Sunday 12 January 2014

पाक जनतेचे मूळ हिंदू-बौद्ध की अरबी?


पाक जनतेचे मूळ हिंदू-बौद्ध की अरबी?(पैलतीर)
शुक्रवार, 6 डिसेंबर 2013


मूळ लेखक: नदीम फरूक पराचा, अनुवादक: सुधीर काळे, जकार्ता
1973 मध्ये माझे (म्हणजे मूळ लेखक नदीम फरूक पराचा यांचे) आजोबा 'दादाजी' हज यात्रेसाठी मक्केला गेले होते. त्यांच्याबरोबर माझी आजी, तिच्या दोन बहिणी आणि त्यांचे पतीही होते. जेद्दाला पोचल्यावर त्यांनी विमानतळापासून टॅक्‍सी केली आणि हॉटेलकडे निघाले. त्यांचा टॅक्‍सीचालक एक सुदानी होता. आजी-आजोबा आणि एक बहीण टॅक्‍सीत स्थानापन्न झाल्यावर त्याने गाडी सुरू केली आणि त्याच्या जपानी कॅसेट प्लेअरवर अरबी भाषेतील गाण्यांची टेप लावली. माझे आजोबा चालकाच्या शेजारच्या सीटवर बसले होते. त्यांनी पाहिले, की चालक वारंवार मागे पाहण्याच्या आरशात पाहत होता आणि प्रत्येक वेळी त्याला आश्‍चर्य वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. आजोबांना खूप कुतुहल वाटू लागले; म्हणून त्यांनी मागे वळून चालकाला आश्‍चर्य वाटण्यासारखे काय चालले आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाहिले, की माझी आजी डुलक्‍या घेत होती; पण तिची बहीण डोळे मिटून गाण्याच्या तालावर आपले डोके डावीकडे-उजवीकडे हलवत होती व तोंडाने 'सुभानअल्ला.. सुभानअल्ला' हे अरबी धार्मिक वाटणारे शब्द उच्चारत होती. माझ्या आजोबांना अरबी भाषा थोडीफार समजत होती. त्यावरून त्यांच्या लक्षात आले होते, की गाडीमध्ये चालकाने लावलेले गाणे अनेक मुलींना नादी लावून फसविलेल्या इजिप्तच्या एका प्रेमवीराने म्हटलेले होते. पण हे माहित नसल्याने आजीची बहीण ते गाणे 'भक्तीगीत' आहे असे समजून दाद देत होती. चालकाला पंजाबी समजत नाही, याची खात्री करून घेण्यासाठी त्याच्यावर एक डोळा ठेऊन आजोबांनी अतिशय नम्रतीने आजीच्या बहिणीला म्हटले, 'तुम्हाला गाण्यात इतके गम्य आहे, हे माझ्या गावीही नव्हते!

'
छे हो.. पण गाणं किती छान आहे.. नाही का?''
या संभाषणाने आजी जागी झाली आणि तिने विचारले, "काय छान आहे?'' बहिणीने त्या कॅसेट प्लेअरकडे बोट केले आणि म्हणाली, "हे गाणं किती शांत आणि धार्मिक आहे ना!''
आजोबा तोंडावर हात ठेऊन खो-खो हसू लागले आणि म्हणाले, "ताई, हा गायक कुठल्याही पवित्र ओळी गात नसून आपल्या विलासी गतजीवनाबद्दल गात आहे.'' आजीही हसू लागले. दरम्यान तिच्या बहिणीचे धार्मिक स्मितहास्य मावळले आणि तिथे अगदी गोंधळलेले भाव दिसू लागले.
'अग बाई! काहीतरीच काय?'
"ताई, अरबी लोक नेहमी धार्मिक किंवा पवित्र पंक्तीच गात फिरत असतात असे नाही. ते बाजारात भाजीपाला किंवा फळे खरेदीला किंवा इतर काही विकत घ्यायला जातात, तेव्हा कुराणातल्या पंक्ती थोडेच म्हणतात?'' माझ्या आजीच्या बहिणीच्या लक्षात आले, की अरबी भाषेतील सारेच काही धार्मिक नसते.
त्यावेळी मी वयाने अगदी छोटा होतो. तरीही माझ्या आजोबांनी ही गंमतीदार गोष्ट खुलवून-खुलवून खूपदा सांगितलेली आठवते. तसे पाहिले, तर दोन वेळा हजची यात्रा केलेले माझे आजोबा खूपच धार्मिक आणि सनातनी होते; पण त्यांनी कधीही हनुवटीवर दाढी ठेवली नाही आणि त्यांना अरबांबद्दल-खास करून राजेशाहीविषयी आस्था, फार जवळीक वाटत नसे. उलट त्यांना 1947 च्या फाळणीपूर्वीच्या भारतामधील उत्तर पंजाबमधल्या आपल्या छोट्या जन्मगावाविषयी अभिमान होता.
1980
च्या सुरवातीला पाकिस्तानच्या संस्कृतीवर आणि राजकारणावर सौदी पैशांचा आणि सौदी प्रभावाचा विळखा बसू लागला, तेव्हापासून पाकिस्तानमधील अनेक कुटुंबे, खास करून पंजाबी कुटुंबे आपला इतिहास नव्याने लिहू लागली. उदाहरणार्थ, ज्या कुटुंबांचे, कुळांचे मूळ भारतीय उपखंडात होते, ती कुटुंबे आणि कुळे 'आपण अरबस्तानातून आलो' असा दावा करू लागली. आमच्या पराचा कुळातही असाच प्रकार घडला. 1982 मध्ये माझ्या आजोबांच्या आते-मामे भावंडांपैकी एकाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये 'पराचा' कुटुंबाचा प्रथमोल्लेख येमेनमधील असून त्या कुटुंबीयांनी तेथे पैगंबरांच्या काळातच मुस्लिम धर्मात प्रवेश केला होता, असे प्रतिपादन केले होते. पण सत्य हेच आहे, की इतर पाकिस्तानी जनतेप्रमाणेच पराचा कुटुंबीयही पूर्वी हिंदूधर्मीय किंवा बौद्धधर्मीय होते आणि अकराव्या ते पंधराव्या शतकांच्या दरम्यान सुफी संतांच्या प्रभावामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. या पुस्तकाच्या लेखकाने एक प्रत माझ्या आजोबांना भेटीदाखल दिली, तेव्हा त्यांनी या दाव्याला केराची टोपली दाखवत मला सांगितले, की या पुस्तकामुळे त्या लेखकाला एकवेळ भरपूर 'सौदी रियाल' मिळतील (*1) पण ऐतिहासिकतेच्या, विश्‍वासार्हतेच्या मानदंडानुसार या पुस्तकाची किंमत शून्यच आहे. पण असुरक्षिततेने पछाडलेल्या पाकिस्तानसारख्या देशात ऐतिहासिक अचूकपणाला आणि विश्‍वासार्हतेला फारशी किंमत कुठे उरली आहे? कारण, या देशाला व त्याच्या नागरिकांना अद्याप आपली राष्ट्रीय वा सांस्कृतिक अस्मिता काय आहे, याबद्दल काहीच पक्की कल्पना नाही.
19व्या शतकातील मोंगल साम्राज्याच्या पाडावानंतर आणि 1947 च्या फाळणीनंतर ते 1960 पर्यंत पाकिस्तानी लोक या भागातील इतर धर्मियांपासूनचे आपले वेगळेपण मोंगलांच्या काळातील दरबारात रुळलेल्या फारसी संस्कृतीच्या पैलूंच्या साधर्म्यात पाहत असत. पण 1971 च्या पूर्व पाकिस्तान युद्धातील दारूण पराभवानंतर पाकिस्तान सरकारने सनातनी इतिहासकारांच्या आणि मुल्ला-मौलवींच्या सहाय्याने हिंदू आणि फारसी संस्कृतीपासून फारकत घेण्याचा आणि जाणीवपूर्वक स्वत:चे नाते दंतकथांच्या आधारे आणि वरवरच्या दुव्यांच्या सहाय्याने अरबांशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला.

या उपक्रमाला गती मिळाली, ती 1980 च्या दशकात. यावेळी पाकिस्तानमध्ये अरबस्तानातील राजेशाह्यांकडून दुथडी भरभरून वाहणारा पेट्रो-डॉलर्सचा ओघ आणि पाकिस्तानी लोकांची त्यांना नोकरी-धंदा देणाऱ्या अरबी मालकांशी वाढती घसट यामुळे पाकिस्तानी इतिहास आणि पाकिस्तानी अस्मिता पूर्णपणे बदलून गेली.
थोडक्‍यात, आपले राष्ट्रीयत्व या मातीत मुळे असलेल्या व या भागातील मुस्लिम लोकांच्या ऐतिहासिकदृष्ट्या अचूक समाजशास्त्रावर आधारलेले असायला हवे व अशा राष्ट्रीयत्वाच्या पाठीशी आपण आपली बौद्धिक साधनसंपत्ती उभी करायला हवी. पण आपण एका अस्तित्वात असलेल्या सांस्कृतिक साम्राज्यवादाच्या जागी एक नवीन आयात केलेला सांस्कृतिक साम्राज्यवाद लादण्याचा प्रतिरोधी प्रयत्न केलेला आहे! उदाहरणार्थ, पेट्रो-डॉलर्स मिळविण्यासाठीच्या पूर्वावश्‍यकता व अटी पाळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानी संस्कृतीवर असलेला हिंदू आणि पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा हटवून त्या जागी अरबी संस्कृतीचे वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्न केले गेले.
आपला इतिहास विभिन्न धार्मिक व वांशिक संस्कृतींपासून घडलेला आहे. या संस्कृतींच्या बारीक-बारीक बाबी आत्मसात करून व या बाबींचा समन्वय साधून, खंबीर आणि जास्त विश्वसनीय अशी आपली राष्ट्रीयता व सांस्कृतिक ओळख बनविली असती तर ते जास्त श्रेयस्कर झाले असते. पण बहुविध समाजसंस्थेवर आणि विभिन्नतेवर अधारलेला आपला इतिहास झिडकारून आपण आता अरबी संस्कृतीचा स्वीकार करत आहोत. गमतीची गोष्ट अशी, की ही अरब मंडळी अरब नसलेल्या पाकिस्तानी व आपल्यासारख्या या भागातील इतर मुसलमानांना दुय्यम दर्जाचे मुसलमान मानतात!
======================
टीप:
(*1) '
सौदी रियाल' हे सौदी अरेबियाचे चलन आहे.
पराचा यांचा मूळ इंग्रजी लेख 'डॉन' या पाकिस्तानी प्रसिद्धीमाध्यमाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. तो खालील दुव्यावर वाचता येईल. पराचा यांची परवानगी घेऊन हा लेख अनुवादित केला आहे.
http://www.dawn.com/news/1032519/my-name-is-pakistan-and-im-not-an-arab
या लेखाला वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामध्ये माझाही एक प्रतिसाद आहे :
K B Kale July 30, 2013
Kudos to Nadeemsahab for a wonderful article. I have been working in Indonesia for some 18+ years. As many of you may be knowing, Indonesia has world's biggest Muslim population, about 94% of its 250 millions! As I was interested in the history of Indonesia which I call my second home, I bought a book on its history in English by a Dutch author. According to this book, Islam was introduced to this area (starting with a Malaysian port along the strait of Molucca) by Muslim traders from Surat in Gujarat! I am no expert in history of Islam, but I am sure many Pakistani people may be already knowing this information & I am keen to know more from all of you.
वाचकांचे प्रतिसाद व लेखकाची उत्तरे
मंदार जोशी - रविवार, 12 जानेवारी 2014
अतिशय सुन्दर लेख आहे. मला मनापासून आवडला . मी सुधा याच विषयावर लेख लिहित आहे.
Aditya - शनिवार, 11 जानेवारी 2014
@सुधीर काळे, मु. पो. जकार्ता, कशाला सर वेळ घालवता नको त्या गोष्टींकडे हिंदू धर्मातील वाईट मनोवृत्ती बद्दल लेख लिहिले तर खूप बरे होईल उदारणार्थ माणसाकडे माणूस म्हणून पहानेपेक्ष्य जातीच्या माधमातून पाहणे. ( Inequality among Humans ) बरेच थोर संत बरेच प्रयत्न करून गेले पण जातीचा कर्करोग हिंदू धर्माला सोडत नाही.
Sudhir Kale, Jakarta - गुरुवार, 9 जानेवारी 2014 - 09:41 PM IST
आजच ई-सकाळकडे माझा "अमेरिका-इराण करार" हा लेख पाठविला आहे. एक-दोन दिवसात प्रकाशित होईल अशी अपेक्षा आहे. बरा उतरला आहे, जरूर वाचा.
Gulmohammed - रविवार, 5 जानेवारी 2014
वरचे सर्व प्रतिकिया आहेत ज्या आपापला क्षमतेनुसार आहेत सर्व पर्थम धर्म काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.प्रतम कुठला धर्म हा खरच मोठा प्रश्न वाटतो वरचा प्रतिक्रिया वाचून. जो खरा धर्म आहे तोच प्रथम धर्म आहे.इस्लाम हे साने गुरुजीचे पुअस्तक जरूर वाचा.इस्लामअचा इतिहास समाज्नाला बदल तोडी फार मदत होईल.
सचिन टिकोरे - शनिवार, 4 जानेवारी 2014
तसं पाहिलं तर भारतात मुस्लिम धर्म अस्तित्वात आला तो १३ व्या शतकात.....नंतर जसे जसे मुस्लिम सत्तांचा विस्तार झाला तसं तसे धर्मांतरे झाली (बरीचशी जबरदस्तीनेच ) आणि ते इथेच (१९४७ पूर्वीचा भारत) स्थायिक झाले, त्यापैकीच पाकिस्तानात गेले ...त्यामुळे धर्मांतरित मुस्लिम हे पूर्वी हिंदूच होते...असे म्हणायला काहीच हरकत नाही..मूळ मुस्लिम जसे कि अखाती, अरबी पैकी काही जमातीसुद्धा भारतात स्थायिक झाल्याचे पुरावे/उल्लेख आहेत..
सुधीर काळे, मु. पो. जकार्ता - शनिवार, 4 जानेवारी 2014
माधवी मॅडम, धन्यवाद. संजय वाणी-जी, आपण सुचविलेली दोन्ही पुस्तके माझ्या मुलाकडे आलेली असून ती माझ्याकडे जानेवारीच्या शेवटी तो मला भेटेल तेंव्हां मिळतील. मग मी ती वाचणार आहे. इराणवरचा लेख लिहिणे सुरू आहे. सध्या कारखान्यातल्या कामाचा बोजा जरा जास्त असल्यामुळे उशीर होत आहे!
माधवी पुजारी - शुक्रवार, 3 जानेवारी 2014
@सुधीर काळे, मी सुद्धा तुमच्या लेखांची नियमित वाचक आहे. मुळात लेखांचे विषयच फार चांगले निवडता तुम्ही. मी तुमच्या पुढच्या लेखांची वाट पाहत आहे. Hope fully, as you mentioned, we will read your perspective about US-Iran deal and Arab-Israel conflict. We believe your opinion won’t be biased. You are one of sincere writers who studies thoroughly before putting your views. आणि आजच्या लेखाबद्दल, चिटणीस आणि सुशांत यांच्या मतांशी मी अगदीच सहमत आहे.
अझीम - शुक्रवार, 3 जानेवारी 2014
पण तुम्ही काहीही म्हणा उस्मान शेठ, सर्व धर्म सारखे... ओम्लेट... (अरसिकांसाठी संदर्भ - पु. ल. यांची म्हैस कथा)
शाहीर - शुक्रवार, 3 जानेवारी 2014
काळे, जकार्ता हे तुमचा आडनाव आहे का ? लेले-नेने..अशा प्रकारचा ? किंवा लांडे-पाटील असा ? सुधीर काळे - बुधवार, 1 जानेवारी 2014
तसेच मला कमलाकांत चिटणीसांच्या खालच्या बाजूला दिलेल्या दोन्ही प्रतिक्रिया आवडल्या-एक मराठीतील व दुसरी श्री जिग्नेशना उद्देशून इंग्लिशमध्ये लिहिलेली. दोन्ही अर्थपूर्ण व मुद्देसूद आहेत.
सुधीर काळे - बुधवार, 1 जानेवारी 2014
मला सुशांतसाहेबांची प्रतिक्रिया आवडली. कारण बलुचिस्तानची व्याप्ती पाहिली तर त्यात आजच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तानापलीकडील भागही येतो जो आज इराणमध्ये व अफगाणिस्तानमध्ये मोडतो. या भागातील लोकांची वांशिक दृष्ट्या बलोच लोकांशी जवळीक आहे.
sushaant - मंगळवार, 31 डिसेंबर 2013
भारतीय व पाकिस्तानी यांचे पूर्वज एकच आहेत आजाचा भारत व पाकिस्तान मिळून एक प्रदेश होता जो भारतवर्ष म्हणून ओळखला जायचा. हा भारतवर्ष म्हणजेच आजच्या पाकिस्तानच्या उत्तरेचा हिंदकुश व आजच्या भारताच्या उत्तरेचा हिमालय यांच्या दक्षिणेचा भाग आणि यांची एकच संस्कृती हिंदू संस्कृती. (ज्या संस्कृतीलाच पुढे धर्माचे नाव चिकटले कारण हे ते असे लोक कि ज्यांनी इतर कोणत्याही धर्मात प्रवेश केला नाही) या भागातील सर्व लोकांचे मूळ एकच आहे मग भले ते भारतीय असोत पाकिस्तानी असोत किंवा बांगलादेशी असोत. त्यामुळेच आजदेखील भारतीय उपखंडातील मुस्लिम, बौद्ध बऱ्याच प्रमाणात इथल्या चालीरीती परंपरा पाळतात. इतर जगातील मुस्लिम, बौद्ध लोकांपासून भारतीय उपखंडातील मुस्लिम, बौद्ध सहज वेगळे ओळखून येतात कारण ते सर्वात आधी भारतवर्षाचे रहिवाशी आहेत. भारतवर्षाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात पाकिस्तान व बांगलादेश आज जन्माला आलेले आहेत. पण सर्वच पाकिस्तानी लोकांचे मूळ भारतीय आहे असेही नाही कारण बलुचिस्तान सारखा प्रदेश जो आज पाकिस्तान आहे तो मात्र हजारो वर्षापासून इराक इराण शी संबंध राखून आहे.
ज्ञानेश्वर - रविवार, 29 डिसेंबर 2013
इतिहासाची सहा सोनेरी पाने हे पुस्तक आत्ता वाचतो आहे. त्यात दिदेल्या माहिती नुसार पाक जनतेचे मूळ हिंदू-बौद्ध की अरबी हा प्रश्न निकालात निघतो.
PRADEEP - बुधवार, 25 डिसेंबर 2013
आगदी बरोबर सलीम, बाहेर हे असेच चालले आहे.
हेमंत - बुधवार, 25 डिसेंबर 2013
सद्यस्थितीत जगात काही उलथापालथ झाली आणि समजा सगळे जगात सतराव्या शतकासारखी परिस्थिती निर्माण झाली अशा स्थितीत आजपासून ५०० वर्षांनी जेव्हा जगातील इतिहासकार पाकिस्तानचा इतिहास लिहायला घेतील तेव्हा ते असे जाहीर करतील कि पाकिस्तानातील लोक हे अरबस्थानातून व्यापारानिमिताने स्थलांतरीत झाले आणि पाकिस्तानात स्थिरावले, पुराव्यादाखल ते काळे साहेबांनी ज्या पुस्तकाचा दाखले लेखात दिला त्या प्रकारचे अनेक पुस्तक दाखवतील. त्याचबरोबर अनेक मशिदी आहेतच. आणि जर कोणी त्यांच्या ह्या शोधला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना विचारतील जर पाकिस्तानतील लोक हिंदुस्थानातून स्थलांतरित झाले आहेत तर पाकिस्तानात एकही हिंदू मंदिर का नाही सापडत, एकही हिंदू कुटुंब का नाही आहे.( कारण मधील ५०० वर्षात पाकिस्ताना आणि अफगाणिस्थानातील उरले सुरले हिंदू संस्कृतीचे अवशेष नष्ट केलेले असेल). सध्याचा जागतिक इतिहास असाच चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे.
असीम - बुधवार, 25 डिसेंबर 2013
मला फ़क़्त एवडे बोलायेचे आहे कोणत्या हि धर्माला कमी लेखू नका .किवा धर्म गुरु ना नाव ठेवू नका .बस मी भारतीय आहे नंतर एकाद्या धर्माचा आहे ,जी हिंद ....................असीम
Rahul khillare - बुधवार, 25 डिसेंबर 2013
सम्राट अशोक यांच्या काळात सर्व भरत बुद्धमय झाला नंतर सम्राट यांचा मृतू नंतर मुस्लिम यांचे राज्जे आले आणि त्यांनी जब्र्जास्ती लोकांना मुस्लिम बनवले ......मुस्लिम हे पहिले बौध होते हे या लेखातून स्पस्त होते.
sangharsh - मंगळवार, 24 डिसेंबर 2013
लेख वाचून सर्वाची मते समजली छान वाटले परंतु देव आणि धर्म यांचात न गुर्फात्ता '' माणसाला माणूस म्हणून कधी बघणार '' मानसासी माणसा सारखे कधी वागणार ; हा महत्वाचा मुदा आहे .असे मला वाटते .माणसा साठी धर्म आणि धर्मा साठी माणूस हे सर्वे चालत राहणार ......
shaikhkismat - शुक्रवार, 20 डिसेंबर 2013
इथे एक धर्म हि कल्पना वेगळी आहे. हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे. आरायांपासून जे जे इथे राहिले ते हिदु. त्यात सर्व धर्म आले. मग तो कुठल्याही धर्माचा आला. आजही अनेक मुस्लिम धर्मातील लोक हिंदू देवळात ला जातात नवस बोलतात व त्यांना उपयोग पण होतो.
कौशिक - बुधवार, 18 डिसेंबर 2013
@ अझीम... काही लोकांनी हरिजन लोकांना बाजूला केल हे मान्य पण सगळे सवर्ण वाईट नाहीत.... आणि तुमच्या धर्मातील जातीभेद बद्दल काय बोलशील ? का बर शिया सुन्नी भेद आहे ? मुली का बुरख्यात त्यांना का स्वातंत्र्य नाही ? का बर पवित्र म्हणून बकरी ला गळा चिरून मारल जात ( हलाल ) ? आधी जरा तिथे प्रगती कर, आणि मग हरिजन लोकांची काळजी कर....
अझीम - मंगळवार, 17 डिसेंबर 2013
हा लेख आणि त्या खालील प्रतिक्रिया वाचून हसू येते. डार्विन च्या सिद्धांतानुसार आपले पूर्वज माकड होते. म्हणून काय तुम्ही माकडांची उदो-उदो करणार? देवाने दिलेल्या बुद्धीनुसार प्रत्येक जन आपापल्या धर्माचे अनुकरण करतो. ज्याला आपल्या धर्मात उणीवा दिसतात तो दुसरा धर्म स्वीकारतो. बुद्ध धर्माची सुरुवात भारतात होऊनही तो इतरत्र अधिक प्रमाणात पसरला. आणि केवळ हिंदू धर्मात दुय्यम दर्जा (किंबहुना दर्जाहीन वागणूक) मिळत असल्यामुळे कोट्यावधी हरिजन बांधवांनी हिंदू धर्म सोडून दिला. ज्यांना हिंदू धर्म संकटा आहे असे वाटते त्यांनी आधी हरिजन बांधवांना हिंदू धर्मात सामावून घेण्याचे प्रयत्न करावेत. धर्म स्वीकारणे व त्याचे पालन करणे हा प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे मी श्रेष्ठ तो कनिष्ठ आहे म्हणणे आणि मानणे चुकीचे आहे.
कौशिक - मंगळवार, 17 डिसेंबर 2013
@ VIJAY - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013 - 08:23 PM ईष्ट मग तुम्हाला म्हणायचं काय ? पैगंबर आणि मुस्लिम धर्म हिंदू पेक्षा चांगला कि वाईट ? कसली समानता मुस्लिम मध्ये ? शिया आणि सुन्नी लोक एकमेकांवर हल्ले करतात... मुलीना बुरख्यात ठेवल जात... हा बद्दल काय म्हणाल ???
Sudhir Kale - मंगळवार, 17 डिसेंबर 2013
धन्यवाद, सायलीताई.
सायली - सोमवार, 16 डिसेंबर 2013
Tarek Fatah हे मुळचे पाकिस्तानी पण आता canadian पत्रकार कित्येक वर्षापासून हेच सांगत आहेत. काळे साहेब जर google केलेत तर अजून खूप माहिती मिळेल. Tarek Fatah यांच्याबद्दल हि लिहावे हि विनंती.
प्रद्द्युम्न - सोमवार, 16 डिसेंबर 2013
कशाला मुळ शोधताय राव,त्यापेक्षा स्विकार करा त्यांच्या धार्मिकतेचा कल वेगळा आहे.तुमच्या स्व:ताच्या धार्मिक मान्यते मुळे तुम्ही सुखी,समृध्द,निरोगी व अखंड आर्शिवादित अवस्थेत असाल तर तुमची धार्मिकता करेक्ट समजावी अन्यथा नसेल तर बदलायला तयार रहावी.
नितीन गोपाळराव घोगले - रविवार, 15 डिसेंबर 2013
सत्य हेच आहे कि भारतीय उपखंडात प्रथम हिंदू संस्कृती जन्माला आली नंतर बौद्ध धर्माचा जन्म झाला भारतात सर्व हिंदू आहे हे कटू सत्य आहे जय हिंद जय भारत
विनायक - शनिवार, 14 डिसेंबर 2013
मूळचे सर्व हिंदूच. मुसलमानांनी बाटविले नंतर ख्रिस्ती लोकांनी बाटविले. धर्माच्या मर्यादा न समजल्यामुळे समाज ह्या दोन धर्मांमध्ये प्रवर्तित झाला. सरकार सुद्धा अल्पसंख्यांक नावाखाली ह्या दोनही धर्मांना अनुदान देते. वाह रे सरकार!
मनोज रणपिसे - गुरुवार, 12 डिसेंबर 2013
अनंतनाग तक्षशिला हा सर्व नागवंशिय बौद्धाचा खरा इतिहास आहे
आदित्य - गुरुवार, 12 डिसेंबर 2013
सुधीर काळे, जकार्ता----------- कशाला वेळ घालवता फुकट नको त्या गोष्टींकडे. दिव्याला आपल्या बुदाखालील अंधार दिसत नाही हे खरे आहे. हिंदू धर्म काय आहे हो? जाती-पाती मी मोत्ता तू मोत्ता माझे हे कुल त्याचे हे कुल. कुठे आहे मानवता ? कुठे आहेत थोर संतांच्या शिकवणी ?
Sudhir Kale, Jakarta - गुरुवार, 12 डिसेंबर 2013
Mr. Bunty, thanks. I have plans of writing on Israel-Arab conflict, but readers often have made up their mind & react on those lines. Compared to a deluge of Jewish write up in English on this conflict, the volume of Arabian write-ups in English are like trickle. So even I sometimes feel that I have not read both sides fairly. But I plan to write on Israel. Also on the latest US-Iran deal.
बंटी - बुधवार, 11 डिसेंबर 2013
काळे साहेब, मी तुमच्या लेखनाचा आणि माहिती संकलानाचा चाहता आहे...असेच माहितीपूर्ण लेख सुरु ठेवा....आणखी एक विनंती .....इस्राईल आणि हमास आणि palestine यांची काय समस्या आहे ती जरा detail मध्ये कळली असती तर बर झाला असता..कृपया या संदर्भात-लाही एक माहिती पूर्ण लेख लिहावा...
चिमणराव - शनिवार, 7 डिसेंबर 2013
अरे कसला धर्म आणि जाती घेऊन बसलात.माती मधून आला आणि मातीतच जायचंय. कशाला हवंय हे सगळ... जिवंत आहात तोपर्यंत नीट जगा आणि दुसर्याला हि जगू द्या. ज्याला नमाज पधायचीये त्याला नमाज पढू द्या आणि ज्याला नमस्कार करायचं त्याला नमस्कार करू द्या. आपला धर्म आपल्या मनात.
anant thorat - शनिवार, 7 डिसेंबर 2013
सर्व पाकिस्तानी मूळचे हिंदू किंवा बौद्ध आहेत हेच खरे.इसवी सन ७०० पासून काराकोरम खिंड ओलांडून जी आक्रमणे झाली त्यांनी प्रचंड बाटवाबाटवी करून सुमारे १००० वर्षे हा सारा भाग मुसलमान केला.नंतर अनेकदा हिंदू राजांनी हे प्रदेश जिंकले पण पुन्हा यांना धर्मात घ्यावे असे काही सुचले नाही.बजाजी निंबाळकर आणी नेताजी पालकर हे जबर दस्तीने मुस्लीम झाले असता महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतले, पण त्यांना सुद्धा याचा व्याप वाढवता आला नाही.पाकिस्तान आणी भारतातील सारे मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत.आणी ते तलवारीच्या जोरावर बाटवले गेलेले आहेत.हे जर भारताने जोरकस पणे मांडले असते तर कदाचित या आपल्या "मुळाशी " प्रामाणिक राहून पाकी जनता अशी द्वेष्टि राहिली नसती. पण आमच्या नतद्रष्ट राज्य कर्त्यांनी भोंगळ पणा चालूच ठेवला.इंडोनेशिया हा ९५ टक्के मुस्लीम देश आपली हिंदू बौद्ध मुळे मानतो.,नोटेवर गणपतीचे चित्र छापतो, अधिकृत विमान सेवेला गरुड एअरवेज असे नाव देतो आणी भाषा समृद्धी करताना अनेक शब्द संस्कृत मधून उचलतो आणी तरीही "इस्लाम खतरेमे येत नाही,
Jignesh - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
Instead of discussing what was their ancestory should we not discuss their present state? Which I will not call animal, so as not to insult animals but a sub-human. BTW, If we go back in history long enough ancestors of all us were relatives of apes. Trying to find out the ancestory of Pakistanis or even Indians do not help anybody. If they are happy believing they are Arabs good for them. it is true that many Bramhins also believe that they and Europeans have the same ancestory. Good for them too.Whatever makes you happy believe in it. Believe in God, Allah, or whatever bhakad katha of world's origin, Adam/Eve, Bramha or Adami that has been told thousands years before. It is a sad failure of us humans that we do not have a capability to rise above these things and become a human being.
kdchitnis - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
पाकिस्तानी व भारतीय यांचे पूर्वज एकच आहेत.मुस्लिम आक्रमणाने अफघाण, अरबी, तुर्क, इराणी आदी वंशांची सरमिसळ उत्तरेत अधिक व दक्षिणेत कमी अधिक प्रमाणात झाली.तरी मूळ गाभा हा भारतीयच आहे.तो हिंदू,बौद्ध वा आदिवासी यांचा आहे.पाकिस्तानी मंडळींना भारतीय परंपरेचे ओझे वाटते हे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे असल्याने ते इतिहासापासून पळ काढायचा प्रयत्न करतात.हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे हा आक्षेपही खराच आहे.त्यामुळेच हिंदू धर्मास कुणी संस्थापक नाही,परंपरेने म्हसोबा सारखी दैवते अजून भजली जातात.वैदिक धर्मानेहि देव एकच मानला आहे,तो निराकार व निर्गुणीच मानलाय,मुस्लिम धर्मही हेच सांगतो.मूर्तीपूजा नंतर घुसवलेली आहे.पाकिस्तानी मुस्लिम लोकात विचारवंत कमी व उन्मादी धार्मिक मुल्ला मौलवी यांनी जनमानसावर पगडा बसवल्याने सारासार विवेकापेक्षा भावनिक उद्रेक जास्त!भारतीय संस्कृतीतील सहिष्णुता ही त्यांना भीरुता वाटते,म्हणून तिला ते जवळपासही फिरकू देत नाहीत.भारतीय मुसलमानांना कमी मानण्याचे कारण ते सहिष्णू बनलेत हा त्यान्च्यावरचा मुख्य आक्षेप आहे.
संजय वाणी - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
विद्याधर नैपौल, नोबेल पारितोषिक विजेते, ह्यांनि दोन छान पुस्तके लिहिली आहेत. चार बिगर-अरब देशातील (इंडोनेशिया, इराण, मलेशिया, आणि पाकिस्तान) नव-मुसलमान पूर्वापार परंपरा कशा धुडकावून लावत आहेत ह्याच अभ्यासपूर्ण वर्णन फार वाचनीय आहे. पहिले पुस्तक आहे - Among the Believers आणि दुसरे पुस्तक आहे Beyond Belief.
VIJAY - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
पैगंबर यांच्या आधी लोक हिंदू संस्कृतीप्रमाणे अनेक देवता मानीत . पण पैगंबर यांना एकच देव हवा होता व समानतेसाठी . त्यासाठी मुस्लीम धर्म स्थापन केला.
sachin - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
धर्मांतर हे तलवारीच्या जोरावर झाले हे वादातीत सत्य आहे. आठशे वर्षांचा मुस्लिम राज्यकाल याला जबाबदार आहे. परत हिंदू धर्मात सामावून घेतले नाही याला हिंदू पंडित व आपले हिंदू पूर्वज जबाबदार आहेत . .इतिहासाची पाकिस्तानात काय भारतात हि पद्धतशीर पणे मोडतोड चालू आहे .मराठा व पेशवा इतिहास दुर्लक्षित करण्यात राज्यकर्त्यांना स्वारास्था आहे . सेकुलर इतिहासकार हा नवीन वर्ग जन्माला आला आहे
वासिम patel - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
sarva pratham अल्लाह ne Aadam आणि हव्वा या doghanna nirmaan kela आणि प्रिथवी तलाव वाल पाठविले ... tya doghan pasun cha lokkanchi nirmiti zhali आणि हे लोक prithavi tala va vaar pasarat gele.. या lokanna ईश्वरा ची काही shikvan navti. ya लोक्कानी ची मात्ती चे murti बनयून yanna ch dev samjhu lag ले... या लोक्कान्ना शिकवण mhanun अल्लाह ni velo वेळी पैघ्म्बर पाठ्ठवले jase Ibrhaim आले सलाम, Hajarat मुसा आले सलाम आणि ( Isa आले सलाम हे अल्लाह चे nabi ahet. je yahudi लोक yanna dev mantat.) या लोक्कानी इस्लाम ची shikvan dili ,आणि हळू हळू लोक इस्लाम स्वीकारू लागले. isalam पसरू लागले.इस्लाम हा शांती आणि प्रेमाचा sandesh denara pavitra dharma ahe. जे या jagachi olakh ahe...mala konachi bhavna dukhvyacha nahi, pan जे खरे आहे तेच बोलत आहे. ज्यांना अजून जास्त माहिती pahije tar या link var क्लीच्क करा आणि क़ुरन vacha. http://quranhindi.com/
अरविंद भिडे - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013 - 04:04 PM IST
काळे साहेब ,एक माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाल्यामुळे परत एक धन्यवाद .मी कामा करता तीन वर्ष दुबईत होतो .तेव्हा मला जाणवलेले एक कडू सत्य .अरब लोक भरतीय , पाकिस्तानी श्रीलंकन व फिलिपिनो लोकांना एकाच मापाने तोलातात आणि ते म्हणजे तुच्छतेचे .गोऱ्या माणसांना वेगळी रांग, अरबांना खास रांग व वर उल्लेखिलेल्या asian लोकांना एक रांग . मिळणाऱ्या सवलती सुद्धा कमीत कमी असिअन लोकांना .इथून जाताना बरेचसे भारतीय मुस्लिम स्वतः ला अरबांचे वंशज मनात असतात पण तिथल्या विमान तळावर उतरल्या उतरल्या त्यांचा भ्रम निरास होतो .
वासिम - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
@ शैलेश १०० टक्के सहमत.
एक भारतीय - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
खरतर हा देश न आर्यांचा न मुस्लिमांचा, हा देश खरा दक्षिणात्य लोकांचा आहे, आर्य भारतात येण्याच्याही अगोदर द्रविड लोक इथे होते.
मावळा - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
ह्यांच्यामध्ये आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढणाऱ्यांमध्ये काहीही फरक नाही. सकाळ निष्पक्षपाती असाल तर comment प्रसिद्ध करा.
atre - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
तिकडे जिहादी आणि आमचे सनातनी सारखेच ... मानवजातीला धोका आहे यांच्यापासून
आस्वाद - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
गौतम बुद्धांनी संपूर्ण विश्वाला खरा ( शांतीचा ) मार्ग सांगितला आहे .... परंतु काही ( पायाच्या बोटावर मोजण्या इतके लोक ) ते मान्य करण्यास तयार नाहीत ...!!!
prakash - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
धर्म बदल ने हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे .. आणी इतिहासाची मोडतोड कारण आजकाल सर्रास चालाल आहे . फक्त एखादी खोटी गोष्ट ५० वेळेस सांगितली तरी लोकांना खरी वाटावी अशी ... आपण मानव म्हणून जन्माला आलो आणि मानव म्हणून च देवाकडे जावू या .... या मधल्या काळात कशाला आपल्यात भांडायचं फक्त आपल श्र्ष्टत्व सिद्ध करायला ... कोणत्याही दंगली मध्ये राजकारणी मारत नाही फक्त कार्यकर्ते आणि सामान्य जनताच मरते ...
संदीप ना. कुलटपाटील, अखंड भारत राष्ट्र परिषद - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
हा सर्व अखंड भारताचाच भाग होता आणि आहे (त्यामुळे जागतिक पातळीवर विचार करताना भारतीय उपखंड आसाच उल्लेख करतात) त्यामुळे वेगळे सांगायला नको कि कोण मुळचे कोण आहेत (जगात सर्वात जुना धर्म हा हिंदूच आहे आणि जगातील सर्व भाषेची जननी संस्कृत भाषा आहे). जयहिंद!!! जय अखंड भारत!!!
सतीश - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
अरब देशांत पाकिस्तान-बांगलादेशमधील (आणि भारतातीलसुद्धा) मुस्लिमांना अत्यंत हीन दर्जाची कामे जबरदस्तीने करायला लावतात. मानवतेकडे, सत्याकडे आणि इतिहासाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याची फळं आता ते भोगत आहेत.
अजित - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
सगळ्या पाकाद्यानी सिंधू नदीत अंघोळ करून हिंदू धर्मात प्रवेश करून पाकिस्तान हे हिंदुरास्त्र घोषित करावे ....
shweta - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
लेख वाचून बर वाटलं कि मुस्लिम बांधवाना भारतीय मायभूमीबद्दल अभिमान आहे. आपण सर्व एक आहोत. नाहीतर काही जणांना वाटता कि हा त्याचा देश नाही.
मोहन जोशी - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013 - 10:10 AM IST
ही भूमी आर्यांचीच आहे.. हे विश्वच आर्यांनी वसवला आहे.. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म..
शैलेश - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
सदरील लेखातील आजी प्रमाणेच आज कित्येक मुस्लिमांची अवस्था आहे. मूळ कुराण किवा धर्मात काय लिहिले आहे ते काही माहित नाही (किवा कळत नाही/ समजून घेण्याची इच्छा नाही) . पण, त्याचा विपर्यास्त अर्थ लाऊन , जिहादच्या नावाखाली माथी भडकवणारे मुल्ला - मौलवी, तालिबानी च्या नादी लागून जगभर दहशतवादाचा वणवा पेटवत आहेत.
श्रीकांत अत्रे - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
हे तर खरे आहे की इस्लाम धर्माचा प्रसार हा सातव्या शतकानंतर झाला ! तत्पूर्वी बौद्ध आणि हिंदू धर्माचा पगडा सिंधू नदीच्या खोऱ्यातील राज्यांवर होता आणि प्रजेस अरबी आक्रमणा पासून सतत त्यांनीच वाचवले होते... शक आणि पहलव व त्यांच्याही पश्चिमेकडून ग्रीक (आयोनियन = यवन) हे भारतात येत असताना गांधार अन कम्बोज (सिकंदर-पोरस लढाईची कथा) नंतरचे मौर्य (मेगस्थेनिस ची लिखिते), शुंग, कण्व, गुप्त या बौद्ध अन हिंदू राजघराण्यान्नी सबंध हिंदुकुश (अफ-पाक) जो लढवत ठेवला तो इतिहास असा अरबांना सहज देऊन चालणार नाही.. पाकिस्तानी राजकारणी अन लष्कराला वाटते म्हणून तर नव्हेच..तसेच पाहिले तर बामियानच्या बुद्ध मूर्ती पाडणारे तालिबानी काय अन हे इतिहासाला चुकीचे वळण देणारे राजकर्ते काय दोन्हीही निषेधास पात्र आहेत.
केदार रिसबुड - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
काळे साहेब, मूळ लेख अतिशय माहितीपूर्ण असणार हे आपण केलेल्या मराठी अनुवादावरूनच कळून येत आहे. आपला लेख सुंदर आहे. हिंदू संस्कृती मध्यपूर्वेपर्यंत पसरली होती याचे अनेक ऐतिहासिक पुरावे तर आहेतच. शिवाय तिथल्या काही गावांच्या / शहरांच्या नावांची मुळेही हिंदू संस्कृतीत असावीत असं वाटतं. उदाहरणार्थ, Beer Sheba (वीर शिव) किंवा Shoresh (सुरेश).
हर्षल नाईक (naik.harshal@gmail.com) - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
सत्य तर हेच आहे कि "हे सगळे पूर्वी हिंदू च होते." त्यांनी हे सत्य आता तरी मान्य करायला हवे. अधिक माहितीसाठी यु ट्यूब वर "तारक फतेह " यांचा - http://www.youtube.com/watch?v=o8BxYnmZPvE हा video नक्की बघा. अतिशय छान माहिती आहे यावर. * वन्दे मातरम *
salim - शुक्रवार, 6 डिसेंबर 2013
हे पाकिस्तानी लोक सौदी अराबिया मध्ये २००० पूर्वी अरब लोकांना "हिंदी" (म्हणजे भारतीय) हा हिंदू असतो जरी तो मुस्लिम असला तरी!! अश्या प्रकारचा गोबेल्सी प्रचार सगळी कडे केला होता आणि आजही करतात. याचे कारण म्हणजे भारतीय मुस्लिम लोकांना एक तर व्हिसा मिळू नये आणि चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू नये! तसेच अरब लोकांची सहानुभूती पण मिळू नये (भारतीय मुस्लिम किंवा हिंदुना सुद्धा परदेशात कोणाच्या सहानुभूतीची आजही गरज नाही, जे काही मिळवितात ते स्व-कर्तृत्वानेच यात वाद नाही) हा सारा खटाटोप या पाकाद्यांचा असतो. २००० साला नंतर परिस्तिथित फरक होत चालला. आज कोणत्याही कंपनीत केवळ कर्तृत्वावर तुमची योग्यता होते. हे पाकडे (विजारीचे) नाडे, (पाकिस्तानी पंजाबी लोकांची ओळख) ७०० - १००० रियाल कमवून चार चार वर्षे तिथेच खितपत पडतात कारण पाकिस्तानात सुटी म्हणून घरी जाण्या सारखी परिस्तिथी नाही. विमानतळावरून घरी पोहचण्याचा भरोसा नाही. या जगात सर्व मानव प्राणी हि ईश्वराची देन आहे प्रेषित महमद ने शेवटच्या निरुपणात "अरब आणि गैर अरब असा भेदभाव करू नका केवळ कर्माने श्रेष्ट होणार"