्रासारान) Introductory 'प्रस्तावना'वरून आला असावा!
Prasarana (प्रासाराना) Preparatory Work, infrastructure
Puasa (पुआसा) - उपवास. रमजान महिन्याला 'बुलान पुआसा' म्हणतात
Pucat (पुचाट) - (अक्षरशः) भीतीमुळे वा आजारपणामुळे म्लानता आलेला, पांढराफटक पडलेला चेहरा!
Purbakala (पुर्बाकाला) - पूर्वकाल अर्थ तोच
Purna, पूर्ण झालेला Purnayudha म्हणजे सेवानिवृत्त सेनाधिकारी
Putra/i (पुत्रा-पुत्री) - पुत्र-पुत्री. या शब्दांचा अर्थ राजपुत्र/राजकन्या असा होतो. म्हणून दुसर्‍यांच्या मुलांबद्दल चौकशी करताना हा शब्द आवर्जून वापरतात
Rahasia (राहासिया) - रहस्य, mystery किंवा confidential या दोन्ही अर्थाने वापरतात
Rajah/Maharajah - अर्थ व उच्चार तोच
Raksasa (राक्सासा) - राक्षस किंवा (आकाराने) प्रचंड
Rama (रामा) राम (प्रभू रामचंद्र)
Rasa (रासा) - रस या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र -फक्त चवच नाहीं तर भावनासुद्धा-रासा सायांग-प्रेमभावना! 'saya rasa' म्हणजे I feel)
Rupa (रूपा) - रूप या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र सौंदर्य नव्हे तर form, shape, sort, kind! सरूपा म्हणजे एकासारखा/खी. पण रूपावान म्हणजे सुंदर, पण सुंदारी हा शब्द फक्त स्त्रियांसाठी वापरतात जणू सुंदर पुरुष नसतातच. खरं तर इंडोनेशियात सुरेख दिसणारे पुरुष तूलनेने कमीच आहेत!
Rupiah (रुपिया) - इंडोनेशियाचे चलनसुद्धा 'रुपिया Rp.' (not Rs)
Sahaja (साहाजा) Simple, natural, on purpose 'सहज'वरून आलेला शब्द
Samudera (सामुदरा) Ocean, Sea,
Sangka (सांका) शंका, suspicion (Tersangka: suspect, Prasangka: Prejudice)
Santai (सांताई) Relaxed 'शांत'वरून आलेला शब्द.
Sastra (सास्त्रा) शास्त्र, अर्थ आहे books, literature
Sastrawan/Sastrawati (सास्त्रावान/सास्त्रावाती) - Man/woman of letters शास्त्रीजी किंवा शास्त्रीणबाई
Saudara/ri (सौदारा/री) - 'सहोदर'वरून आलेला शब्द, पण अर्थ नातेवाईक. पण सौदारा सकांडुंग - एका गर्भाशयाचे म्हणजेच सख्खा भाऊ/बहीण (कांडुंग - गर्भाशय)
Sederhana (सदरहाना) 'साधारण'वरून आलेला शब्द. Simple, plain, unpretentious या नावाची उडपी टाईपच्या हॉटेल्सची चेन आहे. ही हॉटेले 'साधारण'च असतात.
Sedia (सडिया) तय्यार! Ready साधारणपणे भेळपुरी प्रकाराच्या खाण्याच्या गाड्यांवर हा शब्द हायला मिळतो. ’सध्या’वरून आलेला असणार
Segera (सगरा) - शीघ्र अर्थ तोच
Sempurna (संपुर्ना) - संपूर्ण, पूर्ण अर्थ तोच
Sendi (संदी) - सांधे, hinge
Senggama (संगामा) - संगम या शब्दावरून आलेला हा शब्द मात्र फक्त शरीरसंगमासाठी किंवा संभोग या अर्थानेच वापरतात
Sentosa (संतोसा) - संतोषवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे शांती, peaceful, tranquil सिंगापूरचे संतोसा बेट कांहींनी पाहिले असेल!
Serapah (सरापा) - श्राप, शाप (तोच अर्थ)
Serasi (सरासी) - सराशी एका राशीचे. Harmonious, matching, compatible
Setia (सतिया): सत्य पण अर्थ मात्र loyal. Setia kawan = निष्ठावान मित्र, setiabudi (सतियाबुदी, सत्यबुद्धी)=निष्ठायुक्त विचार असणारा! budi म्हणजे बुद्धी नसून 'विचार'
Singga (सिंगा) सिंह
Sinta (सिंता) (रामाची) सीता
Sisa (सीसा) शेष, शिल्लक),
Surakarta (सुराकार्ता Solo) - जावा बेटाची सांस्कृतिक राजधानी सोलो या शहराचे नाव सुराकार्ता (देवांचे शहर) याचा अपभ्रंश आहे
Sopan (सोपान) - सोपान सज्जन, well-behaved, well-mannered
Sri (or Seri) - श्री. अर्थ आहे 'राणीसाहेबा' असे संबोधन! (खाली पाहा पादुका, स्रीपादुका) Honorific royal title, shining splendour. ५ ते १० टक्के मुलींचे नाव श्री असते
Srikandi (स्रीकांडी) - कदाचित् शिखंडीवरून आलेला असेल, कारण अर्जुनाची बायको व नायिका (heroine) असे दोन अर्थ आहेत
Suami (सुआमी) - स्वामी, नवरा,
Subroto (सुब्रोतो) - सुव्रत. हे नांवही खूप लोकप्रिय आहे.
Suci, Buku Suci (सुची) - शुची. कुराण या पवित्र ग्रंथाला 'बुकु सुचि' (Holy book) म्हणतात
Suka (सुका) सुख या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ सुख असा तर आहेच पण आवडणे असाही आहे. पण सुकाआन (sukaan) म्हणजे प्रिये, प्रियतमे असा आहे (sweetheart, darling)!
Surga (सुर्गा) - स्वर्ग
Surgawi (सुर्गावी) - स्वर्गीय
Surga dunia (सुर्गादुनिया) - भूलोकीचा स्वर्ग
Susila/lo (सुसीला/लो) - सुशील अर्थ तोच! इंडोनेशियाच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे सुसीलो बंबांग युधोयोनो, म्हणजे तीनातले दोन शब्द संस्कृत!
Sutra (सूत्रा) - सूत्र, पण अर्थ आहे रेशीम (silk)
Suwarna (सुवार्ना) - सुवर्ण, अर्थ तोच
Tapa (तापा) - तप, अर्थ तोच. (Bertapa=तपश्चर्या करणे)
Teruna, taruni (तरुना, तारुनी) - तरुण-तरुणी, पण खास करून लष्करी 'कॅडेटस'साठी वापरत्तत. आपण जवान म्हणतो तसेच
Telaga (तलागा) - तलाव (कदाचित तमिळ भाषेवरून)
Tembaga (तंबागा) - तांबे
Tetapi/Tapi (ततापी/तापी) - अर्थ तोच! तथापी, परंतू
Tirta (तिर्ता) पाणी
Tirta Amerta तिर्ता अमर्ता ('अमृत'वरून आलेला शब्द)
Tirta Kencana (तिर्ता कंचाना) सुवर्णजल
Tri (त्री) - त्रि. इथे चक्क त्रिसाक्ती-त्रिशक्ति नावाचे विद्यापीठ आहे व १९९८ मध्ये सुहार्तोसाहेबांना खाली उतरवायला इथल्या घटनाच कारणीभूत झाल्या
Ujar (उजार) - उच्चारणे (To state, to say)
Umpama (उंपामा) - उपमा (उंपामान्या म्हणजे उदाहरणार्थ)
Upaya (उपाया) - उपाय या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रयत्न, साधने असा आहे. याला काय उपाय (solution) असा नाहीं
Usia (उसिया) - आयुष्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र वय. tutup usiya म्हणजे आयुष्य बंद करणे म्हणजे मृत्यू
Wahana (वाहाना) Vehicle, Vehicle for conveying thoughts ('वाहन'वरून आलेला शब्द)
Wanita (वानिता) - वनिता, स्त्री
Warna (वार्ना) - वर्ण, रंग.
Pancawarna - पंचरंगी, पंचवर्णी
Wibava, Wibowo (विबावा, विबोवो) - वैभववरून आलेला असावा, पण अर्थ मात्र Authority, power
Wibisono (विबीसोनो) - (बिभीषण इथल्या पुरुषांचे नाव असते)
Wicoksono (विचोक्सोनो) - हेही इथल्या पुरुषांचे नाव असते
Widya (विदिया) - विद्या
Widyakarya (विदियाकार्या) - विद्याकार्य, University-level work study
Widyawisata (विदियाविसाता) - विद्याविसाता, Study tour
Wijaya, Widjaja, Widjojo (विजाया, विजोयो) - विजय. बर्‍याचदा एकाद्या नावाचे शेपूट म्हणून येते. Wijojo Nitisastro (नीतिशास्त्र) was a very eminent economist of Indonesia. (इथले धनंजयराव गाडगीळ!)
Wira (वीरा) - वीर. अर्थ तोच
Wisnu विष्णू. देवाचे नाव. या नावाची वयस्क मुस्लिम मंडळीही भेटतात
Yudha (युधा) - युद्ध, अर्थ तोच war. महाभारताला इथे 'भारातायुधा' असेही म्हणतात'पुर्नायुधा' म्हणजे निवृत्त सेनाधिकारी/सैनिक, veteran
Samudera (समुदरा) - समुद्र!

उर्दू शब्दही खूप आहेत, कदाचित अरबी किंवा फारसी शब्दावरून आले असतील: प्याला (पियाला-चषक पियाला दुनिया-World Cup), मेजा टेबल, कुर्सी-खुर्ची, पण यावर एक वेगळा लेखच होईल.