Sunday 12 January 2014

पाक जनता स्वप्नांना बधणार नाही! (पैलतीर)


पाक जनता स्वप्नांना बधणार नाही!
सोमवार, 25 नोव्हेंबर 2013 - 12:08 PM IST


मूळ लेखक: आयाज अमीर, अनुवादक व परिचय: सुधीर काळे, जकार्ता
आयाज अमीर यांचा परिचय:
पाकिस्तानी लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन व माजी खासदार आयाज अमीर हे पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत. गेली तीस वर्षे ते पाकिस्तानी वृत्तपत्रांत सातत्याने लिहित आहेत. सुरवातीला 'डॉन' या वृत्तपत्रातील लेखनामुळे ते प्रकाशझोतात आले. पण 2008 मध्ये खासदारपदावर निवडून आल्यानंतर ते 'द न्यूज इंटरनॅशनल' या वृत्तपत्रासाठी लिहू लागले. आयाज यांनी इतिहासातील पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर कठोर टीका करणारे लेख लिहिले आहेत. कायद्याचे राज्य, लोकशाही अशा बाबींचे समर्थन तर पाकिस्तानातील अयशस्वी लष्करी अंमल, मुस्लिम धर्मातील अतिरेक्‍यांचा उदय अशा बाबींना विरोध असा त्यांच्या लिखाणाचा रोख असतो. राजकारणावरील उपरोधक लिखाण हा त्यांचा हातखंडा आहे. 'एआरवाय वन वर्ल्ड' या दूरचित्रवाहिनीच्या एका चर्चासत्राचेही ते सूत्रसंचालन करतात.
1990 च्या दशकात आयाज 'पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ' या पक्षातर्फे पंजाब प्रांताच्या 'चकवाल' मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 1998 मध्ये त्यांनी या पक्षाचा राजीनामा दिला; पण मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर 2002 मध्ये ते पुन्हा या पक्षात परतले. त्यांनी सातत्याने मुशर्रफ यांच्या राजवटीच्या व नवाझ यांच्या हद्दपारीच्या विरोधात लिखाण केले. 2002 मधील निवडणूक ते केवळ दोन टक्के मतांनी थोडक्‍यात हरले; पण 2008 मध्ये ते पाकिस्तानी 'लोकसभे'वर दणदणीत मताधिक्‍याने निवडून आले. त्यांना पंजाबमधल्या सर्व मतदारसंघांत सर्वांत जास्त मते मिळाली.

2013
च्या मेमधील निवडणुकीसाठी आयाझ यांनी केलेला उमेदवारीचा अर्ज पाकिस्तानी निवडणूक आयोगातर्फे फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयात अपील करून तो त्यांनी रद्द करविला व ते निवडणूक लढवायला पात्र ठरले. पण त्यांना नवाजसाहेबांच्या पक्षाने तिकीट नाकारले, मग ऐन निवडणुकीआधी ते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ (पीटीआय) या पक्षात सहभागी झाले आणि पक्षाचा प्रचारही केला. सध्या ते खासदार नसून केवळ पत्रकार आहेत.
आयाझ एका लेखाचे भाषांतर मी खाली देत आहे

जवळपास 30 वर्षे वृत्तपत्रव्यवसायामध्ये असलेले माजी खासदार आणि या लेखाचे मूळ लेखक आता 'पाकिस्तानच्या समस्या सुटण्यासारख्या नाहीत' या निष्कर्षाप्रत आलेले आहेत. याचा अर्थ, पाकिस्तानच्या समस्या खूप गुंतागुंतीच्या आणि जगावेगळ्या आहेत, असे मुळीच नाही. पण ज्या नेत्यांकडे या समस्या सोडविण्यासाठी सोपविल्या गेल्या आहेत, ते सारे एक नंबरचे 'पप्पू' आहेत; मग ते निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेले असो वा अन्य कुठल्या मार्गाने.. त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची जी झलक दिसते (किंवा दिसत नाही!) तिच्याकडे पाहता इतर कुठलेही अनुमान काढताच येणार नाही.
वानगीदाखल एक उदाहरण द्यायचे झाले, तर यू-ट्युब या संकेतस्थळावरील बंदी उठविण्याच्या निर्णयाकडे पाहू. ही बंदी उठविल्यास खूप मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ उसळेल, या भीतीने पाकिस्तानी नेते हा निर्णय घेण्याची टाळाटाळ करत आहेत. इतक्‍या छोट्या समस्येबाबत इतकी भीती बाळगणारे पाकिस्तानचे नेतृत्व मग मोठ्या समस्या कसे सोडवू शकेल? नेत्यांमधील योग्यता आणि कुवत या दोन गुणांची उणीव हीच तर पाकिस्तानची प्रमुख समस्या आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ताळेबंदीतील तफावत किंवा उर्जेच्या उत्पादनातील कमतरता या समस्यांपेक्षा नेत्यांकडे चांगल्या योजना किंवा विचार यांची कमतरता हीच जास्त भीतीदायक स्थिती आहे.
ही कमतरता आज राजकारणात लुडबूड करणाऱ्या शरीफ बंधुद्वय किंवा त्यांच्यासारख्या "राजकीय हमाली" करणाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे, असे नाही, तर ती सामाजिक व राजकीय क्षेत्रात सर्वत्र पसरलेली आहे! प्रजोत्पादनाच्या एका क्षेत्रात अव्वल पराक्रम गाजविणारा 20 कोटी लोकसंख्येचा पाकिस्तान आज जगावर एक ओझेच बनलेला आहे आणि नेतृत्वाच्या अभावामुळे या वीस कोटी लोकांना आपल्याला कुठल्या दिशेने जायला हवे, याचे भानच राहिलेले नाही.
उदाहरण म्हणून शालेय शिक्षणातला अभ्यासक्रमासारखा कुठलाही विषय घेतला तर सगळीकडे विचित्र चित्र दिसते! आपण इतिहासाचा इतका विचका केलेला आहे, की इतिहास शिकून बाहेर पडणारे एकदम अशिक्षित येडबंबूच असतात! आपण आपल्या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्‍टर्सकडे इतके दुर्लक्ष करतो की पहिल्या संधीचा फायदा घेऊन ते सौदी अरेबियात कामासाठी जायला कमालीचे उत्सुक असतात. आपली गटारे प्लास्टिकच्या पिशव्यांनी कायमच तुंबलेली असतात. (तसे पाहिल्यास, प्लास्टिकच्या पिशव्या हा एक राक्षसी शोधच ठरत आहे.) कुठलीही समस्या सोडविण्यासाठी, मग ती शिक्षणाच्या माध्यमाबाबत असो वा सामाईक शैक्षणिक धोरणाबाबत असो, तालिबानबरोबरच्या चर्चेबद्दल असो किंवा अतिरेक्‍यांच्या हल्ल्यापासून देशाला असलेल्या धोक्‍याबद्दल असो, त्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यायची आणि पाठोपाठ योग्य ती कारवाई करायची गरज असते.
हे करण्यासाठी योग्य ते नेतृत्व हवे, मग ते राजकीय असो, लष्करी असो, नोकरशाहीचे असो वा इराणमध्ये आहे तसे धर्मशाहीचे असो. गाडी चालवायला जसा चालक हवा, एखादे जहाज चालवायला जसा कप्तान हवा किंवा वाद्यवृंदाचे संचालन करण्यासाठी जसा संचालक हवा तसा कुठल्याही संघाला यशस्वी करायला कर्णधार लागतो! या सर्व विचारांत फारसे गहन असे काहीचच नाहीये.. अगदी सरळसोट, मूलभूत गोष्ट आहे ही! पण आम्हा पाकिस्तान्यांना कुठे कळतात असल्या मूलभूत गोष्टी? मग अनेक महानिरुपयोगी पर्यायांमधील सर्वात जास्त निरुपयोगी पर्याय आपण निवडतो आणि मग असा निवडलेला पर्याय एखादा चमत्कार घडवून आणेल, अशी अपेक्षा आपण करत राहतो आणि आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही, तेव्हा आपण वैफल्यग्रस्त होऊन स्वत:चीच उपेक्षा करू लागतो.
आपल्या अद्ययावर घरी सकाळी चहाचा घोट घेता-घेता, ताजे वृत्तपत्र वाचताना त्यात छापलेले नेहमीचे चेहरे पाहून त्याबद्दल नापसंती, उपेक्षा व्यक्त करत केवळ तोंड वाकडे करणे- हे फक्त श्रीमंत-सुखवस्तू बुद्धिवाद्यांनाच परवडू शकते. संध्याकाळ सुखात घालवायला दारूने भरलेल्या एखादा किंमती क्रिस्टलचा पेला असेल, तर तो दुग्धशर्करा योगच म्हटला पाहिजे. पण असे सुखवस्तू होण्याची ज्यांची परिस्थिती नाही, त्यांना वैफल्यग्रस्त होण्याखेरीज दुसरा कुठलाच तरणोपाय उरत नाही. पाकिस्तानची आजची परिस्थिती पाहता, येथील जनतेमध्ये वैफल्य वाढतच जाणार आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.
पाकिस्तानच्या लोकसंखेत तरुणांचे प्रमाण वाढत आहे; पण त्यांच्यापुढे भवितव्याचे कुठलेच आशावादी दृष्य नसल्याने त्यांच्यातील असंतोष वाढतच जाणार. काही आठवड्यांपूर्वी लाहोरच्या कॅन्टोन्मेंट भागातून गाडी चालवित असताना अचानक हजार-एक तरुण प्रचंड लांबलचक रांगेत उभे राहिलेले दिसले. त्यात खुशाब-सरगोढासारख्या खूप दूरच्या भागातून आलेले तरुणही होते. लाहोर कॅन्टोन्मेंटमधील एका शाळेतील उच्चस्तरील लिपिकाच्या जागा रिकाम्या झाल्या होत्या. त्या भरण्यासाठी ही रांग होती. रांगेतील पन्नास टक्के तरुण एमए किंवा एमबीएचे पदवीधारक होते. पुढच्या वेळी पोलिस खात्यातील शंभर एक जागा भरण्यासाठी जाहिरात येईल, त्यावेळीही कसेही करून नोकरी पटकाविण्यासाठी अशीच एमए-एमबीए धारकांची झुंबड उडेल.
जनतेला दिवास्वप्ने दाखविल्याबद्दल आपण पाकिस्तानी राज्यकर्त्यांबद्दल कृतज्ञ राहायला हरकत नाही. कारण काहीही असो, पण आजच्या या पाकिस्तानी राज्यकर्ते दिवास्वप्ने दाखविण्याच्या या सवयीलाच नेस्तनाबूत करत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी अद्याप पाकिस्तानमध्ये असूनही पंजाब प्रांताने नवाझ शरीफ यांना विजयी केले. कारण, शरीफ निवडून आल्यास साऱ्या समस्या सुटतील आणि सारे काही सुरळीत होईल, या भ्रामक कल्पनेचा एक मानसिक आधार त्यांनी वापरला. पण शरीफ यांचा विजय किती पोकळ होता, हे विक्रमी वेळत कळाल्याने जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये त्याचे सत्यस्वरूप पूर्णपणे बाहेर येईल. पीपीपी आणि पीएमएल-एन या एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या आकर्षणाच्या अपेक्षाभंगातून आपले डोळे उघडण्यात पाकिस्तानी जनतेने पूर्ण आयुष्य वेचले आहे. एका पक्षाच्या चाळ्यांना कंटाळून दुसऱ्या पक्षाला निवडून दिले; पण शेवटी तो राजकीय ऊन-पावसाचा एक खेळ ठरला.
सी-सॉमध्ये होते, तसे एकदा भुत्तो, तर एकदा शरीफ असा राजकीय खुर्चीचा खेळ चालला व या नेत्यांच्या आपापल्या पक्षातील हुकुमशाहीतून दोन्ही पक्षांना उपजीविकेची संधी आणि आयुष्य मिळत गेले. पण ही हुकुमशाहीसुद्धा अतिसामान्यपणा आणि गलथानपण या गुणांवर आधारित होती. शिवाय, मोठ्या प्रमाणावर चालविलेल्या भ्रष्टाचाराचा भाग तर वेगळाच! सध्या मिळणाऱ्या सवलती फटदिशी बंद झाल्या, कीं एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झोके घेणारा लंबक आता झोके घेणे थांबवेल असे वाटते. आता हा फसवा खेळ बऱ्याच दिवसांपासून चाललेला असल्यामुळे आता कुठलेच भ्रम होण्याची शक्‍यता नाही.
लष्करी राजवटीने घेतलेली माघार पाकिस्तानी जनतेने पाहिलेली आहे आणि लोकशाहीचे आगमनही पाहिलेले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातले शांततेच्या मार्गाने झालेले पहिले-वहिले "लोकशाहीकडून लोकशाहीकडे" असे सत्तेचे हस्तांतरही पाहिले आहे. पीपीपीचा उदय आणि अस्त दोन्ही पाहिला आहे आणि आता पीएमएल-एनने दाखविलेला आशेचा किरणही मंदावत असलेला पाकिस्तानी जनता पाहत आहे! जणू जगातले महान आश्‍चर्यच मानायला हवीत, अशी न्यायदेवतेच्या स्वातंत्र्याची फळेही पाकिस्तानी जनतेने चाखली आहेत. एक प्रकारच्या दिवास्वप्नांकडून ही जनता दुसऱ्या प्रकारच्या दिवास्वप्नांकडे प्रवास करत आहे आणि आता जी दिवास्वप्ने आम्ही आयुष्यभर पाहिली, त्या दिवास्वप्नांकडे नेणाऱ्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आता ही जनता पोचलेली आहे. मदिरेचे सारे प्याले फुटले आहेत, जुनी मदिरा पिऊन फस्त तरी करण्यात आली आहे किंवा विभागली गेली आहे आणि आता नव्या मदिरेचा नवा 'मयखानाफ उघडायची वेळ आलेली आहे!
पण नव्या मयखान्याचे चालक कोण असतील? सध्या निर्माण झालेली प्रचंड पोकळी भरून काढायला कोण पाऊल ठेवेल या पोकळीत?
पाकिस्तानी तालिबानने (तेहरिक-ई-तालिबान - पाकिस्तान) पाकिस्तानी सरकारचे पाणी जोखले आहे. पाकिस्तानी सरकारची व लष्कराची ताकतही (किंवा तिचा अभाव म्हणा हवे तर) त्यांनी आजमावलेली आहे आणि आता या तालिबान्यांची भूक वखवखलेली असून त्यांची महत्त्वाकांक्षाही प्रज्वलीत झालेली आहे. पूर्वी जशी अनेक आक्रमकांची सैन्ये संपत्तीच्या लालसेने हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात घुसली, तशीच संधी आता पाकिस्तानी सरकारने निर्माण केलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे तालिबानला दिसत आहे. थोडक्‍यात सांगायचे, तर आता तालिबानला थोपवायचे कसे, हा प्रश्‍न आपल्यासमोर उभा आहे. या तालिबानी आक्रमकांना थोपविण्यासाठी आणि त्यांची प्रगती रोखण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे सैन्य, कशा प्रकारच्या भिंती, कुठले अडथळे उभे करावे लागणार आहेत?
युद्धात विजय होणार की पराभव हे सर्वांत आधी देशाच्या मानसिकतेवर ठरते आणि नंतर तसे रणांगणावर घडते. दुसऱ्या महायुद्धात मध्ये जर्मनीने मॅंजीनो तटबंदी ओलांडायच्या आधीच फ्रान्सने पराभव पत्करला होता. एक वर्षानंतर रशियाची संरक्षणाची फळी मोडून काढत, रशियाच्या सैन्याभोवती वेढा घालत व रशियाच्या हजारो सैनिकांना युद्धकैदी बनवत जर्मन सैन्याने मारलेली मुसंडी नेत्रदीपकच होती. पण रशियाचे सैन्य इतकी भयानक हानी सोसूनही नेटाने लढत राहिले कारण रशियाच्या अवसानाची, तडफेची, चिकाटीची हार झालेली नव्हती. पाकिस्तानची लढायची इच्छाशक्तीच नाहीशी झालेली दिसत आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे आणि निग्रहाच्या, जिद्दीच्या, खंबीरपणाच्या अभावामुळे हे सरकार दु:साहसांना आणि अराजकांना निमंत्रणच देत आहे. तोफा बसविलेली हेलिकॉप्टर्स आणि रात्रीच्या अंधारात पाहू देणारी सामग्री पाकिस्तानला हवी आहेच; पण त्याहूनही जास्त मिळायला हवा आहे पोलादी निर्धार आणि त्यांच्या हृदयाभोवती हवे आहे एक पोलादी कवच. लढण्याच्या क्षमतेपेक्षा लढण्याच्या जिद्दीची गरज पाकिस्तानला जास्त आहे.
लतिफुल्ला मेहसूद या तालिबानच्या एका सेनापतीला अमेरिकी सैन्याने नुकतीच अटक केली. त्याआधी पाकिस्तानी सैन्याला अडचणीत आणण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये जाऊन अफगाणी गुप्तहेर खात्यातील कर्मचाऱ्यांशी त्याने संधान बांधले होते. सरकारे दुबळी होतात, येव्हा एरवी लीन-दीन असणाऱ्या संघटनाही सरकारविरुद्ध कटकारस्थाने करू लागतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
जुन्या पद्धतीचे राजकारण आता कालबाह्य झाले आहे आणि नव्या पद्धतीचे राजकारण त्या जागी येऊ घातले आहे. पण या दरम्यान या राजकीय पोकळीत सत्ता कुणाची असेल?

वाचकांचे प्रतिसाद व लेखकाची उत्तरे
डॉ. हेमंत जुन्नरकर - मंगळवार, 31 डिसेंबर 2013
श्री. रोहित यांस, 'द शेमफुल फ्लाइट' पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
विजय गोखले USA - शनिवार, 28 डिसेंबर 2013 - 08:26 PM IST
http://www.dawn.com/news/1076465/pm-sharif-among-billionaire-lawmakers क्रुपया Dawn मधला हा शरीफ नवाझ बद्दल चा लेख आणि वाचाक्नांच्या प्रतक्रिया वाचा आणि विचार करा. शरीफ मिया आपल्या नेत्यान सारखेच भ्रस्ताचारी आहेत.
प्रतिमा - मंगळवार, 24 डिसेंबर 2013
http://www.searchgadchiroli.org/PDF%20files/Pakistan%20Word%20file.pdf हा लेख वाचा..पाकिस्तानी सामान्य माणूस कसा आहे ह्यावर डॉ. अभय बंग यांनी लिहिलेला लेख आहे हा.
रोहित - सोमवार, 23 डिसेंबर 2013
लेख उत्तम आहे. पाकिस्तानी लोकांविषयी असलेला पूर्वग्रह बाजूला ठेऊन चर्चा करणे आवश्यक आहे. डॉ. हेमंत जुन्नरकर - स्टॅन्ले वॉल्पर्ट यांचेच एक नवीन पुस्तक फाळणीवरील "द शेमफुल फ्लाईट" सध्या वाचत आहे. यात त्यांनी फाळणीला आणि त्या नंतर झालेल्या नरसन्हाराला सर्वाधिक जबाबदार mountbatton यांना धरले आहे - याशिवाय गांधी-नेहरू आणि जीना यांचेतील बेबनाव/थोडा अविश्वास. तसे जीना हे पण एक हुशार, दूरदृष्टीचे नेते होते. गांधींच्या आंदोलनाचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात हेही ते परोपरीने सांगत होते. पण या फाळणीच्या एका बाबतीत त्यांनी मोठी गंभीर चूक केली!
kedar - शुक्रवार, 20 डिसेंबर 2013
@ KD Chitnis आणि सुधीर काळे यांच्या प्रतिक्रिया पाहता दोघांचा ह्या भारत पाक संबंधावर चांगला अभ्यास आहे असे दिसते. एक गोष्ट मी नमूद करतो कि पाकीस्थान हा भारतापासून वेगळा झाला आहे.. पाकीस्थान हा भारतमातेचा तुकडा आहे.. त्यामुळे भारत पाक भाऊ भाऊ नसून माय-लेक हे पहिले सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
AMOL - गुरुवार, 12 डिसेंबर 2013
Dear Sudhir, Your views are correct when you stay in a different country, as the indian and pakistani people get along well in foreign coutries since they are minority there. Even there are good people in pakistan, its also a fact that most of the people in pakistan were hindu or buddhist but were converted by muslim rulers, sometimes by force and sometimes by giving facilities. But the fact remains same that wherever muslim population grows other religions are displaced from there, see the state of other religions in pakistan, or even for that matter see the state in kashmir where natives have become minorities and have fled whereas muslims in India are in better state than Pakistan. I hope you can draw out conclusion out of all this.
जिग्नेश - गुरुवार, 5 डिसेंबर 2013
जागृत, मी ब्राह्मणद्वेष्टा किंवा कोणाचाच द्वेष करत नाही. घरी आमच्यावर असे संस्कार केले जात नाहीत. सर्व लोक समान असेच शिकवले जाते. श्री नेहरू ब्राम्हण होते आणि इंदिरा गांधी पण ब्राम्हण होत्या. पहिले बाजीराव, लो टिळक, श्री गोखले हे पण ब्राम्हण होते आणि हे सर्व मला वंदनीय आहेत कारण यांनी जात नाही तर देशाचे हित पाहिले. नागपूरला रेशम बागेत जे बसले आहेत ते छ. शिवाजी महाराजांना क्षत्रिय न समजणाऱ्या आणि हिंदू धर्म, देश गेला मातीत पण आपली खोटी घमेंड टिकली पाहिजे या वृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे जीना यांना देशभक्त ठरवणे, गुजरातमध्ये मदरसाला पैसे देणे असे दाढी कुरवाळण्याचे प्रकार करतात.
जागृत - बुधवार, 4 डिसेंबर 2013
जिग्नेश , लेख काय आहे , प्रतिक्रिया काय देत आहात , आणि आज काळ उठ सुठ कुणीही ब्राह्मण बद्दल काहीही बोलतो, मान्य आहे कि काही चुका झाल्या आहेत, पण प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळय दृष्टीकोनातून बघून ती साकार्नायची धमक नाकारत येणार नाही
डॉ. हेमंत जुन्नरकर - बुधवार, 4 डिसेंबर 2013
श्री. सुधीर काळे: माझ्या नजरचुकीबद्दल मला माफ करा. तुमच्या माहितीबद्दल मी आभारी आहे. मी सांगितलेले पुस्तक जरूर वाचा. हे पुस्तक वाचण्यास माझ्यापेक्षा तुम्ही अधिक योग्य व्यक्ती आहात.
सुधीर काळे, जकार्ता (दुसरा प्रयत्न) - बुधवार, 4 डिसेंबर 2013
डॉक्टरसाहेब, इंदिराजींचे लोटांगण? मी नाहीं म्हणालो तसे....! मी म्हटले होते कीं जसे पृथ्वीराज चौहान या राजाने महंमद घोरीला क्षमा करून जीवदान दिले तसे इंदिराजींनी भुत्तोंना दिले. माझ्या वाचनानुसार सिमला करारात इंदिराजींना एक अट अशी घालायची होती कीं सध्याची जी नियंत्रणरेषा आहे तिला दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय सीमारेषा समजायचे व पाकिस्तानने यापुढे काश्मीरमध्ये घूसखोरी करून आणि अतिरेकी पाठवून वातावरण भडकावयाचे नाहीं व दोन्ही राष्ट्रांनी या मुद्द्यांना मान्यता देऊन काश्मीर प्रश्नाला तिलांजली द्यायची. भुत्तो असे लेखी द्यायला तयार झाले नाहींत कारण ते म्हणाले कीं त्यांनी असे केल्यास ते निवडणूक जिंकू शकणार नाहींत पण त्याना ही अट मान्य होती व तसे वागायचे त्यांनी तोंडी वचनही दिले. पण पाकिस्तानात परत जाताच सूर बदलला! राजीव गांधींनी सुरुवात चांगली केली पण बोफोर्सच्या तोफांनी त्यांची विकेटघेतली. जीनांना गांधींनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद नाकारले म्हणून ते रागावले असे माझ्या वाचनात आलेले आहे, असूयेबद्दल माझ्या वाचनात अद्याप आलेले नाहीं.
जिग्नेश - सोमवार, 2 डिसेंबर 2013
अहो, रेशीम बागेची दृष्टी असली की सरळ उलटे आणि उलट सरळ दिसते. फाळणीला जिना नाहीत तर गांधीजी जबाबदार आहेत आणि नेहरूंनी आधुनिक भारताचा, परराष्ट्रीय धोरणांचा पाया घातला नाही तर पूर्ण वाट की हो लावून ठेवली. वाजपेयी आपले आहेत साभाळून घ्या. मोडी तर चंद्रगुप्त मौर्यच की. एका पाकिस्तानी मित्राल मी विचारले की बाबा तू का बरे मला फुकट खायला देत आहेस? स्वताच्या भावाला देत नाहीस. तर तो म्हणाला की हिंदुना (बहुतेक ब्राम्हण म्हणायचे असेल) फुकट खायला दिले की ते तुमचे होतात. मग त्यांना सोवळे ओवले अभक्ष्य सगळे चालते. नंतर त्यांचा गळा कापला तरी ओरडत नाहीत.
शेखर - सोमवार, 2 डिसेंबर 2013
सुधीर काळे: उत्तराबद्दल आभारी आहे. प्रॉब्लेम असा आहे की समंजस जनता भारतात बरीच जास्त आहे आणि पाकिस्तानमध्ये अल्प संख्येत आहे. याचे कारण पुन्हा एकदा धर्मवेड, मदरसाची शिक्षण पद्धती आहे. हाफीज साईद किंवा झैद अहमद यासारख्या लोकांचे यूट्यूब वर विडीओ, त्याचे, व्यूस, लाइक्स आणि कॉमेंट्स पहा. हे सगळे तर शिकलेली जनता करते. पाकिस्तानमध्ये अजूनही "इस्लाम खतरे में है" या नारयाखाली असंख्य जनता एकत्र येते. (नाहीतर आत्तापर्यंत हाफीज, दाउद सारखे लोक पाकिस्तानमध्ये सुखात लपून राहू शकले नसते. जनता इस्लामचे पाईक या दृष्टीने त्यांच्याकडे पाहते.) थोडीशी चुणूक हवी असेल तर काश्मीर, मुंबई बद्दल थोडेसे बोलून पहा, खरा पाकिस्तानी समोर येतो. उगाच बॉलीवूड, आणि क्रिकेट यावरच डिनर आणि ड्रिंक्सचा काय फायदा? याचा अर्थ संवाद पूर्ण थांबवणे होत नाही. परंतु डोळसपणे, कणखरपणे शांतीची बोलणी करणे आणि लागल्यास मर्यादित आणि तडक कारवाई करणे या उपायांनीच पाकिस्तान हाताळता येईल. नाहीतर दरवेळा या मवाळ धोरणामुळे जीवितहानी चालू राहील.
डॉ. हेमंत जुन्नरकर - सोमवार, 2 डिसेंबर 2013
श्री. सुधीर काळे यांस, माझ्या वाचनातील माहिती थोडक्यात देत आहे. १. इंदिरांजींचे लोटांगण:- सिमला कराराच्या वेळी भुत्तोंनी इंदिरांजींना पटविले की, पाकिस्तानला भारताने काही दिले नाहीत तर पुन्हा पाकिस्तानात लष्करी राज्यकर्ता येईल, जो भारताला महागात पडेल. इंदिराजींना हा मुद्दा पटला. त्यांनी सपशेल लोटांगण घातले नाही. २.राजीव गांधींची कारकीर्द:- राजीव गांधी कठीण परिस्थितीत पंतप्रधान झाले होते. त्यांनी पंजाब करार व आसाम करार केले. त्यांच्या काळातील ऑप्ररेशन ब्लॅकथंडर या सुवर्णमंदिरातील कारवाईस शिखांनीसुद्धा विरोध केला नाही. श्रीलंका करार करून त्यांनी आपल्या प्राणांचे मोल दिले. ३. जिनांची पाकिस्ताननिर्मितीमागील प्रेरणा:- गांधीजींच्या लोकप्रियतेबद्दल असूया हीच जिनांच्या पाकिस्तानच्या मागणीमागील प्रेरणा होती. एकदा मागणी केल्यानंतर जिना अपरिहा-यपणे जातीयवाद्यांच्या हातातील बाहुले झाले होते. पूर्ण पंजाब आणि पूर्ण बंगाल मिळणार नाही हे कळल्यावर खख्खर लोक जिनांना मारण्यास निघाले होते. (स्टॅन्ले वॉल्पर्ट यांचे ' जिना ऑफ पाकिस्तान' वाचा)
सुधीर काळे, जकार्ता - सोमवार, 2 डिसेंबर 2013
अ. रा. देशपांडे-जी, कंदाहार प्रकरणी निर्णय घेणे अवघडच होते कारण अनेक भारतीयांचे प्राण पणावर लागलेले होते. पण तरीही तिथे वाजपेयी चुकले असे मलाही वाटले होते. पण असे अनेक चुकीचे निर्णय नेहरूंनी, शास्त्रींनी व इंदिराजींनी घेतले होते. सिमला कराराबाबतच्या चर्चेत भुत्तो अगदी चारी मुंडे चीत होते पण इंदिराजींनी त्यांना "पृथ्वीराज चौहान" पद्धतीचे जीवदान दिले! शास्त्रींनी ताश्कंद कराराला मान्यता द्यायला नको होते असे कित्येक लोकांचे म्हणणे होते. थोडक्यात एकादी चूक कुणाहीबद्दल दाखविता येते. पण एकंदरीत शास्त्रींची, इंदिराजींची आणि वाजपेयींच्या कारकीर्दी दृष्ट लागण्यासारख्या झाल्या असेच मला वाटते. पण राजीव गांधी, ममो, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांच्या कारकीर्दींबद्दल असे वाटत नाहीं हे खरे!
Sudhir Kale, Jakarta - सोमवार, 2 डिसेंबर 2013
शेखर-जी, कांहीं मुद्दे मान्य! उदा. या देशाची निर्मिती भारतद्वेषया एका मुद्द्यावर झाली असू शकते. माझे या इतिहासाचे ज्ञान इतके सॉलिड नाहींय्, पण असेही वाचले आहे कीं जीनासाहेबांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद नाकारले म्हणून त्यांनी ईर्षेने पाकिस्तान निर्माण केला. पण जगात बाकी कुठे असे उदाहरण आहे कीं नाही ते मला माहीत नाहीं. २) पाकिस्तानने (सरकारने) वेळोवेळी भारतावर आक्रमण करायचा प्रयत्न असफल झाला आहे हे नक्कीच खरे आहे. पण पाकिस्तानी लोक कसे आहेत? फाळणीत खूप रक्तपात झाला, पाठोपाठ दोन युद्धेही झाली म्हणून माझ्या आधीच्या पिढीचे लोक एकमेकांचा द्वेष करत असतील, पण माझ्या मते आज तरी असे आहे असे वाटत नाहीं. पाकिस्तानी लोकांना भारताबद्दल एक आदरयुक्त दबदबा वाटतो असे मला वाटते. आजपर्यंत वाकड्यात जाणारा व वाकडे बोलणारा एकही पाकिस्तानी मला भेटलेला नाहीं. (भाग-२ पहा)
Sudhir Kale, Jakarta - सोमवार, 2 डिसेंबर 2013
शेखर-जी, (भाग २, भाग १ वरून पुढे) हुमा युसुफ, हाजरा मुमताज, राफिया झकेरिया या स्त्री-स्तंभलेखिका व आयाज अमीर, कामरान शफी, इरफान हुसेन, मलिक सिराज अकबर (बलोचिस्तानी), प्रा. याकूब खान बंगाश, प्रा. हुदाभाई वगैरे प्रथितयश पुरुष स्तंभलेखक उलट-टपालीमला उत्तर देतात. आयाज अमीर यांनी तर मला लिहिले होते कीं लाहोरला आलात तर कळवा, we will meet over drinks & dinner. हे सारे काय दर्शविते? भारताबद्दल द्वेष असता तर अशा तर्हेsचा प्रतिसाद मिळाला असता काय? मला नाहीं असे वाटत. तेही आपल्यासारखे देशभक्त आहेत व आम्ही काश्मीर-बलुचिस्तानसारखे विषय टाळतो. पण एरवी मला त्यांच्या वागण्यात द्वेष काय अढीसुद्धा असलेली जाणविलेली नाहींय्. "मला भेटलेलेले पाकिस्तानी" असा एक लेखच लिहायचा मला मोह होतोय्, लिहीनही (समाप्त)
अ रा देशपांडे - रविवार, 1 डिसेंबर 2013
सुधीर काळे, जकार्ता बाबरी पडल्याची (किंवा पडल्याची) खंत व्यक्त करणार्यात तुमचा इंडोनेशिया देखील होता. असो इंडिया आणि इंडोनेशिया ह्यांचे संबंध चांगले असण्यामागे कोन्ग्रेस किंवा पंडित नेहरुच आहेत. जगातले सगळे मुस्लिम राष्ट्र आमचे दुश्मन आहेत असि गर्जना करणाऱ्या तोगडिया ह्यांचे राजकीय बंधू नारेद्न्रा मोडी पंतप्रधान झाल्यावर उलट भारताचे इंडोनेशिया सकट कितेक मुस्लिम देशांबरोबर संबंध खराब होतील ह्यात प्रामुख्याने अफगाणिस्थान आणि इराण असेल. वाढतील फक्त इस्राइल्शि तोही नालायक देश आपला वापर फक्त हिंदू मुस्लिम आपल्यात लढून कसे मारतील इतकच बघेन. सुनील मोदींना रजनीकांत बनवू नका मागच्या खेपेला कारगिल प्रकरणी वाजपेयी आणि कंधार प्रकरणी आडव्निनीची कशी भंबेरी उडाली होती ते माहिती करून घ्या
राहुल - शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2013
तरुण पाकिस्तानी मुलांनी गायलेले 'आलू-अंडे' हे गाणे ऐका.. ते गाणे पण ह्या लेखासारखेच आहे.. भारतातही बरीचशी अशीच परिस्थिती आहे..
रामचंद्र दुसाने - शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2013
आम्ही निर्माण केलेल्या स्वप्नातल्या जगात आम्ही वावरत होते या पद्धतीची विचारसरणी अजूनही भारतात आहे
शेखर - शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2013
परंतु इथे प्रतिक्रिया देणाऱ्या इतरांना आणि मला असे प्रामाणिकपणे वाटते की आतून पाकिस्तानला भारताबद्दल द्वेष आहे. बहुतांश हिंदू असणारा हा भाग आज मुस्लिमबहुल आहे, जे इतिहासात झाले ते झाले, आज कोणा मुस्लिम व्यक्तीबद्दल द्वेष नाही. परंतु इस्लामच्या विकृत प्रेमामुळे पाकिस्तान ना प्रगती करू शकला, ना भारतात राहू शकला. आणि आज, स्वातंत्र्य मिळून ६० हून अधिक वर्षे जाहल्यावर, शेजारी भारतात प्रगती, तुलनात्मक दृष्ट्या शांती, मोकळे वातावरण बघून पाकिस्तानी उदास होतात आणि पुढची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे न्यूनगंड, राग, भारताला दोष देणे इत्यादी प्रतिक्रिया होतात. सामान्य पाकीस्तानिदेखील आत्ता आत्ता दहशतवाद म्हणजे काय असतो, हे समजत आहेत. मला आठवते, २००६, २००८ इत्यादी नंतर पाकिस्तान्यांच्या प्रतिक्रिया "वाईट झाले, पण तुम्ही लोक सुद्धा दुष्ट आहात. काश्मीर सोडा मग ठीक होईल" अशा प्रकारच्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानच्या द्वेषाला, त्यांच्या दशेला अंत नाही. भारताने फक्त एक करावे, द्वेष न करता, जेव्हढ्यास तेव्हढे सहकार्य करून, सावध असावे. (भाग २).
शेखर - शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2013
काळे साहेब, मी आपले लेख बारकाईने वाचतो, कारण मला असे वाटते की आपल्याला नवे, भारतीयांना अपरिचित असणारे, पण दुसरी बाजू दाखविणारे लिखाण लिहिणे आवडते. हा लेख देखील आवडला परंतु केवळ या एका लेखामुळे किंवा त्याच्या समंजस असणाऱ्या लेखकामुळे पूर्ण पाकिस्तान साहिष्णूवादी आहे असे समजू नये. पाकिस्तानबद्दल बोलताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे १) या देशाची निर्मिती भारतद्वेष या एका मुद्द्यावर झाली. जगात बाकी कुठेही असे उदाहरण नाही. २) पाकिस्तानने वेळोवेळी भारतावर आक्रमण करायचा प्रयत्न करून असफल झाला आहे ३) आजदेखील बॉलीवूड सिनेमे पाहिले (बहुतेक करून खानांचे, यात वैयक्तिक द्वेष नाही परंतु हि वस्तुस्थिती आहे), किंवा सूरक्षेत्र मध्ये गायले म्हणून सारे पाकिस्तानी प्रेमळ होत नाहीत. बाहेर देशात त्यांना आपल्यासारख्याच वर्णद्वेषाला (आणि आजकाल संशयाला) सामोरे जावे लागते म्हणून आणि मनुष्य हा एक समूहवादी प्राणी असल्यामुळे ते आपल्याशी जुळवून घेतात. (भाग १). [सकाळ : कृपया प्रतिक्रिया छापा, मला काळे साहेबांशी चर्चा करायची इच्छा आहे.]
Sudhir Kale, Jakarta - शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2013
Dear Mr Chitnis, when I started reading your latest "punashcha hari om" comment, I thought the number of Pakistanis hating India is equal to number of Indians hating Pakistan! But you gave me a pleasant surprise in the last two sentences! That is exactly my opinion & I work in exactly that direction.....!
kdchitnis - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013
पुनश्च हरी ओम!पाकिस्तानी हे भारतीयांचे नुसते भाऊ नसून सख्खे भाऊ आहेत.सख्खे भाऊ एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी वडिलोपार्जित मालमत्ता जास्तीत जास्त आपल्याला कशी मिळेल यासाठी भांडतात कारस्थाने करतात,वेळप्रसंगी कट्टर शत्रूला सख्ख्या भावाचा काटा काढण्यासाठी घरात घुसवून स्वतः बेघर होतात.भारतीय इतिहासात मुलाने बापाचा,भावाने भावाचा गळा घोटणे असे अनेक दाखले मिळतील.हे सगळे मुद्दे नकारात्मक आहेत हे खरे पण प्रखर सत्यापासून आपण स्वतःला लपवू शकत नाही.पाकिस्तानी भारतीयांशी व्यक्तीशः जेव्हा तिसऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर कुठलेच ओझे नसते.एकमेकांविषयी पूर्वग्रह ठेऊन संवाद अशक्य.एव्हडे पाकिस्तानी सतर्क असतात.त्यांना भारतीय व्यक्तीशः कसे आहेत याची उत्सुकता आहेच.ती भागल्यानंतर मानवी भावना उचंबळणारच.म्हणून भारतात आलेले पाकिस्तानी,मुंबईत आलेले काश्मिरी अचंबित होतात व त्यांची दूषित मने निवळतात.पण मुक्कामावर पोहोचताच भोपळेचौकात!वारंवार संपर्क ठेवल्यास कडवटपणा कमी होईल व विश्वास बसणार नाही इतक्या लवकर मनोमीलन होईल.हे लवकर व्हावे हीच सदिच्छा.
विजय Gokhale - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013
Couldn't agree more with Mr. Chitnis.
विजय गोखले - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013
I am a very average person with limited wisdom, but I do believe in "FOOL ME ONCE SHAME ON YOU FOOL ME TWICE SHAME ON ME". The pakis have fooled us thousands of times! When Sharif miyan was in Washington recently he was singing the same old song about Kashmir and Obama had to shut him up. I have nothing in common with the Pakis, I don't like them, I don't think we should keep contacts with them, and above all I have no desire to know what is happening in their land or with them.
Sudhir Kale, Jakarta - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013
Dear Mr Chitnis, if you read this ToI news on this link (http://toi.in/tYkpfZ), you will understand who sows the seeds of hatred between our countries. It is not normal people like you & me but organizations like TTP (Taliban) who do it.
vishal - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013 - 04:00 PM IST
स्वत:चे हित पाहणाऱ्या व्यक्ती किंवा समूहांची एक समान कार्यपद्धती (मोडस ओपरंडी) असते. एक काल्पनिक शत्रू बनवणे आणि त्याविषयी भय पसरवून स्वत:चा राजकीय/आर्थिक/सामाजिक फायदा साधणे(उदा. हिटलर ने ज्यू लोकांना शत्रू बनवले होते).हिंदू/मुस्लिम/ब्राह्मण/मराठा/दलित/ओबीसी/भारतीय/पाकिस्तानी अशा सगळ्यांमध्ये काही लोक/ संघटना आहेत ज्या दुसऱ्या समूहाला शत्रू ठरवून स्वत:चे महत्त्व वाढवतात आणि त्यातून फायदा उपटतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या संपूर्ण समूहाला शत्रू मानत असाल तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही धूर्त आहात इतकाच होतो, त्या समूहाचे एकंदर सर्व लोक वाईट आहेत असा होत नाही.
सुधीर काळे, जकार्ता - गुरुवार, 28 नोव्हेंबर 2013
Mr Chitnis, I have met & known many Pakistanis here in Jakarta and I also know many Pakistani top steel plant executives and so it is not easy for me to subscribe to your point of view. May be you are mixing between Pak Armed Forces/Pak Government & Pakistani people (Pl note Pakistani Government has to follow ‘Khaki’ rule!) Most of the time, the Pakistani people here go out of the way to make me feel comfortable, invite me to their homes and want to discuss with me about our steelmaking business issues. One person even calls me on my birthday. Most of the times, Pakistanis are awed by the economic progress we could make under democratic type of government. This is quite apparent if you read the Readers' comments under the news of Tribune of Karachi (tribune.com.pk) I invite you to see for yourself.
विक्रांत, Chicago - बुधवार, 27 नोव्हेंबर 2013
काळे साहेब, बर्याच दिवसांनी लिहिलेल्या विचारप्रवर्तक अनुवाद लेखाबद्दल आभार. पाकिस्तानातील घडामोडींकडे दुर्लक्ष न करता बारकाईने लक्ष ठेवायला हवेच. पश्चिम जर्मनीची भरभराट बघून पूर्व जर्मनीच्या नागरिकांना ह्या सगळ्याला आपण मुकतो आहोत याची खंत वाटत असे. पाकिस्तानातील आमजनतेला भारताच्या भरभराटइ कडे लक्ष द्यायला वेळच नाही कारण भारतीय चित्रपटावर आणि इंटरनेट वरील अनेक गोस्ठींवर बंदी आहे. भारत द्वेषाने पछाडलेल्या आणि भरभराट म्हणजे काय याचे ज्ञानहि नसणाऱ्या त्या जनतेला अधोगतीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा मार्गाच नाही.
kdchitnis - बुधवार, 27 नोव्हेंबर 2013
सुधीर काळे धन्यवाद.इंग्रजीत लिहिणारे काही पाकिस्तानी पत्रकार बुद्धिवाद,उदारमतवाद मानणारे असतीलही. पण उदारमतवाद,सहिष्णुता मान्य नसलेले, भडकाऊ लिखाणच,पाकिस्तानी जनताला भावते.आज केवळ पाकिस्तान या एकाच इस्लामी राष्ट्राकडे अणुबॉम्ब आहे.याचा त्या जनतेला स्वाभाविकच मोठा अभिमान आहे.पूर्वी हरलेल्या सर्व लढायांचा वचपा अणुयुद्धात भारताला पूर्णपणे बेचिराख करून काढण्याची घाई,पाकिस्तानी जनता व तेथील राज्यकर्त्यांना झाली आहे,मग भले ते स्वतःही बेचिराख का होईनात,इतकी तिडीक त्यांच्या मनात भरलेली आहे! क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मिळवलेला विजय पाकिस्तानी जनतेला उन्माद आणतो.ह्या मानसिकतेतून पाकिस्तानी जनता बाहेर फक्त बॉलीवूडचे मुस्लिम नायक असलेले उर्दू सिनेमे पाहताना येताना दिसते.पक्षपातीपणा हा त्यांचा स्थायी भाव झाला आहे.जी भावना जोपासून पाकिस्तानची निर्मिती केली, तिच्यामधून बाहेर या हे जनतेला समजावणार कसे?शांततापूर्ण जीवनपद्धती,या उन्मादक अवस्थेतून बाहेर आल्याशिवाय प्रस्थापित होणार कशी?कुठलाही सर्वसमावेशक कार्यक्रम रेटणे तेथे शक्य नसल्याने पाकिस्ताने नेते हताश आहेत.
सुधीर काळे, जकार्ता - मंगळवार, 26 नोव्हेंबर 2013
सुनील-जी, ’नमोसाहेबांना इंडोनेशियाला संपवायची गरजच पडणार नाहीं. हा देश भारताला मित्र मानणारा देश आहे. नमोंनी मैत्रीचा एक हात पुढे केला तर हा देश आलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही हात पसरेल. केवळ बहुसंख्य मुस्लिम देश आहे म्हणून तुमचा गैसमज झालेला दिसतो. (तुम्ही मिपावाले सुनीलच काय?)
Sudhir Kale, Jakarta - मंगळवार, 26 नोव्हेंबर 2013
Mr Chitnis, Mr Ayaz Amir quite often refers to Indian origins of Pakisstan/Pakistanis. So does Mr Nadim F. Paracha who accepts his Indian origins. Please read his article "My name is Pakistan and I’m not an Arab" on this link:
http://nadeemfparacha.wordpress.com/2013/08/15/my-name-is-pakistan-and-im-not-an-arab/ where he refers to his family being from Punjab/India. When I sought permission of Ms. Rafia Zakaria, DAWN columnist, to translate one of her articles in Marathi, she wrote to me telling me that a lot of her relatives are from Maharashtra and asked me for a copy of my translated article for them to read. So your impression that Pakistanis don't accept their Indian roots may not be correct at least as far as English language authors are concerned. I can't comment on Urdu writers. The seeds of enmity are perhaps sown by Mullas or extremist elements in their tribe.
सुधीर काळे, जकार्ता - मंगळवार, 26 नोव्हेंबर 2013
हा लेख डॉनया वृत्तपत्रात प्रकाशित झालेला नसून The News International या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे. आयाज अमीर हल्ली या वृत्तपत्रातच लिहितात.
kdchitnis - मंगळवार, 26 नोव्हेंबर 2013
पाकिस्तानी पत्रकाराने केलेल्या विश्लेषणात एक तृटी लपलेली आहे. कुठलेही राष्ट्र पूर्वजांचा इतिहास,परंपरा व ध्येय घेऊन वाटचाल करीत असते.पाकिस्तानी जनतेने कोणत्या "उज्वल" परंपरांचा अभिमान बाळगावा?त्यांना भारतीय परंपरा हेच नकोसे वाटणारे ओझे झाले आहे.भारताबरोबर केलेल्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा दारूण पराभव झालाय!अशा खचलेल्या मनस्थितील ही जनता व त्यांचे नेते हे "बिमारू" व अपराधीपणाच्या भावनेचे कायमची शिकार आहेत.पाकिस्तानी जनतेची बॉलीवूडशी नाळ जुळते कारण उर्दू चित्रपट!पण आपल्याकडे "हे" मोकळेपण नसल्याची त्यांना प्रचंड खंत वाटते.काश्मीरचा प्रश्न धगधगत ठेऊन , इस्लाम व मुस्लिमांवर हिंदुस्तानात कसे अत्याचार होत आहेत याच्या कहाण्या पसरवून व हिंदू,अमेरिकन,,इस्रायेल यांचा समूळ नायनाट हे ध्येय ठेऊन धार्मिक नेते अतिरेकींचा "कारखाना"चालवीत आहेत!आणि राजकीय नेते त्यांच्यबरोबर फरपटत जात आहेत!ना धड इतिहास जगू देत ना वर्तमान अशी अवस्था झालेली पाकिस्तानी जनता ही खरे तर एक जागतिक शोकांतिकाच आहे!पण हे मान्य करण्याचे धैर्य आहे का या पत्रकारात?
सुरेश - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
लेखाला टायटल दिले नसते तर हा लेख भारताचाच वाटला असता ना! आपले राज्यकर्ते सुद्धा असेच नाकर्ते आहेत पण देश केवळ जनतेच्या सोशिकपणामुळे, बुद्धीमत्तेमुळे, संस्कारांमुळे आणि कष्टांमुळे टिकून राहिलेला आहे. नालायक राजकारणी फक्त क्रेडीट घेतात. पाकडे लांडे आणि आपण भारतीय यातील या मूलभूत फरकामुळे आपला पाक झालेला नाही हे जाणले पाहिजे. (धर्माचे नाव लिहिले तर तर सकाळ प्रतिक्रिया छापणार नाही, पण "देश वाचवून ठेवणारे आपण भारतीय" म्हणजे नक्की कोण हे सगळे जाणतात) सिक्युलरच्या नावाखाली गळे काढणाऱ्या लोकांना खरे तर हेच रुचत नाही. त्यांना भारताचा पाक करून हा देश बरबाद करायचा आहे म्हणूनच हिरव्यांना पद्धतशीरपणे पोसले जात आहे.
विकास - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
एवढा विचार करणारे विचारवंत पाकिस्तानात पण आहेत. पाकिस्तानातल्या "अल्प? अत्यल्प?किंवा कधीकाळी असलेल्या आणी आता नसलेल्या संख्यान्काविषयी पण विचार करावा..
सोनी - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
हा लेख वाचून वाटते कि जणू काही एखाद्या भारतीयांनी भारताविषयीच लिहिले आहे :(
त्रिपुरी - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
लेख जर गांभीर्याने वाचला तर लक्षात येईल कि भारतात ज्यांनी (अमेरिकेत स्थायिक NRI ) outsourcing आणले त्यांनीच देश घडवला .. आपले सरकार हे या सारखेच आहे .. मात्र आजूनही आपले सरकार जागे होत नाही .. भारत रत्न पहिले outsourcing भारतात आणणाऱ्या भारतीयाला द्यायला हवे कारण हाच फक्त एक असा भाग आहे ज्याने भारत आणि पाकिस्तान वेगळे आहे .. सरकार मुळे नाही आपले हि सरकार same आहे आणि हीच परिस्थिती आपले कडेही झाली असती पण लोक बघाना political करांना साठी भारत रत्न दिले तरी आजून समजत नाही .. पाकिस्तानी लोकांकडे शिक्षणाचा आभाव आहे आणि आपण शिक्षण घेऊनही अभावी आहोत .. आपले शिक्षणही फार चांगले नाही TOP uni मध्ये आपला आजूनही number नाही फक्त बाहेरील कामे आल्यामुळे आपण वाचलो नाहीतर आज आपलेकडेही अराजकता माजली असती .. तेव्हा त्या लोकांना भारत रत्न द्या हीच विनंती या लेखावरून
सुनील - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
पाक जनता स्वप्नांना बधणार नाही - बधले काय नाही बधले काय भारतीयानन काही फरक पडणार नाही, एकदा नमो पंतपराधान होऊ देत पाकिस्तान ला पाच दिवसात संपवतील आणि indoneshiala दीड दिवसात.
Dr हेमंत जुन्नरकर - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
हेच लेखन भारतात करणे आणि पाकिस्तानात करणे यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण पाकिस्तानात विचारस्वातंत्र्य नावालाच आहे. यामध्ये डॉन या वृत्तपत्राचा वाटा मोठा आहे. कारण हे वृत्तपत्र असे लेख निर्भयपणे छापते. आपल्याकडे मोठी मोठी वृत्तपत्रे कुठल्या ना कुठल्या पक्षाला बांधलेली आहेत, नाही तर गुळमुळीत भूमिका घेण्यात धन्यता मानतात. पण सर्वांत मोठी काळजीची गोष्ट म्हणजे या लेखातील पाकिस्तान नाव काढा आणि भारत नाव टाका. बहुतेक गोष्टी आपल्यालाही लागू होतात. या लेखामधून भारतानेसुद्धा बोध घेण्यासारखा आहे.
शरद chinchalkar - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी आहे.पाकिस्तानात तयार केलेला war हा चित्रपट फार लोकप्रिय होत आहे .त्यात भारतातून आलेल्या अतिरेक्यांनी केलेली दुष्कृत्ये दाखवली आहेत.धादांत खोटा प्रचार करणारा चित्रपट तिथे आवडत आहे हे चांगले लक्षण नाही.भारत ,अमेरिका आणि इस्राइल पाकिस्तान नष्ट करू पहात आहेत यावर त्यांचा विश्वास आहे.सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानातल्या कुणावरही विश्वास ठेवू नये.पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावून त्यांना फालतू महत्व देणे बंद करावे.
pritam - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
पाक मध्ये अजून बरेच लेखक हे पाकिस्तानच्या लष्कर आणि शैक्षणिक धोरणावर टीका करतात ...उदा. हसन निसार..नजाम सेठी...परवेज हूड्भाई...एक नक्की कि पाक मध्ये थोडी फार जागृती होत आहे....हे लेखक पाक च्या शालेय पुस्तकातील भारताविरुधाच्या चुकीच्या लेखनावर टीका करतात.
Amit B. - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
मूळ प्रश्न पाकिस्तान नाही तर इस्लाम आहे.
आशिष Mhabadi - सोमवार, 25 नोव्हेंबर 2013
तुम्हाला नक्की काय साधायचे आहे ह्या लेखातून.

No comments:

Post a Comment