Sunday 30 December 2012

आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?

आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?
 
(एका पाकिस्तानी प्राध्यापकाचा काश्मीर प्रश्नावरचा आगळा-वेगळा व अतिशय वाचनीय लेख)
मूळ लेखक - प्रा. याकूब खान बंगाश, लाहोर,
अनुवाद - सुधीर काळे, जकार्ता

प्रा. याकूब खान बंगश हे लाहोरच्या 'फोरमॅन ख्रिश्चन कॉलेज'मध्ये इतिहासाचे प्राध्यापक असून, त्यांचा पहिलाच लेख मी अलीकडे वाचला. खरे तर 'आपण काश्मीरला विसरलेलो आहोत?' हे लेखाचे शीर्षक वाचूनच मी त्यांच्या लेखाकडे आकर्षित झालो. वाटले होते की नेहमीप्रमाणे भारताला दोष देणारा लेख असेल. पण तो वाचल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या लेखात लेखकाने पाकिस्तानची विशीतली पिढी काश्मीरबद्दल कशी उदासीन झाली आहे याची चर्चा केलेली आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न बाजूला ठेऊन इतर समस्यांकडे लक्ष देऊन आपले जीवनमान सुधारावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.

खाली मी या लेखाचा केलेला अनुवाद देत आहे. माझे स्वतःचे विचार लेखाच्या शेवटी दिलेले आहेत.


गेल्या वर्षी 'ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या एका लेखात 'पाकिस्तानने काश्मीरबाबतचा आपला पवित्रा, केवळ काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठीच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानच्या कल्याणासाठी, बदालायला हवा', असे प्रा. याकूबसाहेबांनी लिहिले होते [१]! एरवीसुद्धा आम पाकिस्तानी जनतेपेक्षा पाकव्याप्त काश्मिरी जनतेने जास्त प्रगती करून घेतलेली आहेच. जर काश्मीर-तंट्यात पाकिस्तान अडकले नसते तर ते जास्त सुरक्षित, स्थिर, लोकशाही राज्यपद्धतीने सरकार चालविणारे आणि सुधारलेले राष्ट्र बनले असते यात शंकाच नाही, असेही याकूबसाहेबांचे म्हणणे आहे!

फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात याकूबसाहेबांनी आयोजलेल्या चर्चासत्रांच्या शृंखलेत त्यांनी 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हा विषय निवडला होता. भरगच्च भरलेल्या सभागृहात घेतल्या गेलेल्या बलुचिस्तान आणि तालिबान, या दोन विषयांवरील या आधीच्या चर्चेनंतर तशाच तर्‍हेची आवेशपूर्ण चर्चा काश्मीरवरही होईल, अशी याकूबसाहेबांची अटकळ होती. या चर्चासत्राला आणखी रंगत यावी म्हणून आणि जास्तीचे प्रलोभन म्हणून त्यांनी एके काळी पाकिस्तानी लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आणि काश्मीरमधल्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या आपल्या एका सहकार्‍यालाही आपले वैयक्तिक अनुभव आणि विचार सर्वांसमोर मांडण्यासाठी याकूबसाहेबांनी आमंत्रित केले होते. हे सहकारीही सध्या फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.

पण या चर्चासत्रात जे घडले ते बरेच काही नवे सांगून गेले. हा जो गट चर्चासत्राला आला होता त्याला सार्‍या पाकिस्तानचे प्रातिनिधित्व करणारा गट, असे काही म्हणता येणार नाही. पण हेही तितकेच खरे की पाकिस्तानच्या चारी मुख्य प्रांतांचे आणि गिलगिटचे [२] विद्यार्थी तिथे जमले होते. त्यात पुरुष होते आणि स्त्रियाही होत्या. बहुसंख्य ग्रामीण भागातले होते आणि समाजाच्या
सर्व सामाजिक आर्थिक स्तरातील विद्यार्थी तिथे जमले होते. चर्चासत्राची सुरुवात झाली तेव्हा खूप गर्दी होती पण या विषयात कुणाला फारसा रस नसावा असे याकूबसाहेबांना जाणवले.

पाकिस्तानच्या रूढ किंवा पारंपरिक पवित्र्याबाबत कुणाला काही बोलायचे आहे काय? असे याकूबसाहेबांनी तीन वेळा या विद्यार्थ्यांना विचारले, पण कुणीच तोंड उघडले नाही. आणखी जरा चुचकारल्यावर एका विद्यार्थ्याने एका उदासीन प्रयत्नात म्हटले, 'आपण काश्मीरला कधीच विसरता कामा नये. कारण आपले पाणी काश्मीरमधूनच वहात येते.' या एका प्रतिसादापलीकडे पाकिस्तानच्या पवित्र्याबाबत इतर कुठलाही उल्लेख कुणी केला नाही. कुणी भारतीयांच्या काश्मिरी जनतेवरच्या अत्याचारांचा उल्लेख केला नाही, कुणी फाळणीच्या वेळी न सुटलेल्या या समस्येचा उल्लेख केला नाही किंवा मुस्लिम बांधवांबद्दलही कुणी बोलला नाही. आधीच्या दोन चर्चासत्रांत बलुचिस्तान आणि तालिबान या दोन विषयांवर जशी आवेशपूर्ण चर्चा झाली त्या पार्श्वभूमीवर काश्मीर या विषयावरील चर्चा फारच कंटाळवाणी आणि जोशरहित झाली.

हळू-हळू विद्यार्थी सभेचे ठिकाण सोडून जाऊ लागले. जशी त्यांची संख्या घटू लागली तशी ही चर्चा याकूबसाहेबांना वेळेआधीच आवरती घ्यावी लागली! कारण कुणालाच या चर्चेत स्वारस्य वा आस्था दिसली नाही.

१९९० च्या दशकात वाढलेल्या याकूबसाहेबांचा पिंड तसा 'पाकिस्तान टीव्ही'वरच्या काश्मीरबद्दलच्या बातम्यांवर पोसलेला आहे, असे ते म्हणतात. म्हणून या चर्चासत्रात खूपच तावातावाने चर्चा होईल असे त्यांना वाटले होते. कदाचित हा वार्तालाप जर १९९२ साली आयोजला असता तर अगदी उत्कटपणे आणि कळकळीने या विषयावर चर्चा झाली असती. मग आता काय बदलले आहे?

याकूबसाहेबांच्या मते तीन गोष्टी बदलल्या आहेत!

पहिली गोष्ट ही, की पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा सरकारी प्रचाराद्वारा जिवंत ठेवला होता. भारतीय सैन्याच्या काश्मिरी जनतेवरील रोजच्या अत्याचाराच्या, जुलुमाच्या बातम्या-काही खर्‍या तर काही तिखट-मीठ लावून सांगितलेल्या-ऐकवून पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्ध भावनावेगाने भडकविणे हाच त्यामागचा मूळ हेतू असायचा. फक्त एकुलती एक दूरचित्रवाणी वाहिनी असल्यामुळे आणि जनतासुद्धा 'नियंत्रित' असल्यामुळे जनतेच्या मनात अशी भावना निर्माण करणे पाकिस्तानी सरकारला सोपे होते. सध्या प्रसारमाध्यमांना बरेच स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील वातावरण सुधारल्यामुळे सत्य परिस्थिती आता लपून राहिलेली नाही, असे याकूबसाहेब म्हणतात.

दुसरी गोष्ट अशी, की अर्धी पाकिस्तानी जनता आता तिशीपेक्षा तरुण आहे आणि काश्मीरबरोबरच्या नात्यात त्यांना पहिल्यासारखी जवळीक वाटत नाही. काश्मीर समस्या पहिल्या पिढीच्या पाकिस्तान्यांना 'आपली' समस्या वाटत असे. पाकिस्तानच्या दुसर्‍या पिढीने त्या समस्येकडे एक 'वाडवडिलांकडून वारसाहक्काने आलेली' समस्या म्हणून पाहिले. पाकिस्तानच्या तिसर्‍या पिढीचे काश्मीरशी फारसे संबंध, फारशी जवळीक राहिलेली नाही. १९४७ साली पाकिस्तान कसर लागलेल्या आपल्या राष्ट्राचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सध्याची सरहद्द शाबूत ठेवणेच किती अवघड झालेले आहे, याची आताच्या तरुण पाकिस्तान्यांना चांगली कल्पना आहे. एक धर्म सोडला तर ज्या भागाचा आपल्या राष्ट्राशी इतर काहीच संबंध उरला नाही, त्या भागाचे आपल्या देशात विलीनीकरण करणे म्हणजे इजिप्तचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यासारखे आहे असेच आताच्या तरुण पाकिस्तान्यांना वाटते. आजच्या तरुण पाकिस्तानी पिढीला एकाद्या उदात्त धर्माधिष्ठित कल्पनेच्या आहारी जाण्यात कुठलेच स्वारस्य उरलेले नाही. आपली प्रगती आणि आपले सुख एवढ्याच गोष्टींबाबत तो चिंतित आहे, ही या चर्चासत्राद्वारे बाहेर आलेली तिसरी गोष्ट. आजच्या पाकिस्तानी व्यक्तीला भारताविरुद्ध भांडखोर, आक्रमक प्रवृत्ती ठेवण्यापेक्षा भारतात एकादी चांगली नोकरी किंवा चांगले काम मिळविण्यात त्याला जास्त स्वारस्य उरले आहे, असेच याकूबसाहेबांना वाटते[३].

पाकिस्तानच्या काश्मीरबाबतच्या उदासीनतेचे उत्तम उदाहरण सापडते ते दिफा-ए-पाकिस्तान परिषदेत! या परिषदेला प्रत्येक विषयावर टोकाची विचारसरणी असलेल्या वृद्ध पाकिस्तान्यांच्या एका विभिन्न आणि विजोड अशा टोळक्याचे स्वरूप आले आहे. ही परिषद आता दिवसेंदिवस असंबद्ध आणि कालबाह्य झालेल्या जनतेच्या जुन्या समस्या कशाबशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची मरणासन्न संघटना उरली आहे. जर पाकिस्तानी जनतेला काश्मीरबाबत खरोखर इतकी काळजी आणि आस्था असती, तर या परिषदेला मेळावे जमवून भारताचा तिरस्कार करण्याची आठवण सतत करून देण्याची आवश्यकताच वाटली नसती!

पाकिस्तान आता आपल्या भूतकाळाशी फारकत घेऊ लागला आहे आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आता एक फलनिष्पत्तीकडे आणि विकासाकडे  डोळसपणे पहाणारे, परस्पर सहकारावर भर देणारे आणि शेजारी राष्ट्रांशी शांततेने, सौहार्द्राने रहाणारे  राष्ट्र बनू इच्छित आहे. म्हणूनच काश्मीर समस्येवर दोन्ही बाजूंचा फायदा होईल असा समंजस तोडगा काढून आणि जुना अव्यवहारी आणि आदर्शवादी पवित्रा सोडून तसा करार करण्याची संधी घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असे याकूबसाहेब शेवटी सांगतात.

मूळ लेख वाचा या दुव्यावर -

http://tribune.com.pk/story/477777/maybe-we-have-forgotten-kashmir/

टिपा -

[१] Time to forget Kashmir या लेखात याकूबसाहेब यांनी फक्त मनमोहन सिंग यांच्या 'पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भर न देता आपल्या अंतर्गत समस्यांकडे जास्त निकडीने लक्ष द्यायला हवे', या विधानाचाच उल्लेख करून न थांबता, त्यांनी मौलाना फजलूर रहमान यांच्या पाकिस्तानच्या 'जमीयत उलेमा इस्लाम (फजल गट) या विरोधी पक्षाचे नेते मौलाना फज़ल उर रहमान 'अर्थातच पाकिस्तानला राजनैतिक तोडगा हवा आहे. पण परिस्थिती खूपच बदललेली आहे. आता 'पाकिस्तान कसे वाचवायचे' ही समस्या मोठी झाली असून त्यामुळे काश्मीर जिंकून घेण्याची संकल्पना मागे पडली आहे', या विधानाचाही उल्लेख केला आहे. याकूबसाहेब पुढे म्हणतात, की असे न परवडणारे भांडण करण्याचा मार्ग पाकिस्तानने निवडला नसता तर पाकिस्तानी लष्कर आपल्याच मुलकी सरकारला चार वेळा बरखास्त करण्याइतके मजबूत झालेच नसते. '१९८९पासून प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थिती असली तरी भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरने साक्षरता, आर्थिक प्रगती आणि दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत पाकिस्तानपेक्षाही जास्त प्रगती केलेली आहे. मग ते कशाला पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छितील? पाकिस्तानकडे त्यांना देण्यासारखे काय आहे?' असाही प्रश्न याकूबसाहेब या लेखात विचारतात!

पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते पाकिस्तानी सरकारने आपल्या शासनपद्धतीत राष्ट्रीय विविधतेकडे दुर्लक्षच केलेले आहे आणि पूर्व पाकिस्तान, बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तान यांच्याविरुद्ध केलेल्या मोहिमांवरून खरीखुरी प्रांतीय स्वायत्तता स्वीकारण्याबाबतची त्या सरकाराची नाखुषीच स्पष्ट दिसून येते असेही ते लिहितात.

शेवटी ते म्हणतात, की जोवर पाकिस्तान आपले घर सावरत नाही, तोपर्यंत त्याने भारताच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याचे सोनेरी स्वप्न सोडून दिले पाहिजे. कारण जिथे आपल्या ताब्यात असलेल्या कित्येक भागावर आपल्या सरकारचे नियंत्रण नाहीं आणि जिथे पाकिस्तानी जनता आर्थिक आणि सुरक्षेसंबंधीच्या काळजीत व्यग्र आहे तिथे गेली सहा दशके प्रगतीच्या वेगळ्याच कक्षेत असलेला आणखी एक मोठा मुलुख काबीज करण्याची आशा बाळगणे अगदीच हास्यास्पद आहे.

शेवटी ते म्हणतात, की काश्मीरबाबतचा आपला आक्रमक पवित्रा आपण केवळ काश्मीरमधील दुःख भोगणार्‍या मुस्लिम बांधवांसाठीच नाहीं तर भारतामध्ये असेच दुःख भोगणार्‍या १४ कोटी मुस्लिम बांधवांच्या हितासाठी सोडला पाहिजे कारण जोवर पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण आक्रमक आणि प्रतिकूल आहे तोपर्यंत हिंदू बहुसंख्य भारतात या मुस्लिमांकडे संशयी नजरेनेच पाहिले जाईल.

४ जुलै २०११ रोजी प्रकाशित झालेला हा संपूर्ण लेख वाचा या दुव्यावर:

http://tribune.com.pk/story/202209/time-to-forget-kashmir/

[२] गिलगिट हा पूर्वीच्या काश्मीर राज्याचा भाग होता व १९४८ सालच्या युद्धबंदीनंतर या काश्मीर संस्थानाचा गिलगिट-बाल्टिस्तानसह ४० टक्के भाग पाकिस्तानकडे राहिला तर जम्मू आणि लडखसह ६० टक्के भारताकडे. (http://en.wikipedia.org/wiki/Gilgit)

[३] आज भारतात बॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणावर पाकिस्तानी कलाकार घुसले आहेत तिकडे पहाता हे खरेच वाटते.

मूळ लेख ७६० शब्दांचा असून त्याला आलेल्या १०४ प्रतिसादांतील शब्दसंख्या आहे ७००० पेक्षा जास्त आहे. सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या वाचकांनी-भारतीय आणि पाकिस्तानी-प्रतिसाद दिलेले आहेत. अनेक वाचकांनी टोपणनावाने प्रतिसाद लिहिलेले असून, त्यात भारतीय मुस्लिम वाचकांचा समावेश असल्यामुळे सरहद्दीच्या कुठल्या बाजूच्या वाचकाने कुठला प्रतिसाद दिला आहे हे ओळखणे कठीण होते. अपेक्षेनुसार कांहीं प्रतिसाद अगदी ’कट्टर’ असले तरी बरेच समंजसही आहेत. पण कुणी कट्टर लिहिले आहेत आणि कुणी समंजस हे वरील कारणांमुळे कठीण काम झाले आहे. लेखाइतकेच हे प्रतिसादसुद्धा वाचनीय आहेत. दुवा उघडून सर्वांनी जरूर वाचावेत.

माझेही ४ प्रतिसाद असून त्यातून माझी या लेखाबद्दलची मते स्पष्ट होतात. त्यातला पहिला आहे 'Hats off to the courage of the author Yaqoob Khan for writing such an article! The Kashmir issue is being kept alive only by Pakistani Armed Forces lest its very ‘raison d’etre’ vanishes & they can't continue enjoying good things their present Military job offers them."

दुसरा प्रतिसाद होता, 'Whatever be the magic, but whenever one writes an article discussing 'Kashmir' on both sides of the border between India & Pakistan, one gets maximum responses! I think both the countries are obsessed by Kashmir. Does Kashmir deserve so much obsession? NO!

माझा तिसरा प्रतिसाद विजय कौल या काश्मिरी हिंदू वाचकाच्या प्रतिसादाला होता. 'Kashmir is not a local aberration, it is as global as is Palestine, Chechnya, or for that matter the rising number of festering sores in the name of the game called Jihad.

Let’s make no mistake. Kashmiris continue to be brainwashed and have landed themselves in a hot soup of jihadi imbroglio, after ethnically cleansing their co-kashmiris who did not convert over centuries into Islam.'

या प्रतिसादाला उत्तर म्हणून होता. त्यात मी लिहिले होते, 'Very well said, Mr Kaul, yourself a Kashmiri, probably displaced from his own homeland ethnical cleansed by fellow Kashmiris while Indian government just stood by watching! What a pity!'

आणि शेवटचा प्रतिसाद होता झीशान नावाच्या एका वाचकाला उत्तर म्हणून. या वाचकाला सर्वात जास्त लोकांनी लक्ष्य केलेले दिसले. माझ्या प्रति-उत्तरात मी लिहिले होते, "@Zeeshan: Please don’t get emotional!

(1) Just see how many Pakistani artists are working in so-called Bollywood and enjoying prosperity. Also don’t forget that Indians support their talent though they are not Indians.

(2) To your rhetorical question 'And, where do you get the idea of 'improvement of the situation in Indian-Occupied Kashmir'? From Kashmiris or Indians?" I say, "My dear friend, Kashmiris participated overwhelmingly in most of the elections held in J&K voted to a level of 80% turn out trashing the 'Boycott' calls by separatists leaders. What does it tell you?

(3) If Kashmiris are to be given an option of 'Independence', it must be given to every State in India and Pakistan from Kashmir to the North to Tamilnadu to the South & Balochistan to the West to Assam to the East! I am sure both India & Pakistan don’t want to test this option! After all Pakistan has not yet given 'independence' to what it wrongly calls as 'Azad' Kashmir!

Mr Yaqooob Khan Bangash has done a yeoman's service by writing this article and it is in Pakistan’s interest to rea d & study it dispassionately!

पाकिस्तानला आत्मनिरीक्षण-आत्मपरीक्षण करून भारताशी मैत्री केली पाहिजे असे माझे मत पूर्वीपासून आहे. हा (आणि असेच आयाज अमीर, कामरान शफी यांचे) लेख वाचल्यावर ते आणखीच दृढ झाले! 
===============
सकाळच्या वाचकांचे प्रतिसाद"
===============
सुरेश अगरवाल - मंगळवार, 12 मार्च 2013 - 01:06 PM IST

काश्मिरी जनतेला अजीबात पाकिस्तानात जायचे नाहीं. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. तसे स्वातंत्र्य देऊ केल्यास भारत/पाकिस्तानातील किती राज्ये विभक्त व्हायला तयार होतील याचा हिशेब व्यक्तिनिहाय वेगळा येईल. पण तो सुखावह नक्कीच नाहींय्. मग जम्मू-काश्मीरचे कौतुक कशाला? पंजाबला वेगळं होऊ द्यायचं? पूर्वेकडील अनेक राज्यांना वेगळं होऊ द्यायचं? विचार करा जरा! स्विस बँक ,world no one bank in Switzerland,As I know it is independent country. America England China all eyes over J & K ,कही पर निगाहे कही पर निशाना.अमेरिका चीन उगीच पाकिस्तान ला लालूच देत नाही. एकदा कि पाकिस्तान ने हात वर केले की J & K Switzerland होण्यास उशीर होणार नाही. 
===============

Sudhir Kale - बुधवार, 6 फेब्रुवारी 2013 - 01:09 PM IST
On 01/02/2013 08:37 PM Babare said: हा काळे लई danger आहे. का हो बाबारेसाहेब, मी "लई डेंजर" का बरं? आणि तुमच्या नावाचा बरोबर उच्चार काय? 
===============

Babare - शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2013 - 08:37 PM IST
हा काळे लई danger आहे. 
===============

Sudhir Kale - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 01:07 PM IST
अवंतिकाताई, आपले साद-प्रतिसाद भरकटू लागले आहेत कीं काय अशी शंका येते. सर्व गोष्टींची पुरेपूर माहिती असायला मी नक्कीच विकीपीडिया नाहीं. IRA चे & बास्क प्रदेशाचे उदाहरण केवळ इतर देशसुद्धा बंडाळीला कसे तोंड देतात एवढ्यापुरतेच होते. मला बास्क युद्धाबद्दलही तपशीलवार माहिती नाहीं. पण आयर्लंड व बास्क प्रदेशात मी कामासाठी दोनदा गेलो आहे व त्यावेळी तिथल्या लोकांशी बोलताना थोडी-फार माहिती मला कळली आहे. जी सीमीत स्वायत्तता ब्रिटनने "नऊ सौ चूहे खाके बिल्ली हजको चली"च्या थाटात २० पेक्षा जास्त वर्षांनंतर उत्तर आयर्लंडला दिली ती आपण काश्मीरला दीड-दोन वर्षातच दिली. माझा सार्वमताला कधीच विरोध नाहीं, संयुक्त राष्ट्राने दिलेल्या निर्णयानुसार अटी पाळून झाल्यावर ते नक्कीच घेतले जायला हवे. भारत त्यासाठी वचनबद्धच आहेच. फक्त आता १९४८ सालचा “मतदारसंघ” कुठून आणायचा हा किचकट प्रश्न समोर आहे. आणि काश्मीरला आजादीचा पर्याय द्यायचा असेल तर भारत-पाकिस्तानमधील प्रत्येक राज्याला तो दिला जावा असेच प्रत्येक लोकशाहीप्रेमीला वाटेल. पण ते व्यवहार्य आहे का? जर कुणी बंड केले तर त्याचा बीमोड तर करावा लागणारच असेही मला वाटते! 
===============

Sudhir Kale (Part-1 sending a second time) - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 12:37 PM IST
बाबारे साहेब (नावाचा उच्चार बरोबर आहे ना?), (भाग-१) पंजाबी, सिंधी, पठाण अशा तर्हेच्या वर्गवारीने एकेका जमातीच्या स्वभावविशेषाबद्दलचे आडाखे बांधणे हे बरोबर नाहीं व म्हणून मला तरी ते पटत नाहीं. असेच आडाखे आपण सर्व पाकिस्तान्यांबद्दल मांडतो आणि तेसुद्धा आपल्याबद्दल मांडतात. असेच चालू ठेवायचे काय? आपण आपल्या शेजारी रहाणार्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी निकराचे भांडण झाले तर घर बदलून ती समस्या मिटवून टाकतो, पण तशी "सोय" दोन शेजारी देशांमध्ये केली जाणे शक्य नाहीं. मग काय करायचे? जन्मभर लढत रहायचे? आज जन्मजन्मांतरीचे वैरी भासणार्या कट्टर शत्रूराष्ट्रांमध्ये दाट सलोखा झाल्याचे पहातोच ना? उदा. जर्मनी आणि फ्रांस, फ्रांस आणि इंग्लंड, इ. मग उद्या भारत व पाकिस्तानमध्ये कां नाहीं दोस्ती होणार? मला पटलेला एक मुद्दा मी वारंवार मांडत असतो. तो म्हणजे भारत-पाकिस्तानात युद्धसदृश परिस्थिती चालू ठेवण्यात फक्त एका संस्थेला आस्था आहे आणि ती संस्था म्हणजे पाकिस्तानी लष्कर. पाकिस्तानी लष्कराने अद्याप एकही युद्ध जिंकलेले नाहीं पण आपल्या Public Relations द्वारा ते आपला रुबाब मात्र चांगलाच राखून आहे. (भाग-२ पहा)

Sudhir Kale (In two parts, pl publish together) - शनिवार, 19 जानेवारी 2013 - 10:31 AM IST
बाबारे साहेब (नावाचा उच्चार बरोबर आहे ना?), (भाग-२) मी नियमितपणे पाकिस्तानी वृत्तपत्रें वाचतो. प्रत्येक युद्धात हरलेल्या या संस्थेबद्दल पाकिस्तानी वृत्तपत्रांत अर्धे प्रतिसाद "पाकिस्तानचा एकुलता एक तारणहार" असा सुद्धा केला गेलेला मी वाचला आहे. ती त्यांची लायकी नसली तरी ते रुबाब बाळगून आहेत. शांतता प्रस्थापित झाल्यास हा रुबाब तर नाहींसा होईलच पण या संस्थेचे महत्वही शून्यावर येईल. असे होऊ नये म्हणून हे लष्कर शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाना खीळ घालेल. म्हणूनच अचानक कारगिल युद्ध होते, अचानक २६/११ चा अतिरेकी हल्ला होतो, अचानक नियंत्रण रेषेवर आपल्या जवानांच्या देहाची विटंबना केली जाते. या सार्या घटना अतीशय योजनाबद्ध पद्धतीने आखल्या जातात व त्यांवर अंमलही केला जातो. अशा वेळी आपण जर शांतता-पर्व रद्द केले तर या कपटी, लबाड लष्कराच्या सेनानींच्या अभद्र योजनांना आपण नकळत यश देत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे! याविरुद्ध आपल्या सरकारने उघड विधाने करून पाकिस्तानी लष्कराचे भांडे फोडून मुलकी सरकारला "आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लष्कराला सांभाळा" असेच सांगितले पाहिजे व तशी वागणूक ठेवली पाहिजे. 
===============

Avantika - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 06:13 PM IST
Sudhir ji, I think you missed my point about IRAs. I knew that you haven't studied IRA issues because if you had, you wouldn't have included them in the discussion. As I said before, Britain realized that brutally attacking them won't solve the issue and they started "understanding" why they were so angry. That was my point. And now the same people who did bombings in England recently shook hands with the queen of England. And nobody in the world learned from it.I didn't understand why you copied and pasted the numbers about the IRA.I was not arguing if IRA killed people or not. I wanted to show how the terrorism was stopped. Please answer why Junaghad was attacked by Indian army when the muslim king declared that he wanted join Pakistan.Also, I am not sure why article 370 was considered essential, if kashmir was part of India. Even then, politicians had realized the uniqueness and complications of the issue. 
===============

Babare - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:35 PM IST
मी बर्याेपैकी वरच्या हुद्द्यावर असलेल्या एका जकार्तास्थित पाकिस्तानी गृहस्थाशी बोलत होतो. त्यावेळी मी नुकतेच नवाज शरीफ यांच्या "आपण भारताला आपला सगळ्यात मोठा शत्रू समजणे थांबविले पाहिजे"...वगैरे पाक्यांचे सगळे बकवास असते..विशेषतः पंजाबी पाकिस्तानी तर महा गोडबोलू आणि नेमका पाठीत खंजीर खुपसणारे.. पठाण त्यामानाने शब्दाला जगणारे..उगाच काही फेकू नका..त्यांच्याशी बोलून आपला वेळ वाया घालाव्ण्यासारखे आहे. 
===============

Sudhir Kale - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:33 PM IST
अवंतिका मॅडम, जुनागडमध्ये जसे सार्वमत झाले तसे काश्मीरमध्येही झाले असतेच. भारत सरकारने तसे वचनही दिलेले होते. पण पाकिस्तानने केलेली चढाई नडली. या करणीला केवळ पाकिस्तानच जबाबदार आहे. आझादी मिळण्याचा पर्यायच नव्हता व आजही नाहीं आहे. त्यामुळे तो प्रश्नच उपस्थित होत नाहीं. कुणी बंडाळी केली तर ती कुठल्याही देशाचे सरकार मोडून काढणारच मग भारताने का मोडून काढू नये? 
===============


Sudhir Kale (3 parts, pl publish together) - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:18 PM IST
अवंतिका मॅडम, भाग-१: संस्थानांच्या विलीनीकरणाचा विषय चर्चिला जात असताना आझादीचा विषय कशाला? जुनागडला सार्वमत घेतले गेले व विषय संपला. काश्मीरमध्येही सार्वमत घेतले गेले असते पण पाकिस्तानच्या सैन्याने आधीच चढाई केली व भारतालाही सैन्य पाठवावे लागले. संयुक्त राष्ट्रात हा तंटा नेण्याची चूक नेहरूंनी केली पण संयुक्त राष्ट्रात संमत झालेल्या ठरावात आक्रमक पाकिस्तानने आपले सैन्य मागे घ्यायचा आदेश होता. तो जर पाकिस्तानने पाळला असता तर हा विषय तेंव्हांच संपला असता. पण तसे झाले नाहीं व म्हणून सार्वमत घेतले गेले नाहीं. ते “जम्मू-काश्मीर” राज्यात जसे घेतले गेले नाहीं तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर संस्थानातही घेतले गेले नाहीं. आज अशा सार्वमताला कांहीं अर्थच उरलेला नाहीं कारण हिंदूचे स्थलांतर झाल्यामुळे मतदारसंघच शिल्लक उरलेला नाहीं. आणि “चॅदम हाऊस” अहवालानुसार आज पाकिस्तानात जायला काश्मिरी तयारच नाहींत. पाकिस्तानला आता माहीत आहे कीं काश्मीर कुठल्याही मार्गाने आपल्याला मिळणार नाहीं म्हणून तेही आता आजादीच्या वार्ता करत आहेत. पण संस्थानांच्या विलीनीकरणात आजादी हा पर्याय नव्हताच! (भाग-२ पहा) 
अवंतिका मॅडम, भाग-२: IRA बद्दल माझा अभ्यास पुरेसा नसल्यामुळे मी खालील उतारे देत आहे. माझा मुद्दा फक्त बंडाळी मोडताना होणार्याब रक्तपाताचा होता. इथे ३००० लोकांच्या मृत्यूचा उल्लेख खाली आहे. http://www.infoplease.com/spot/northireland1.html Although armed hostilities between Catholics and Protestants largely subsided after the 1921 agreement, violence erupted again in the late 1960s; bloody riots broke out in Londonderry in 1968 and in Londonderry and Belfast in 1969. British troops were brought in to restore order, but the conflict intensified as the IRA and Protestant paramilitary groups carried out bombings and other acts of terrorism. This continuing conflict, which lingered into the 1990s, became known as "the Troubles." Despite efforts to bring about a resolution to the conflict during the 1970s and 80s, terrorist violence was still a problem in the early 90s and British troops remained in full force. More than 3,000 people have died as a result of the strife in Northern Ireland.
अवंतिका मॅडम, भाग-३: On Feb. 5, 2010, with the signing of the Hillsborough Castle Agreement, Gordon Brown of Britain and Brian Cowen, prime ministers of England and Ireland, respectively, created a breakthrough in the Northern Ireland peace process. According to the terms of the accord, Britain will hand over control of the six counties' police and justice system to Northern Ireland. The shift to local control of the courts, prosecution system, and police has been the most important and contentious of the issues plaguing the tenuous power-sharing government. The agreement passed its first test on March 9, when the Northern Ireland Assembly voted its support 88–17, setting the stage for the April 12 power transfer deadline. "For the first time, we can look forward to policing and justice powers being exercised by democratic institutions on a cross-community basis in Northern Ireland," Cowen said. आज “जम्मू-काश्मीर” राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कारभार करत आहे.
===============

Avantika - शुक्रवार, 18 जानेवारी 2013 - 02:42 AM IST
Sudhir ji, I don't think you have read in detail how the issue of IRA was solved by Great Britain. Instead of attacking and killing them, they understood their problems and tried honestly to solve them and the issues were resolved. The simplest and the best way to reduce terrorism is not to get involved in it. That's exactly Indian government and public is unable to understand. In Punjab, they did the same thing, got involved in the things then shouldn't have and then paid a very heavy price. You didn't comment on the Gir issue.(i.e., It was run by a muslim king and population majority was Hindu. When he declared that he was going to join Pakistan, Indian government attacked the land and took control. So your argument about Hari Singh is not consistent and is very weak in my opinion. May be you can explain better. You can also watch Arundhati Roy's videos on youtube to see what her opinions are. She sounds reasonable and articulate.
===============

Sudhir Kale - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 09:01 PM IST
Mr Rupe, thanks for your words of appreciation. Ms Tanvi, I am happy that my comments made you look at issues a bit differently. I reiterate that there is nothing extraordinarily wrong that we are doing in J&K. All countries (including Pakistan, UK & Spain & many others) deal with insurgency & sedition activities in the same way. So we should stop feeling guilty about it! 
===============

tanvi - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 05:17 PM IST
सर, स्पष्टीकरण आवडल. तुमचे लेख खूप आशावादी असतात. वाचताना अस वाटत कि काश्मीर प्रश्न उद्याच सुटेल कि काय. पण वस्तुस्तिथी तशी नाही. तुमच्यासारखा विचार करणारे काही लोक पाकिस्तानमध्येहि जन्मायला हवेत. 
===============

Vishwanath Rupe विश्वनाथ रूपे (मुणगे) - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 04:58 PM IST
खूप सुंदर लेख ..नुसती बोलणी ..करून काही होणार नाही पाक ने खरेच डोळे उघडण्याची वेळ आहे. किती दिवस ढोंग करणार? आजची तरुण पिढी डोळस आहे आणि सत्या सत्याचा विचार करणारी आहे. अपेक्षा आहे कि काश्मीर स्थिती बदलेल.. 
===============

सुधीर काळे - गुरुवार, 17 जानेवारी 2013 - 09:02 AM IST
अवंतिकाताई, काश्मीरसारखी समस्या फक्त भारतापुरतीच मर्यादित आहे असे नाहीं. भारताप्रमाणेच आयर्लंड आणि स्पेनमध्येही रक्तलांछित लढे चालू आहेत. इतरत्रही चालू आहेत. आयर्लंडच्या "आयरिश रिपब्लिकन आर्मी"ने खूपच प्रभावीपणे व नेटाने लढा दिला. तो मोडून काढायला ब्रिटिश सैन्य तिथे तैनात केले होते! अलीकडेच कुठे जराशी शांतता आलेली आहे. स्पेनच्या 'बास्क' या प्रांताला काश्मीरसारखीच आजादी हवी आहे, पण तिथेही स्पॅनिश सेना व पोलीस लढत आहेत, बॉम्ब फुटत आहेत व रक्त वहात आहे! पण म्हणून इंग्लंड व स्पेनने त्या प्रांतांना आजादी दिलेली नाहीं. स्पेनने थोडी थातुर-मातुर स्वायत्तता दिलेली आहे (जशी आपणही काश्मीरला दिलेली आहे). तरी भारताला उगीचच अपराधीपणाचे ओझे खांद्यावर घेऊन वागण्याची गरज नाहीं. (The Basque Country or Basque Autonomous Community was granted the status of nationality "within Spain", attributed by the Spanish Constitution of 1978 to separate ethnic realities.) म्हणजे काय? फक्त मखलाशी! 
=============== 

Sudhir Kale (in 2 parts, pl publish together) - बुधवार, 16 जानेवारी 2013 - 09:23 PM IST
Ms Avantika, Part-1: Democracy does not give a right to any State to secede! At the time of partition, there were innumerable Princely States in the then undivided India. The areas which were beyond the Princely States were split on the basis of population. But the Princely States were given a choice to either merge with India or Pakistan. None was given the choice to remain independent. (If the choice of ‘independence’ had been given, we would be having 50-odd states of “United States of India”!) If Plebiscite is (ever) held on the basis of these choices by a miracles, I am sure that Kashmiris will vote for merger with India. Pakistan-occupied Kashmir (PoK) has remained demographically unchanged since partition (unlike in J&K in India, most of the Hindu population was forced to leave). As it is having overwhelming Muslim population, it is “assumed”, perhaps wrongly, that the Muslim population there is happy to be ruled by Pakistan. Chatham Report says it is not so! (Pl see part-2) 
Ms Avantika, Part-2: The only reason why Pakistan has NOT yet taken such a plebiscite in PoK to build moral pressure on India? Because they are clear about the outcome that will show that PoK is not at all keen to remain in Pakistan! So Kashmiris can vote for one of these two choices if ever a plebiscite is held which stipulates some pre-conditions which will never be fulfilled. That is why I said that plebiscite is a dream, a good dream. But today taking a plebiscite is meaningless because the Hindu population of J&K has been forced out from their homes. A plebiscite today is meaningless as a major portion of the Kashmiri population which was supposed to vote is no more in Kashmir. Plus Pakistan has not fulfilled an important pre-requisitse to plebiscite viz. vacating the occupied part of the Valley. But if & when it is held, rest assured that Kashmiris will vote to remain in India! Can we hold a plebiscite in Punjab, Assam, Nagaland, etc? Surely we can. But will we? We better not! 
===============

Avantika - बुधवार, 16 जानेवारी 2013 - 06:45 PM IST
Sudhir ji, If India was considered a democracy, why did Indian government commit fraud in the elections in 1986? Also, if we are a democracy, why kashmiris are NOT allowed to decide their own fate. Your point about Hari Singh is very weak because the kingdom of Gir had Hindu majority and a muslim king. When he decided to join Pakistan, Indian government attacked the area and took complete control. The issues of other states like Punjab are experienced because of Indian government's brutal policies. If the government acts with some sanity, we wouldn't have so many problems. Just see the comments here. Nobody even seems to understand what democracy means and how it was used in other nations. 
===============


Sudhir Kale - मंगळवार, 15 जानेवारी 2013 - 05:41 PM IST
तन्वी मॅडम: भाग-१- मी कांहीं युद्धकुशल सेनानी नाहीं पण सारासार विचार करून खालील मुद्दे इथे लिहिण्याचे धाडस करतो. पाकिस्तानशी संबंध कसे असावेत याचा विचार करायचा असेल तर खालील विषयांवर-ते कितीही अप्रिय असले तरी-चर्चा व्हायलाच हवी! (१) वेगाने पुढे जात असलेली शांततेची वाटचाल पाकिस्तानी लष्कराला कधीच पाहवणार नाहीं! कारण त्यांचे महत्व आणि “कमाई” कमी होईल याची त्यांना सार्थ भीती वाटते. सोवियेत महासंघाचे तुकडे झाल्यावर सर्वात आधी काय झाले? अमेरिकेने व पश्चिम युरोपीय देशांनी सैन्यबलात आणि संरक्षण खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केली. असे पाकिस्तानात झाले तर वैभवात आणि थाटात आयुष्य कंठणार्या् आजच्या सेनाधिकार्यां्ना ते कसे चालेल? ते नक्की त्यात मोडता घालतीलच. पण त्यावेळी आपण शांतीचे प्रयत्न सोडून दिल्यास त्यांचे उद्देश आपण सफल करून दिल्यासारखेच आहे. म्हणून अशा वेळी आपण मुलकी सरकारला समर्थन देत “तुमच्या खोडसाळ सेनाधिकार्याआच्या कटाकडे आम्ही लक्ष न देता शांतीच्या वाट चालत राहू” हा संदेश द्यायला हवा असे मला वाटते. (भाग-२ पहा) 
तन्वी मॅडम: भाग-२- (२) आज जर भारत पाकिस्तानात युद्ध पेटले तर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना ते “निर्णायक” अवस्थेपर्यंत लढता येणार नाहीं. म्हणून युद्ध हा पर्याय होऊच शकत नाहीं. (३) पूंचसारख्या खोडसाळ कुरबुरी झाल्या तर तिथल्या सेनाधिकार्या्ला पलटवार करण्याचे सर्वाधिकार आपल्या सरकारने दिले आणि त्याने केलेल्या कृत्याला पूर्ण समर्थन दिले तर असे विषय तिथल्या तिथेच संपतील. (४) २६/११ सारखी दुस्साहसे पाकिस्तानने केली तर मुलकी सरकारला बजावून पण विश्वासात घेऊन आपल्या वायुदलाने त्यांच्या आतंकवादी “मुजाहिदीन” निर्माण करणार्या “कारखान्यांना” उडवून लावण्यासारखा केंद्रित हल्ला चढविल्यास (focused air attack) पाकिस्तानी सेनाधिकार्यांवर वचक बसेल आणि असली दुस्साहसे ते करणार नाहींत. (समाप्त)
===============

tanvi - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 04:31 PM IST
शांतता कोणाला नको आसते.पण एका t v show मध्ये एक expert म्हणाले होते पाकिस्तान बरोबर deal कारण खूप मुश्किल आहे कारण तो बेजबाबदार देश आहे. आगदी बरोबर आहे.डोकेफिरूशी कसलीही बोलणी करण मूर्खपणाच आहे. 
===============

Sudhir Kale - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 09:49 AM IST
I would strongly recommend to every Indian to read a fabulous book "Being Indian" written by our current Ambassador to Bhutan, Mr Pavan Kumar Verma. It lists all the bad traits of us Indiana & tries to explain their roots. It includes why we are corrupt, why we commit treason by 'selling' our country to invaders, why democracy t has been so successful in India (it is the fastest way to ‘prosper’) & how we are still 'comfortable' within ourselves even after committing serious sins like treason. It holds a mirror in front of our eyes! I started to translate it with permission from Mr Verma, but have shelved that project till I retire! 
===============

vishwanata hulsure - सोमवार, 14 जानेवारी 2013 - 12:32 AM IST
निष्कर्ष वाचायला मिळतील. ज्यांना ३९ पानी अहवाल वाचायला वेळ नसेल त्यांनी त्या अहवालाच्या शेवटी असलेले "Conclusions" ची एक-दोन पाने तरी जरूर वाचावीत. काश्मिरी जनतेला अजीबात पाकिस्तानात जायचे नाहीं. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. तसे स्वातंत्र्य देऊ केल्यास भारत/पाकिस्तानातील किती राज्ये विभक्त व्हायला तयार होतील याचा हिशेब व्यक्तिनिहाय वेगळा येईल. पण तो सुखावह नक्कीच नाहींय्. मग जम्मू-काश्मीरचे कौतुक कशाला? पंजाबला वेगळं होऊ द्यायचं? पूर्वेकडील अनेक राज्यांना वेगळं होऊ द्यायचं? विचार करा जरा! 
===============

Sudhir Kale (4 parts, publish all together) - रविवार, 13 जानेवारी 2013 - 11:33 AM IST
विजय-जी, (भाग-१/४) तुम्ही उपस्थित केलेले प्रतिहल्ला न करण्याच्या आपल्या धोरणाचे आणि जवानांच्या विधवांच्या दु:खाचे प्रश्न अतीशय वाजवी आहेत. त्यातूनही आपले जवान आणि सेनापती खरोखर अतीशय शूर असताना अशी पाळी यावी याचे नक्कीच वैषम्य वाटते. जेंव्हां शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, थोरले माधवराव पेशवे, लाल बहादुर शास्त्री (१९६५), इंदिरा गांधी (१९७१), वाजपेयी (कारगिल) यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभले तेंव्हा आपला विजय झाल्याचे आपण पहातोच. पण आपले राजकीय नेतृत्व शूर आणि निर्णय घेण्याबाबत तत्पर आणि निश्चयी आहे काय या प्रश्नाचे उत्तर साधारणपणे नकारार्थीच मिळेल. कारण ते paralysis by analysis या रोगामुळे गारद होते. नुकतेच आपले दोन जवान नियंत्रण रेषेवर निर्दयपणे मारले गेले, त्यांच्या पार्थिवाची विटंबना झाली ही कुणालाही संताप आणणारीच घटना आहे. पण ज्या सरकारने १६६ निष्पापांचा बळी घेणार्या २६/११ च्या घटनेनंतर-सारे जग आपल्या पाठीशी उभे असतानासुद्धा-निषेधापलीकडे कांहींच केले नाहीं त्या सरकारकडून आपण कसली अपेक्षा करायची? पण आपण आताच्या सरकारलाच कशाला बोल लावायचा? (भाग २ पहा) 
विजय-जी: भाग-२/४ "Mild-and-meek Hindu" अशी आपली प्रतिमा सार्याय जगात आधीपासूनच आहे! अगदी पृथ्वीराज चौहान यांच्यापासून! आपण खूप शूर आहोत पण आपण आणि आपले नेते निर्दय, खुनशी कधीच होऊ शकले नाहींत. आपण साधारणपणे क्षमाशील आहोत, एक वेळ भाऊबंदकीत सूड घेऊ पण परकीय आक्रमकांविरुद्ध सूड घेतल्याची उदाहरणे फारशी नाहींत. जर आपण तसे असतो तर पूर्वी राजपूत योद्धे जसे आपल्या बायकांचा जोहार करून केसरिया पुकारून शत्रूवर तुटून पडत तसे आपणही आक्रमक झालो असतो. पण आपण असे शत्रूवर कधी तरी तुटून पडलो होतो काय? लाहोर आक्रमण व बांगलादेशमुक्तीच्या मोहिमा सोडल्यास मला तरी अशी घटना आठवत नाहीं. असे असण्यात तसे कांहीं चूक आहे असे नाहीं. पण अशा क्षमाशील राष्ट्राने स्वत:ला बदलले तरी पाहिजे किंवा "हम तो ऐसे हैं भैय्या" म्हणत स्वत:च्या क्षमाशील कृत्यांची इतर राष्ट्रांच्या निर्घृण कृत्यांशी तूलना करून वाईट तरी वाटून घेऊ नये. आपण जर आपापसात सतत यादवी युद्धात गर्क असलेल्या अफगाणी सेनेसारखे लढाऊ, (माथेफिरू म्हणता येण्याएवढे) शूर आणि कडवे असतो तर आपल्या देशात बहामनी, मोंगल आणि शेवटी इंग्लिश सत्ता आलीच नसती! (भाग ३ पहा)
विजय-जी: (भा-३/४) सार्याॉ जगावर सत्ता गाजविणार्यात ब्रिटिश सेनेला अफगाणिस्तानवर युनियन जॅक फडकावण्यात अपयश आले हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच त्यांनी रशियन सेनेच्या आणि त्या पाठोपाठ अमेरिकन आणि नाटो सेनेच्या पदरी अपयश टाकले हेही आपण पहातोच. आज थायलंड, इराण आणि अफगाणिस्तान ही तीन आशियाई राष्ट्रे कधीही पारतंत्र्याच्या जोखडाखाली नव्हती त्या यादीत भारताचेही नांव दिसले असते. या उलट आपल्याला तर ब्रिटिश साम्राज्याच्या राजमुकुटाच्या कोंदणातले रत्न म्हणून हिणवले जाते! व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचा जो पराजय झाला त्याबद्दल मी कुठेतरी वाचले आहे कीं अमेरिका या युद्धात हरली कारण अमेरिकन सरकारने या युद्धाचे नियंत्रण सायगॉनकडे न देता वॉशिंग्टनकडे ठेवले व युद्धभूमीवरील वस्तुस्थितीबद्दल फारशी माहिती नसलेल्या सरसेनापतींनी आणि राजकीय नेत्यांनी paralysis by analysis ला बळी पडून पराभव करून घेतला. आपले काश्मीर नियंत्रणरेषेवरील युद्ध कुठून लढले जात आहे? पूंचमधून कीं दिल्लीवरून? शास्त्रींनी आणि इंदिराजींनी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सेनापतीना दिले तेंव्हा ज. चौधरी आणि फी.मा. मानेकशॉ यांनी विजय मिळवलाच. (भा ४ पहा) 
विजय-जी: (शेवटचा भाग) पण या विजायांतून कांहींही पदरी पडून न घेता ते विजय आपल्या दुबळ्या राजकीय नेतृत्वाने वायाच घालविले तेही. त्यावेळी सिमला करारात आपण जिद्दीने उभे राहिलो असतो अतर काश्मीर प्रश्न तेंव्हाच सुटला असता. (काश्मीर प्रश्न सुटल्यास आपले महत्व शून्य होईल म्हणून मुलकी सरकारची तयारी असूनही) पाक लष्कर हा प्रश्न सोडवू देत नाहीं.) असाच आपला निर्णय घेण्यातील कमकुवतपणा आपल्याला पाकिस्तानी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या विमान चांचेगिरीतही दिसून आला. paralysis by analysis मुळे अमृतसरला योग्य निर्णय ताबडतोब न घेतल्यामुळेच ते विमान कंदाहारला जाऊ शकले आणि आपल्याच पोलिसंनी/जवानांनी पकडलेले अतिरेकी एकाद्या नववधूला जशी पाठराखीण पाठवायची आपल्याकडे पद्धत होती तश्शीच शर्मनाक ’पाठराखण’ अतिरेक्यांना कंदाहारपर्यंत पोचवून आणताना जसवंतसिंगना करावी लागली. जोपर्यंत आपण ऐतिहासिक घटनांतून कांहींच शिकत नाहीं तोवर हे असेच चालायचे. राष्ट्रपातळीवर गरज पडेल तेंव्हां क्रूर, निर्दय आणि कधीही क्षमा न करणारे धोरण राबवायला आपण शिकलेच पाहिजे जेणे करून आपल्या शत्रूंना आपल्याबद्दल (कींव न वाटता) भीती आणि दरारा वाटेल.
===============
Vijay - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 06:35 PM IST
काश्मीर हे पाकिनी केलेला बागुल बुवा आहे, ज्या याकुब खान चा लेख तुम्ही अनुवादित केला आहे त्याचाच बंधूनी आपल्या सानिकांची शिरे कापली. जो पर्यंत पाकिस्तान संपत नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न संपणार नाही. ह्या आधीचा तुमच्या काही पोस्टिंग मध्ये तुम्ही पाकिस्तानशी dialogue सुरु करावा असे सुचित केले आहे. मी तुमचा मत्सर कशाला करू तुम्ही काही M J Akbar, Inder Malhotra, Jag Narayan वगैरे नाही आहात. 
===============

Sudhir Kale - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 02:45 PM IST
मंगेश-जी, श्रीरंग-जी आणि तुम्हासारख्या काश्मीरला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या वाचकांच्या प्रतिसादांना मी खूप महत्व देतो. मी स्वत: मात्र काश्मीरला अद्याप भेट दिलेली नाहीं. “आम्हाला स्वतंत्र काश्मीरच हवे” असे काश्मिरींचे मत आहे असे चॅदम अहवालही सांगतो. (खरंच या लेखाच्या किती वाचकांनी हा अहवाल वाचला आहे?) असेच स्वतंत्र खलिस्तान आपल्या कांहीं शीख बांधवांनाही हवे होते, नागा नागरिकांनाही ’नागालॅन्ड’चे वेगळे राज्य हवे होते. पण आपण कुणालाच असे वेगळे राज्य दिले नाहीं. मग काश्मीरचे लाड कशाला? प्रमोद-जी, नुसते शिक्षण नव्हे तर ’स्त्रीशिक्षणा’तच यशाची गुरुकिल्ली आहे. जितक्या पाकिस्तानी स्त्रिया शिकतील तितकी त्यांची पुढील पिढी सुधारेल. “जिच्या हाती पाळण्याची दोरी” हेच सांगते! विजय-जी, माझे लेख कांहींना आवडतात. त्यामुळे असेल पण तुमचे बरेच प्रतिसाद मला मत्सरापोटी दिलेले वाटतात. जळू नका, स्वत: लिहायला सुरुवात करा. मला “काळे मामा” म्हणणे हाही त्यातलाच प्रकार. मी कधीही माझ्या वाचकांना असे संबोधत नाहीं. निनादने मला “काका” म्हटले कारण तो मला माझ्या इतर संस्थळावरील लेखनामुळे ओळखतो. पण तुम्ही नाहीं ओळखत मला!
===============

K B Kale - शनिवार, 12 जानेवारी 2013 - 10:07 AM IST
Viyayanna, This article is about Kashmir so stay with it. 
===============

Vijay - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 05:21 PM IST
काळे मामा; ज्या दोन जवानांचा पाकिनी नुकताच खून केला त्यांचा विधवांना विचारा के पाकिंशी कुठल्या स्तरावर चर्चा करावी? पाकीन वर विश्वास ठेवावा का ठेवू नये? क्रिकेट खेळावे का खेळू नये? त्या अभागी विधवांचा निर्णय मला तरी मान्य असेल. 
===============

pramod dalal - शुक्रवार, 11 जानेवारी 2013 - 09:34 AM IST
फोडा -तोडा चे राजकारण ची फळे आज पाकिस्तान आणि हिंदुस्तान भोगत आहे ,शिक्षण हाच दुवा आहे ,शिक्षित समाज दोन्ही देशांना एका पातळीवर आणेल तो हिंदुस्थान साठी सुदिन असेल. 
===============

Mangesh Bendkhale ,Kolhapur - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 02:26 PM IST
सुधीर सर मी राजा राणी travels मध्ये ८-९ वर्षे senior tour manager म्हणून काश्मीर खोऱ्या मध्ये वर्षातील ४ -५ महिने काम करण्यास मिळाले त्या वेळी वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांशी संबंध आले मैत्री झाली पण मला एक हि कश्मीरी व्यक्ती पाकीस्थानात जाण्यास उचूक असणारी दिसली नाही आगदी यावर मी त्यांच्याशी अनेकदा बोललो सुद्धा. पण बहुसंख्या आगदी ७०-७५ % लोक मात्र काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे आसे माझ्या जवळ स्पष्ट शब्दात बोलले 
===============

Sudhir Kale - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 12:19 PM IST
It is India's because Hari Singh opted for it & that was the understanding at the time of partition about all Princely States. Anyway, what is the alternative you are suggesting? Creation of DSI (Divided States of India)? If it is clear that Kashmiris don't want to join Pakistan, that's that! By the way, did you read the Chatham House report? Hardly any districts on both sides of the border opt for joining Pakistan. Anyway I am going to be overseas for a week so may not be able to access e-Sakal. 
===============

Avantika - शनिवार, 5 जानेवारी 2013 - 08:05 AM IST
Sudhir ji, I think you are again missing the point. Kashmiris can select anything based on THEIR choices. I never commented on that. The main issue is regarding the article. The author is NOt stating that Kashmir is NOT a Real issue. He is only showing the practical issues Pakistan might face and therefore, he is discouraged. What do you think? Do you think Kashmir belongs to India? If the answer is Yes, on what basis? 
===============

Sudhir Kale (+5) - शुक्रवार, 4 जानेवारी 2013 - 07:28 AM IST
अवंतिका मॅडम, (भाग-१) कधी-कधी मला वाटते कीं आपण स्वत: उगीचच अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबून जातो. काश्मिरींना मुळीच पाकिस्तानात जायचे नाहींय. http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf हा दुवा उघडून आपण जर तिथला मजकूर वाचलात तर तुम्हाला नक्कीच थोडेसे बरे वाटेल. (१) इंग्लंडमधील "चॅदम हाऊस" या संस्थेने संपूर्ण काश्मिरी जनतेचे (पाकव्याप्त काश्मीर व "जम्मू आणि काश्मीर") मत चाचपण्याचा प्रकल्प हाती घेतला होता त्याचे निष्कर्ष वाचायला मिळतील. ज्यांना ३९ पानी अहवाल वाचायला वेळ नसेल त्यांनी त्या अहवालाच्या शेवटी असलेले "Conclusions" ची एक-दोन पाने तरी जरूर वाचावीत. काश्मिरी जनतेला अजीबात पाकिस्तानात जायचे नाहीं. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. तसे स्वातंत्र्य देऊ केल्यास भारत/पाकिस्तानातील किती राज्ये विभक्त व्हायला तयार होतील याचा हिशेब व्यक्तिनिहाय वेगळा येईल. पण तो सुखावह नक्कीच नाहींय्. मग जम्मू-काश्मीरचे कौतुक कशाला? पंजाबला वेगळं होऊ द्यायचं? पूर्वेकडील अनेक राज्यांना वेगळं होऊ द्यायचं? विचार करा जरा! 
===============

अवंतिका मॅडम, (भाग-२) (२) http://www.2point6billion.com/news/2010/05/28/chatham-house-pakistan-option-unpopular-with-kashmiris-5787.html#comments या दुव्यावर चॅदम हाऊस अहवालावर २०१० साली झालेली चर्चा वाचायला मिळेल. त्या चर्चेत मीसुद्धा हिरीरीने भाग घेतला होता व माझे प्रतिसाद तिथे वाचायला मिळतील. हे प्रतिसाद (भाग्-१ व २) मी आतापर्यंत तीन वेळा लिहिले पण अद्याप मॉडरेटर्सचे तिकडे लक्ष गेलेले नसावे. बघू यावेळी नशीब साथ देते का! 
===============

Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 08:13 PM IST
Mr Vijay, thanks. For a moment I wondered whether your keyboard is programmed to throw my name automatically when you type 'K' as a part of 'predictive' text. I had asked this question to Mr Sachin so that he tells me which exact incident or incidents he is referring to. I am still waiting for his reply.
===============

Avantika - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 06:26 PM IST
Just because the article is stating something that is good for India, it is published without any real analysis of the root cause of the issue. Basically, Indians are continuing brutal occupation of kashmir, and Pakistan, because of its internal struggles and monumental socio-religious issues, is unable to forward the matter at this stage. Really sad to see that even Indians are completely unaware about 1986 elections in Kashmir and how Indian government rigged it. Indian army is creating hell for the kashmiris and is involved in rapes and murders. Indian government is creating this false impression that Kashmiris want Indian control. That is complete nonsense. 
===============

Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 06:09 PM IST
Mr Vijay, Who is this "Kale" in the pair off "Hari Singh and Kale" you have referred to? I don't remember having carried out any atrocities in J&K! Or is it a spelling mistake? 
===============

Vijay - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 05:35 PM IST
In my earlier post I meant "Hari Singh and Kashmir". My apologies! 
===============

Vijay - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 05:03 PM IST
Mr. Kale, If you "Google" Hari Singh and Kale, atrocoties commted by both Pakistanis and Indian Armys etc. all the points raised by Mr. Sachin and much more wil pop up. 
===============

Sudhir Kale - गुरुवार, 3 जानेवारी 2013 - 03:43 AM IST
Dear Mr Sachin, thanks A lot. May I request you to provide the relevant links regarding point no. 2. Unfortunately my own two posts about Chatham House study are not getting published though I posted already twice. I will try again later.
===============

Sachin - बुधवार, 2 जानेवारी 2013 - 09:58 PM IST
The author is missing some of the key points about Kashmir:(Just like most of the Indian Journalists) 1. Pakistani guy is only claiming that currently Pakistan is unable to pursue that ambition, he is not saying the original issue itself is invalid. (They are currently helpless because of other issues created by Americans, Russians, and Islamists like Taliban and Northern Alliance.) 2. Kashmir was never part of India. It was a kingdom.Pakistani tribes tried attacking it to take control when they realized that India might control it. Hari Sing, because of the brutal attack agreed to join India. It was decided that India will use elections for the kashmiris to decide if they want to stay with India, which they never did. In fact, in 1986, Indian government rigged the elections and created hell for kashmiris with brutal army control. (Read how Army killed so many Kashmiris on the net. They have found mass graves with more than 10,000 bodies) 
===============

hanumant bansode mumbai - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 10:15 PM IST
काळे साहेब, कोणत्याही विषयाचे तुम्ही अतिशय सुंदर विवेचन करता! छान लेख. धन्यवाद सर या लेखाबद्दल. 
===============

Sudhir Kale - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 08:10 PM IST
Mr Vijay, slow down, will you? Slow down! Where have I ever said that I am trying to change the mindset of anybody? It was YOU who used the word "मानसिकता"! I don't have the leadership qualities or charisma to change the mindset of anybody-in India or in Indonesia. I read and if I find something good, something different, I introduce it to the readers. You are attaching to me too much importance that I don't deserve. I have some opinions which I present. Some agree with me, some disagree. But you are trying to attempt a "leg glance" or a "late cut" to "deflect" a non-existent ball! Have some mercy, please! 
===============

Vijay - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 07:28 PM IST
Mr. Kale; I have following two comments on your post of 01/01/2013. 1) Trying to change mindset will be seen as interfering in internal affairs of another country. Also by the same logic Pakistanis will have the right to advocate Jihadi thinking in our youth and we will have no moral grounds to object. 2) Also have you tried to change mindset of young Muslim’s in Bali, the country where you live? Have you made any efforts to change the mindset of Aburahman Rohim son of Abu Bakar Bashir who is serving a 15-year sentence for helping set up a paramilitary training camp in Aceh in 2010. But inside he is still surrounded by acolytes and young prisoners, and boasts in a written interview with The Sunday Age that he is ”busy spreading the word of Allah to the people. Aburahman Rohim is a senior teacher at the Ngruki School his father founded. He defends the teaching of jihad, saying: ”More than 60 verses of the teaching of jihad are in the Koran. Should we delete those verses?” 
===============

Sudhir Kale (Author) - मंगळवार, 1 जानेवारी 2013 - 03:09 PM IST
विजय-जी, दोन महत्वाचे मुद्दे! मी बर्याेपैकी वरच्या हुद्द्यावर असलेल्या एका जकार्तास्थित पाकिस्तानी गृहस्थाशी बोलत होतो. त्यावेळी मी नुकतेच नवाज शरीफ यांच्या "आपण भारताला आपला सगळ्यात मोठा शत्रू समजणे थांबविले पाहिजे" अशा अर्थाच्या निवेदनाची तारीफ करणारे एक पत्र "जकार्ता पोस्ट"मध्ये लिहिले होते. त्यावर उद्देशून हे गृहस्थ म्हणाले कीं आपण एकाद्या सदनिकेत किंवा घरात रहात असलो आणि शेजार्या शी खूप कडाक्याचे भांडण झाले आणि लक्षात आले कीं आपल्यातून आता विस्तवसुद्धा जाणार नाहीं तेंव्हां आपण घर बदलू शकतो, पण अशी सोय दोन देशांना नसते. शेजारी राष्ट्रे कायमची आपली शेजारीच रहातात. त्यामुळे तंटे सोडवून मैत्री करणे आवश्यकच असते. हे आता दोन्ही बाजूंना पटले आहे असे त्याचेही मत!. दुसरी बाब हीं कीं आपल्या देशाचे संरक्षण करणे हा जर आपला business असेल तर सरहद्दीपलीकडे काय चालले आहे हे पहाणे हाही आपला business आपोआपच होतो. पाकिस्तानला वाचविणे आपल्या हिताचे असेल तर आपण ते केले पाहिजे. मी फक्त माझ्या वाचनात आलेले मुद्दे इथे आपल्यासारख्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी इथे मांडतो. सर्व वाचकांना २०१३च्या शुभेच्छा. 
===============

Shrirang - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 11:56 PM IST
धन्यवाद सर या लेखाबद्दल. मी काही महिन्यांपूर्वीच श्रीनगर व भोवताल फिरून आलो. आजकाल अतिरेकी कारवायांमध्ये जोरदार घसरण झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होते व स्थानिकांना रोजगार मिळतोय. श्रीनगर व आजू बाजूला जेवढी शुद्ध शाकाहारी भोजनालये दिसली तेवढी तर महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात दिसणार नाहीत. जागोजाग शाळा व महाविद्यालये व्यवस्थित चालू असलेली दिसली. गेल्या दोन दशकात विविध केंद्र सरकारांनी राबवलेले सबुरीचे धोरण आता फळे देवू लागले आहे. अन यामुळे पाकिस्तानचा कांगावा काश्मीरमध्ये चालणे कमी होत आहे. सदर लेखात जे सांगितले आहे की सीमेपलीकडील नव्या पिढीला या मुद्द्यावर विशेष स्वारस्य उरलेले नाही ते आपल्यासाठीही तेवढेच हिताचे आहे जेवढे त्यांच्या.... 
===============

Vijay - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 07:37 PM IST
Mr. Kale we need to mind our own business and protect our country. Why is it our job to try to change the mindset of young pakistanis, again which is impossible? These people cannot think! Look at the Unites States, they tried to change Middle East and after two major wars, Iraq and Afghanistan, 3 trillion dollaes, 10,000 dead Americans, 300,000 injured Americans they have nothing to show. Again Pakistan is not ours to save, it is the most untrustworthy country on the face of the earth. 
===============

Sudhir Kale - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 04:05 PM IST
Mr Shinkar, I agree. Education of masses, particularly mass education of women, will make a quantum change in thinking of young Pakistanis. As more & more Malala Yusufzais stand up & get good education in science, technology, economics, etc, a new 'army' of educated mothers will create a new generation of Pakistanis that thinks totally differently. This brave little girl, I think, represents new Pakistani mentality 
=============== 

mandar - सोमवार, 31 डिसेंबर 2012 - 03:47 PM IST
आत्ता पाकिस्तानची अंतर्गत स्थितीच खराब आहे म्हणून सर्व शांततेची कबुतरे उडवत आहेत. सिअचीन मधून दोघेही मागे जाऊ, व्यापार सुरु करू, क्रिकेट खेळू, विसा धोरण शिथिल करू, वगैरे. पण भारता बद्दल द्वेष गेला नाहीये. ते एकही पाऊल मागे घ्यायला तयार नाहीत. भारताला मोस्ट फेवोरीते चा दर्जा द्यायला, २६/११ च्या खटल्यात, अतिरेकी हस्तांतर करण्यास, कैदी सोडायला, क्रीक हद्द मान्य करायला, हिंदुनवरचे अत्याचार बंद करण्यासाठी टाळाटाळ. आजही सर्व राजकीय पक्ष द्वेशाचीच भाषा करतात. लोकांचे ताजे ओपिनिओन तसेच आहे.
===============

Vijay - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:49 PM IST
पाकिस्तानी अथवा कुठल्याही मुस्लिम देशाची मानसिकता बदलणे शक्य नाही. Egypt , Libya मध्ये काय झाले? ज्या American राजदूताने लिबियाला मदत Kelli त्याला Thani ठार मारला 
===============

Sachin Thawari - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 01:42 PM IST
Yes, it is true that young generation want to fly everywhere.So why not Pakistani youth.They too want free from all issues.
===============

Prathamesh, Nagpur - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 12:38 PM IST
पाकिस्तानने आत्मपरीक्षण करून भारताशी असलेले शत्रुत्व सोडून द्यावे इथपर्यंत ठीक आहे, पण पाकिस्तानातल्या इतक्या गोंधळातही याकूब भारतातल्या मुसलमानांची चिंता करताहेत आणि आपल्या देशबांधवांना करायला सांगत आहेत. भारतीय हिंदूंना मात्र त्यांच्या पाकिस्तानातल्या बांधवांवर कसले अत्याचार होताहेत ह्याची जाणीव असूनसुद्धा तिकडे ते काणाडोळा करत आहेत. ही अतिशोकाची गोष्ट आहे. 
===============

Dr Sandeep Gunjal, Navi Mumbai - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 08:40 AM IST
काळे साहेब, कोणत्याही विषयाचे तुम्ही अतिशय सुंदर विवेचन करता! 
===============

Ajay Pavashe - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 07:07 AM IST
छान लेख. पाकिस्तान ने खरेच डोळे उघडण्याची वेळ आहे. किती दिवस ढोंग करणार? आजची तरुण पिढी डोळस आहे आणि सत्यासत्याचा विचार करणारी आहे. अपेक्षा आहे कि काश्मीर स्थिती बदलेल, सकारात्मकतेने ....! 
===============

shrikant - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:09 AM IST
It's amazing yet understandable that people of Pakistan are now foucssing on their 'own development and continuation of freedom' instead of talking and interfering in Kashmir. 
===============

Amit Shinkar - रविवार, 30 डिसेंबर 2012 - 06:03 AM IST
Nice article Mr. Sudhir. The next generation is now very well aware about the outcomes of the "Hate Politics" initiated by the Britishers and followed by the Congress party in Hindustan... same thing applies to the youth of Pakistan as well... Wait for few more years,,, as the more and more population will get educated, the so called politicians can't make Us fool anymore... and that day would be the Foundation day of our India, dreamed by Us!!! Jai Hind!!!

Saturday 15 December 2012

निमित्त अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीचे...



निमित्त अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीचे...


स्वतंत्र लेख, लेखक: सुधीर काळे, जकार्ता 
(sbkay@hotmail.com)

अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा आणि त्यांना आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने निवडलेले मिट रॉम्नी, यांच्या दरम्यान अमेरिकेतील अध्यक्षपदाची अत्यंत चुरशीची निवडणूक नुकतीच पार पडली.
एकंदर सर्वसामान्य मतदानापैकी ओबामांना ५१ टक्के तर रॉम्नी यांना ४८ टक्के मते पडली असली तरी राज्यनिहाय लोकप्रतिनिधींच्या मतदानातील ५३८ मतांच्या मोजणीत मात्र (ज्याला Electoral College म्हणतात) ओबामांना (फ्लॉरिडा राज्याची उशीरा जाहीर झालेली मते धरून) ३३२ तर रॉम्नींना २०६ मते मिळाली! 

निवड होण्यासाठी २७० राज्यनिहाय लोकप्रतिनिधींची मते लागतात. २००० सालच्या निवडणुकीत अल गोर यांना सर्वसामान्य मतदानात बुश यांच्यापेक्षा जास्त मते पडली असली तरी राज्यनिहाय लोकप्रतिनिधींच्या मतदानात त्याना २६६ राज्यनिहाय लोकप्रतिनिधींची मते मिळाली तर बुश यांनी २७१ मते मिळवून कशीबशी बाजीमारली होती. या निवडणुकीची आठवण सर्व प्रसारमाध्यमे वारंवार करून देत होती! इतकेच काय की दोघांना २६९ मते पडल्यास प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाकडे तर सिनेट डेमोक्रॅटिक पक्षाकडे असल्यामुळे शेवटी अध्यक्ष रॉम्नी तर उपअध्यक्ष बायडन अशी मोटबांधली जाईल की काय अशी (कु)शंकाही ही प्रसारमाध्यमे जनतेपुढे ठेवत होती. पण असे काहीही न होता शेवटी ओबामा-बायडन ही २००८ सालापासून सत्तेवर असलेली जोडीच सत्तेवर टिकून राहिली व निवडणुकीचा व्यवस्थित निकाल लागल्याने सार्‍या जनतेने निश्वास सोडला.

या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून प्रचंड खर्च केला गेला. एका सूत्रानुसार फक्त अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामांनी ९३ कोटी डॉलर खर्च केले तर रॉम्नींनी १०० कोटी! त्यातले बहुतेक डॉलर्स प्रचारार्थ-मुख्यत्वेकरून चित्रवाणीवरील जाहिरातींवर-खर्च केले गेले असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आपल्याकडे किंवा आपल्यासारख्या अविकसित आणि तूलनेने गरीब राष्ट्रांत जसा बराच पैसा-त्यातला बराचसा पैसा काळाअसतो-गरीब मतदारांना प्रत्येक झोपडपट्टीच्या मुखियांद्वारा रोख पैसे देऊन मते विकत घेण्यासाठी खर्च होतो तसा प्रकार अमेरिकेत होताना दिसत नाही. (धाकट्या) बुशसाहेबांच्याकर्तबगारीमुळेअमेरिकेसारख्या श्रीमंत देशातसुद्धा आज काही गरीब कुटुंबे अस्तित्वात आली असली तरी त्यांची संख्या त्यामानाने लहानच आहे आणि त्यांच्या दारिद्र्याला हलाखीचे दारिद्र्य (abject poverty)’ म्हणता येण्यासारखे नाही. शिवाय अशिक्षितपणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे अमेरिकन मतदारांना आपले मत अमूल्यअसल्याची जाणीवही आहे व ते असे पैशासाठी मते विकणार्‍यातले नाहीत. शिवाय अमेरिकेत एकंदरच नगदव्यवहार कमीच आहे!
असे असले तरी अमेरिकन मतदार कुणाला मते देतील याबद्दल आडाखा बांधणे महा कठीण. माणूस एकादी चूक एकदा करू शकतो, पण इथे तीच चूक दोनदा कां केली गेली त्यामागची कारणे समजत नाहीत. (धाकट्या) बुशसाहेबांना २००० मध्ये निवडून देण्याची चूक क्षम्य मानता येईल पण त्यांना २००४ मध्ये दुसर्‍यांदा निवडून देण्याची चूक मात्र क्षम्य मानता येणार नाही. त्यामुळे हा अमेरिकन मतदार एकाद्या आवेगात, एकाद्या झटक्यात रॉम्नींना निवडून तर नाही ना देणार ही शंकेची पाल मनात चुकचुकतच होती. पण या वेळी मात्र अमेरिकन मतदारांनी योग्य मतदान करून एका सुशिक्षित आणि तारतम्याने वागणार्‍या उमेदवाराला अध्यक्षपदावर दुसर्‍या पदावधीसाठी (term) कायम ठेवले.
(धाकट्या) बुशसाहेबांनी आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत अमेरिकेची-खास करून अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीची-इतकी वाट लावलीआहे की तिला परत सुस्थितीत आणण्यासाठी २०-२५ वर्षे लागतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. आज प्रत्यक्ष देव जरी अमेरिकेत अवतरला तरी ही पार रसातळाला गेलेली आर्थिक परिस्थिती तोसुद्धा ४ वर्षात दुरुस्त करू शकणार नाही. म्हणून 'ओबामांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी आणि अगदी आटोक्याबाहेर जाऊ पहाणारे राष्ट्रीय कर्ज आवाक्यात आणण्यासाठी पुरेशा कारवाया केल्या नाहीत' ही रॉम्नींची टीका अगदीच अस्थानी वाटते.
माझ्या मतानुसार ओबामा यांचे आरोग्यसेवेबाबतचे विधेयक खरेच चांगले आहे. कारण त्यात आज पैशाआभावी विम्याच्या संरक्षणाबाहेर असलेल्या गरीबांसाठीसुद्धा विम्याची सोय होती. आरोग्या चांगले असताना विमा उतरविलेला असूनही मोठा आजार झाल्याचे कळल्यावर विमा नाकारणार्‍या स्वार्थी कंपन्यांना तसे करू न देण्याची कायदेशीर तरतूद होती. विमा कंपन्यांनी दादागिरी करू नये म्हणून अशी विम्याची सोय सरकारतर्फे विकत घेण्याचीही पर्यायी सोय ओबामांच्या विधेयकात होती. याला विरोध कां होत होता हे मला कधी कळलेच नाही. म्हणूनच रिपब्लिकन पक्ष या विधेयकाची ओबामा आरोग्यसेवा-Obamacare-या नावाने कुचेष्टा करतो ती अजिबात समर्थनीय नाही असेच मला वाटते. पण २०१० च्या निवडणुकीत काही तरी 'भलतेच' घडले आणि प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात गेली आणि सिनेटमधील त्यांचे बहुमतही घटले. असे झाले नसते तर ओबामांवे कर्तृत्व नेत्रदीपक झाले असते. माझी तर खात्री आहे की २०१४ च्या निवडणुकीत प्रतिनिधीसभा पुन्हा डेमोक्रॅट्सच्या ताब्यात न आल्यास आणि सिनेटमध्ये ६० पेक्षा जास्त प्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडून न आल्यास ओबामांच्या कर्तृत्वाचा उंच कमान कुणाला दिसणारच नाही.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रॉम्नींनी ठरविलेल्या योजनेची कोनशिला होती खूप श्रीमंत लोकांवरील कर कमी करायचे. त्यामागचे तत्व होते की असे केल्यास या श्रीमंत लोकांना नव्या धंद्यांत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यातून नव्या नोकर्‍य़ा निर्माण होतील. पण जगातील सर्वात श्रीमंत माणसात गणल्या जाणार्‍या वॉरन बुफे यांनी उद्विग्नपणे काढलेले उद्गार कुणाच्याच कसे लक्षात राहिले नाहीत? ते म्हणाले होते की त्यांच्या मिळकतीवर ते ज्या प्रमाणात कर भरतात ते प्रमाण त्यांच्या नोकरवर्गालासुद्धा ज्या प्रमाणात कर भरावा लागतो त्यापेक्षा कमी आहे आणि यामुळे त्यांना खूपच लाजिरवाणे वाटते. म्हणून त्यांनी सरकारला श्रीमंतांचे कोडकौतुक बंद करून त्यांच्याकडून जास्त कर वसूल करण्याचे आवाहन केले आहे.
ओबामांनी त्यांच्या २००८ च्या विजयाला उपयोगी पडलेले सर्व पायाभूत घटक आपल्या बाजूला राखण्यात यश मिळविले हेच त्यांच्या विजयामागचे मुख्य कारण आहे. काही ठिकाणी त्यांची पिछेहाट जरूर झाली पण त्यांना अल्पसंख्यांकांचे, तरुण, स्त्री, गरीब आणि सुशिक्षित मतदारांचे भरीव समर्थन लाभले.

'तुम्ही आम्हाला निवडून दिलेत ते आम्हा दोघांची नोकरीआणखी चार वर्षे चालू रहावी म्हणून नव्हे तर आम्ही तुम्हां सर्वांच्या नोकर्‍या सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करावे म्हणून. आणि अगदी नजीकच्या भविष्य काळात मी दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून आपल्या अर्थव्यवस्थेवर आलेले संकट निवारण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे' हे ओबामांचे त्यांच्या विजयानंतरच्या भाषणातील वाक्य माझ्या मनाला खूप स्पर्शून गेले.
तर 'तुम्हा सर्व मतदारांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आर्थिक धोरणात योग्य ते दिशाबदल करणारे नेतृत्व आपल्या देशाला देण्याची माझी खूप इच्छा होती पण देशाने दुसरा नेता निवडला. आता ओबामांच्या आणि आपल्या देशाच्या यशासाठी माझी पत्नी अ‍ॅन आणि मी तुम्हा सर्वांसह देवाकडे प्रार्थना करतो' या रॉम्नींच्या उद्गारांनी त्यांच्या अनेक समर्थकांचे डोळे नक्कीच ओलावले असतील.

ही निवडणूक इतकी अटीतटीची आणि चुरशीची झाली की बर्‍याच लोकांना वाटू लागले की अमेरिका आज जितकी दुभंगलेली दिसते तितकी या पूर्वी कधीच दिसली नव्हती. माझ्या भूतपूर्व अमेरिकन बॉसला मी अलीकडे गमतीने म्हणालो होतो तुझ्या देशाचे 'अमेरिकन संयुक्त राज्ये (United States of America)' हे नाव बदलून 'अमेरिकन विभक्त राज्ये (Divided States of America)' असे ठेवायला हवे! तोही हसायचा. चित्रवाणीवरील चर्चासत्रे पाहिल्यानंतर मला असे वाटू लागले होते की ही निवडणूक मोहीम खूप कडवट आणि विखारी होत चालली आहे. पण या निवडणूक-युद्धांपेक्षा जास्त कडवट आणि विखारी मोहिमा आधी झालेल्या आहेत. पण मतदार जरी खूप बरोबरीने आणि खोलवर विभागले गेलेले दिसत असले आणि वरवर पहाता अमेरिका एक समाज म्हणून विभागलेली आहे असे वाटत असले तरी एक 'देश' या नात्याने ती विभागलली आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
१८२० सालानंतरच्या अध्यक्षपदाच्या बहुतेक निवडणुका नेहमीच चुरशीच्या झालेल्या आहेत[१]. १९६४ च्या निवडणुकीत लिंडन जॉन्सन यांना मिळालेली ६१.५ टक्के मते टक्केवारीच्या दृष्टीने इतर कुठल्याही अध्यक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्याखेरीज फक्त वॉरन हार्डिंग (१९२०), फ्रॅन्कलिन रूझवेल्ट (१९३६) आणि रिचर्ड निक्सन (१९७२) या तीन अध्यक्षासुद्धा ६० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
नऊ निवडणुकांत विजेत्या उमेदवाराला ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून निवडणूक जिंकणारे १८ उमेदवार होते. त्या अठरा निवडणुकांत अब्राहम लिंकन यांची पहिली निवडणूक, केनेडींची एक, निक्सन यांची पहिली तर क्लिंटन यांच्या दोन्ही निवडणुका खास उल्लेखनीय आहेत. उरलेल्या १६ निवडणुकांत विजेत्याला ५० ते ५५ टक्क्यांच्या मध्ये मते मिळाली. त्यातल्या कित्येक निवडणुकांत त्यांना जेमतेम ५० टक्के मते मिळाली. याचा अर्थ झाला, की जवळ-जवळ निम्म्या मतदारांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केले. म्हणजेच निवडणुकांच्या बाबतीत अमेरिका नेहमीच खोलवर विभागलेला देश आहे इतकेच नव्हे तर कित्येक वेळा अध्यक्ष अल्पमताने निवडून आलेले आहेत. गमतीची गोष्ट अशी की ६० टक्क्यांहून जास्त मते मिळविलेल्या चार अध्यक्षांपैकी फक्त फ्रॅन्कलिन रूझवेल्ट यांचीच आठवण अनुकूल राहिली आहे.
थोडक्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची २०० वर्षे या देशात ५७ निवडणुका झाल्या त्यातल्या पहिल्या ९ निवडणुका आमने-सामने पद्धतीने झालेल्या नाहीत [१]. त्यानंतरच्या ४८ निवडणुकांमध्ये मात्र आतासारख्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत मतदारांत सतत दुही पडलेली दिसते. त्यात तीन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. क्वचितच ६०-४० अशा फरकाने निवडणुकांचा निकाल लागला, ५० टक्के-५०टक्के अशा फरकाचे विभाजन जास्त सामान्य आहे ही पहिली गोष्ट. जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार होते अशा वेळी विजेते उमेदवार ४५ टक्क्यापेक्षा कमी मते मिळवून निवडून येण्याची पाच उदाहरणे आहेत ही दुसरी गोष्ट तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत २६ विजेते उमेदवार ५२ टक्क्यापेक्षा कमी मते मिळवू शकले ही तिसरी!
गेली २०० वर्षे अगदी एकतर्फी झालेल्या निवडणुकातसुद्धा ४० टक्के मतदारांनी आणि एरवी त्याहून जास्त मतदारांनी लोकप्रिय विजेत्याविरुद्ध मतदान केले आहे. आणीबाणीची परिस्थिती असताना किंवा विरोधी उमेदवार दुबळा असतानासुद्धा निवडणुकांवर या बाबीचा परिणाम झालेला दिसत नाही. पण १८६० ची अपवादात्मक निवडणूक सोडल्यास[२] अशा दुहीमध्येसुद्धा सरकारला कधीच आव्हान देण्यात आलेले नाही. उलट सततची दुही असूनही असे सरकार जोशात कारभार करू शकलेले आहे.
राजकीयदृष्ट्या उदासीन मतदार
मग या अटीतटीच्या निवडणुका खोलवर रुजलेल्या दुफळीचे लक्षण आहे की हा मतदारांमधील ठोस प्रमाणावर मतदान करायला जाण्याबद्दलच्या उदासीनतेचा परिणाम आहे?
अमेरिकेत निवडणुकीच्या दिवशी सुटी नसते किंवा ही निवडणूक शनिवारी-रविवारीही नसते ही खरेच मोठी गैरसोयीची गोष्ट आहे. कांही मोजक्या राष्ट्रांतच लोकांना निवडणुकीच्या दिवशी अमेरिकन मतदाराप्रमाणे कामावर किंवा शाळा-कॉलेजात जावे लागते. मुलांना शाळेत पोचविणे, स्वतः कामावर जाणे आणि कामावरून घरी परतताना मुलांना शाळांतून घरी आणणे, स्वयंपाक करणे या सर्व व्यापांत मतदान करायच्या कर्तव्याची निकड कांहीशी बोथट होते आणि म्हणून वयस्क, सेवानिवृत्त मतदारच मतदानाबाबत जास्त उत्साही असतात तर तरुण मतदार काहीसे उदासीन असतात. फक्त १८६०[२] मध्ये कडवा दुरावा निर्माण झाला होता त्यावेळी मतदानाचे प्रमाण वाढले होते आणि हिंसाचार उफाळला होता. पण हा एक अपवाद सोडल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकांची परिणती असंतोषात कधीही झालेली नाही. म्हणून कमी मतदानाचे मूळ सर्वत्र पसरलेला दुरावा नसून मतदानाबद्दलचे औदासिन्य असावे. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास मुलांना त्यांच्या शाळातून वेळेवर घरी आणणे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाहून जास्त महत्वाचे आहे असेच बर्‍याच मतदारांना वाटते असावे!
दोन्ही उमेदवारांबद्दल सारखीच पसंती असणे किंवा अध्यक्ष आणि राजकारण या दोन्ही बाबतीत मतदारांना वाटणारी उदासीनता हेसुद्धा कमी मतदानाचे आणखी एक कारण असू शकते. ओबामा आणि रॉम्नी हे दोघे जितके जनतेला दाखवितात तितके ते मतदारांना वेगळे वाटत नसावेत आणि कुणीही निवडून आला तरी सारखेचअसे या मतदारांना वाटत असावे म्हणून ते ते मतदान करायलाच जात नसावेत हीसुद्धा शक्यता आहे. अमेरिकेच्या संस्थापक नेत्यांनी बनविलेल्या राज्यघटनेत अध्यक्षपदाला अगदीच दुबळे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या उदासीन असलेले मतदार खास करून अध्यक्षांच्या अधिकारांच्या सीमा जास्त धूर्तपणे ओळखत असावेत!
जेव्हा एकाद्या खूप लोकप्रिय विचारप्रणालीकडे लोकमत झुकते तेव्हा ते त्या विचारप्रणालीला उभारी देते. कधी-कधी राष्ट्रीय आणीबाणीमुळे एकादा पक्ष एका गटाला खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करून या स्वतंत्र मतदारांना आपल्याकडेघाऊकपणे खेचू शकतो. आणीबाणीच्या काळात विरुद्ध विचारसरणीबाबत पराकोटीचा खुन्नस व्यक्त करणारे वाक्प्रचार, शब्दप्रयोग बनविले जातात. अशा वेळी ६० टक्क्याइतकी व्यापक अनुकूलता असणार्‍या युती सहजपणे बनू शकतात. पण तरीही ४० टक्के लोकांची मते प्रतिकूल दिसतातच. म्हणजेच ४० टक्के मतदार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या विचारप्रणालीपासून विचलित होत नाहीत. पण २० टक्के मतदारांचे मतपरिवर्तन होत रहाते. असे मतदार कधी एका बाजूने तर कधी दुसर्‍या बाजूने मतदान करतात.
पण असे प्रसंग त्यामानाने क्वचित् येतात. अमेरिकेच्या दृष्टीने फारच क्वचित्. अमेरिकेत सर्वसाधारण निवडणुकात मताधिक्य खूपच कमी असते. उदाहरणार्थ ओबामा-रॉम्नी लढतीत दोन्ही उमेदवारांना अगदी सारखीच मते पडली आहेत. याचे कारण असे आहे की दोन्ही पक्षातले कट्टर सभासद आपल्या पक्षांच्या फारशा कट्टर नसलेल्या मतदारांना धरून ठेवू शकत नाहीत, ते मतदार त्या-त्या पक्षाच्या बाह्य कक्षेतच रहातात आणि त्यामुळे हे २० टक्के स्वतंत्र मतदार स्वतःची मते त्यांच्या-त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या कमी-जास्ती उत्साहानुसार (किंवा उदासीनतेनुसार) देतात. त्यामुळे शेवटी मतांची जंत्री केल्यावर त्यातला फरक अगदीच थोड्या टक्क्यांनी इकडे-तिकडे होतो. विजेत्याला ५५ टक्क्यांपेक्षा कमी मताधिक्य मिळालेल्या निवडणुकात ही उदासीनता मोठ्या प्रमाणावर दिसते. अशा निवडणुकांत केवळ ५ टक्के मतदारांनी आपली बाजू बदलली की ती निवडणूक अतीशय चुरशीची होऊन जाते.
पक्षातल्या या कट्टर ढुढ्ढाचार्यांना जरी प्रत्येक निवडणूक अगदी अर्थपूर्ण वाटत असली तरी प्रसारमाध्यमे आणि समालोचकसुद्धा या निवडणुकांकडे त्या दृष्टिकोनातून पहात नाहीत. बहुतेक सार्‍या निवडणुका फारच थोड्या बाबतीत निर्णायक ठरतात आणि लगेच विसरल्याही जातात. बहुतेक मतदारांच्या बाबतीत असल्या मतभेदाची परिणती जास्त संख्येने मतदान करण्याच्या बाजूने होत नाही. बहुतेकांना 'आली आणखी एक प्रक्षोभाला आणि आवाजाला प्रोत्साहन देणारी पण काहीच साध्य न करू शकणारी वांझ निवडणूक' असेच वाटते व त्यामुळे ते मतदानाच्या बाबतीत उदासीनच रहातात.
पन्नास टक्के मतदार मतदानाचा हक्कच बजावत नाहीत हे त्यांच्या निवडणुकांबद्दलच्या नगण्य मताचे द्योतक आहे. समाजाच्या या गटाला या निवडणुकीच्या निकालाशी काहीच देणे-घेणे नसते. त्यामुळेच मतदानाचे प्रमाण खूप कमी होताना दिसते[३].
पण यावेळी निवडून आलेले अध्यक्ष ओबामा हे एक विचारी अध्यक्ष आहेत आणि ते अमेरिकेला आणि सार्‍या जगाला ऐश्वर्याच्या नव्या उंचीवर घेऊन जातील अशी आपण आशा करूया. या कामात माझ्याप्रमाणेच सगळेच लोक त्यांना नक्कीच सुयश चिंततील.
या लेखातील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची माहिती 'स्ट्राटफोर' या संस्थेच्या जॉर्ज फ्रीडमन यांच्या 'U.S. Presidential Elections in Perspective' या लेखावरून घेतली आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दलची काही माहिती http://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election या दुव्यावरून घेतली आहे.
[१] पहिल्या ९ निवडणुकांत सर्वांत जास्त मते मिळविलेला उमेदवार अध्यक्ष बनत असे व दुसर्‍या क्रमांकावर मते मिळविलेला उमेदवार उपअध्यक्ष बनत असे.
[२] १८६० मध्ये गुलामगिरीच्या प्रश्नावरून अमेरिका अगदी दोन तुकड्यात विभागण्याचा धोका निर्माण झाला होता आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतल्या राज्यांमध्ये निकराचे यादवी युद्धसुद्धा लढले गेले. पण अब्राहम लिंकन यांनी ते युद्ध जिंकून अमेरिकेला दुभंगू दिले नाही.
[३] भारताच्या बाबतीतही परिस्थिती हळू-हळू अशीच होत चालली आहे. भारतीय मतदारांनासुद्धा सारे पक्ष सारखेच कार्यक्षम किंवा सारखेच भ्रष्ट वाटू लागले आहेत. १९७७ सालची इंदिरा गांधींचा पराजय करणारी आणि १९८० मध्ये त्यांना परत प्रचंड बहुमताने विजयी करणारी निवडणूक सोडली तर आज भारतीय मतदारही उदासीन होत चालला आहे व त्यामुळेच युती सरकारांच्या युगाचा भारतात नव्याने उदय झालेला आहे.
हा लेख १५ नोव्हेंबर रोजी ई-सकाळवर प्रकाशित झाला. दुवा आहे:
http://www.esakal.com/esakal/20121115/4778547505914392728.htm

सकाळच्या वाचकांच्या प्रतिक्रिया:
Sudhir Kale (Author) - रविवार, 2 डिसेंबर 2012 - 09:40 AM IST
Mr Jignesh, I refer to "श्री काळे, आपला व्यासंग प्रचंड आहे यात शंका नाही. तरीसुद्धा आपण श्री ओबामा यांच्या बद्दलचेविधान लिहिले होते. रहम मनुएलबद्दल नाही." Just for academic reasons, I wish to have the article in which I had written about my ex-Boss having called Obama as a Chicago thug! My ex-boss and I may differ on issues, but he never called Obama like that. However, he did call Rahm by that adjective. At the most he might have said that the Chicago's Democratic Party "machinery" (with thugs) will steal the election, but never he said anything like that about Obama. Just trying to clear some cobwebs because you also said under the article by Mr Sonawane " वरदान मिळालेले ओबामा की जन्मजात श्रीमंत रोम्नी": "बाकी एक इंडोनेशियाचे एक शहाणे लेखक हार्वर्ड ओबमाना शिकागोतील एक gangstar म्हणाले होते." I think this is really unfair of you! You can reply to me on my personal e-mail ID "sbkay@hotmail.com" or here as per your choice, but do reply.
===============
सुधीर काळे (मूळ लेखाचा लेखक) - बुधवार, 28 नोव्हेंबर 2012 - 08:50 PM IST
विश्वनाथसाहेब, चांगलेच विषयांतर होतेय्! अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक या विषयावरील लेखाला आपण दिलेल्या प्रतिसादातून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे ते कळले नाहीं! कृपया उलगडा करावा! 
===============
Vishwanath - बुधवार, 28 नोव्हेंबर 2012 - 04:59 PM IST
आपला देश म्हणजे स्वर्ग आहे. इतकी विविधता असून सुद्धा आपण सारे टिकून आहोत. राजवाडे यांचे मानवी संस्कृती वरचे ग्रंथ वाचा म्हणजे कळेल कि आपण कसे आहोत. आपली विभागणी होण्यासारखी हजारो कारणे आहेत तरी आपण सारे एक्जीवपणे राहत आहोत. सुमारे वीस वर्ष पूर्वी मी कतार येथील चाळीस हजार पगाराची नोकरी घेतली नाही कारण मला माझे स्वांतत्र्य गमवायचे नव्हते. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही.या माझ्या प्रीय देशात जेवढे आयुष्य व्यतीत करता यईल तेवढे करायचे. 
===============
Sudhir Kale (Author) - मंगळवार, 27 नोव्हेंबर 2012 - 08:23 AM IST
Mr. Shivanchitalz, I haven't come across any reference regarding such expenditures as mentioned by you in my own reading. Could you please give me the links? But I spotted a contradiction in your response. If National Football Association and National Hockey Association are Non-profit organizations, how could they be "making billions" as written by you? Could you please give me the links? Also unless one knows the details about the comedy troupe & objective behind its trip to India, I can't comment on the expenditure of $100,000 spent by US! Could you please give me these details? 
===============
shivanchitalz - सोमवार, 26 नोव्हेंबर 2012 - 06:28 PM IST
sbkay, Washington should and can raise taxes on rich people and bring it to the level that Mr. Buffett is suggesting. However, Washington has the spending problem, not the revenue problem as they make us believe. Do you know that American government paid $100,000 for a comedy troupe to perform in India. Do you know that both National Football Association and National Hockey Association are Non-profit organizations? And we, as taxpayers, pay 91 million dollars to support them when they are making billions.There is enormous fraud, waste and abuse in the system. 
===============
Jignesh - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 09:04 PM IST
श्री काळे, वर्णभेदाचा सगळ्यात जास्त फायदा आतापर्यंत गोर्या लोकांन मिळाला आहे ते काळ्या लोकांना संधी न देऊन. श्री ओबामांचे हेच म्हणणे आहे की संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. आपापल्या वकुबाप्रमाणे कोणी मित्तल बनेल तर कोणी अधिकारी. ओबामांचा विजय हा अमेरिकन समाजातील जी पारंपारिक सत्तास्थाने आहेत जसे श्रीमंत लोक, चर्च, भ्रष्ट राजकारणी त्यांच्यापासून मुक्ती आहे. त्याला गोर्यांवर बाकी लोकांचा विजय समजणे फार सरळधोपट होईल. गोर्या स्त्रियांनी, तरुण गोर्या लोकांनी ओबामा यांना मत दिले. रिपब्लिकन पक्षाला सरसकट वर्णद्वेष्टे समजणे चुकीचे आहे. त्या पक्षातपण मध्यममार्गी बरेच आहेत पण सध्या तो पक्ष कर्मठ लोकांनी ताब्यात घेतला आहे. जोन बेनर स्वत मध्यममार्गी आहेत पण कर्मठ लोक त्यांचेच ऐकत नाहीत. 
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 02:49 PM IST
मी लक्ष्मी मित्तल यांच्याबरोबर ६ वर्षे जवळून काम केलेले आहे, त्यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिली आहे. आम्ही बरेच भारतीय अधिकारी रोज एका टेबलावर दुपारचे जेवणही घेत असू. तसेच एकमेकांच्या घरीही वेळोवेळी गेलेलो आहे. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल मला माहिती नसेल तर कुणाला असेल? ते एक किरकोळ कारखानदार होते त्याचे आज "पोलादसम्राट" झाले ते अगदी माझ्यासमोर! थोडे-फार माझ्या मदतीनेसुद्धा. त्यांनी भ्रष्टाचार केला कीं नाहीं हे मला माहीत नाहीं पण त्यांच्या यशात त्यांचे कुशाग्र बुद्धिचातुर्य आणि धडाडी हेच मुख्य घटक आहेत हे मात्र खरे! नशीबानेही थोडी-फार साथ नक्कीच दिली. पण मुख्य घटक आहेत बुद्धिचातुर्य आणि धडाडी हे नक्की. सुहार्तोसुद्धा जनतेत लोकप्रिय होते, जनता त्यांचा आदरही करत असे. त्यांनी जर शेवटची निवडणूक लढवली नसती तर ते हिरो ठरले असते. पण नियतीच्या मनात कांहीं दुसरेच होते.
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 02:35 PM IST
जिग्नेश-जी, मग काय मतभेद उरले? मी स्वत: हेच म्हणत आलेलो आहे कीं रिपब्लिकन पक्षाचे बहुतेक सर्व प्रतिनिधी आणि सिनेटर विशेषत: अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे रिपब्लिकन सभापती जॉन बेनर हे पक्के वर्णद्वेष्टे आहेत आणि ओबामा कृष्णवर्णीय असल्यामुळेच हा पक्ष आणि बेनर त्यांना राज्यकारभारच करू देत नाहीं आहेत. पण याउलट गोरे लोक म्हणतात (यात माझा भूतपूर्व बॉसही आला) कीं वर्णभेदाचा सगळ्यात जास्त फायदा झाला तो ओबामांना. आणि ओबामांच्या पाठीराख्यांचे विश्लेषण केल्यास ते खरेही आहे कारण त्यांना अल्पसंख्यांकांची मते भरपूर मिळाली आहेत (कृष्णवर्णियांची ९३ टक्के, लॅटिन मतदारांची ७१ टक्के व आशियाई अमेरिकनांची ७३ टक्के). पण म्हणून बेनरसारखे लोक त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमांना यशस्वी होऊ देवू इच्छित नाहींत. म्हणूनच मी लिहिले आहे कीं २०१४मध्ये प्रतिनिधीगृहात बहुमत मिळाले आणि सिनेटमध्ये ६० पेक्षा जास्त प्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडून आले तरच ओबामांच्या कल्पनांना मूर्तस्वरूप येईल. 
===============
Jignesh - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 01:47 AM IST
श्री काळे, मी आपणास वर्णद्वेष्टा,जात्यंध म्हणालो नाही. श्री ओबामांच्या धोरणाचा किंवा विचारांचा विरोध असू शकतो. मी त्यांचा समर्थक असूनसुद्धा त्यांच्या काही निर्णयांचा आणि धोरणांचा विरोध करतो. पण अमेरिकेत ओबामांना जो विरोध होतो तो बराच वर्णद्वेष् आधारित आहे. हे आपण त्यांना जी मते पडली त्याचे विशेल्षण केले तर लगेच कळेल. जी गोरी मते त्यांना मिळाली ती बहुतेक बिल क्लिंटन यांच्या मूळे. केवळ 25% गोर्या पुरुषांनी त्यांना मत दिले. छोटे बुश यांच्या कारकिर्दीत सर्व उच्चभ्रू लोकांनी येथेच्छ हादडले. पण भारतात आपण घरचे भांडण रस्त्यावर नेतो अमेरिकेत तसे करता येत नाही.
===============
Yogesh Pingle, Pune - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 11:01 PM IST
लेखक महोदय, आपण म्हणत आहात कि आपली लोकशाही हि फक्त ६२ वर्षांची असून बाल्यावस्थेत आहे हे काही पटत नाही...या सतत बदलत जाणाऱ्या आणि प्रगत होणाऱ्या जगात आपण असे समर्थन नाही करू शकत..अनेक राष्ट्रे अशी आहेत कि त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये प्रगती केली आहे... आपण मात्र अजून national character building निर्माण नाही करू शकलो. दुसऱ्या मुद्द्यावर मात्र दुमत नाही...ओबामा हे खाच खूप चांगले व्यक्ती आहेत...युद्धां ऐवजी ते पायाभूत सोयी सुविधा यामध्ये गुंतवणूक करण्याची भाषा करतात...पण गेल्या चार वर्षात त्यांना रिपब्लिकन पक्षाने सहकार्य केले नाही... खरच अमेरिकन नागरिकांनी त्यांना निवडून एक ऐतिहासिक संधी वाया घालवली नाही.... मला वाटते कि ते लिंकन, रूझवेल्ट, केनेडी नंतरचे सर्वात चांगले अध्यक्ष आहेत... बाकी तळटीप क्र. २ चा आदर्श एम के गांधीनी घ्यायला हवा होता...तरीहि आपण गांधीना founding father म्हणतो.. 
===============
preeti - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 06:16 PM IST
भ्रष्टाचार करणारे लक्ष्मी मित्तल - कार्यक्षम, इंडोनेशियामधला भ्रष्टाचार - consultancy फी, हजारो माणसे मारणारा सुहार्तो चांगला नेता, त्याने केलेला नरसंहार त्यावेळच्या परिस्थितीला धरूनच. छान स्वसमजूत काढता आपण. खरच स्वताला वाटेल तेच खरे मानणारे असल्यामुळे तुम्ही आयओसी (अण्णांचे पाठीराखे) सदस्य म्हणून शोभाल. 
===============
Sudhir Kale (Author) 3rd attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 03:35 PM IST
मी ओबामांचा पहिल्यापासून प्रशंसक आहे! माझी ’जकार्ता पोस्ट’ आणि”डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचा खालच्या दुव्यांवर! त्यातले Does Obama stand for change? हे पत्र ओबामांनी भारताविरुद्ध विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधातले आहे बाकी सर्वात त्यांची प्रशंसाच आहे. तरी मी वर्णद्वेष्टा, जात्यंध? धन्य! आपलेच मन तपासून पहा, जिग्नेश-जी! Obama & racism in America: www.dawn.com/2008/04/18/letted.htm#2 Obama Nomination: http://www.thejakartapost.com/news/2008/06/14/sms-obama-nomination.html Obama victory: http://www.thejakartapost.com/news/2008/11/06/letter-obama-victory.html Obama’s victory is historic: http://www.thejakartapost.com/news/2009/01/28/obama039s-victory-historic.html Obama makes Israel uncomfortable: http://www.thejakartapost.com/news/2009/06/18/letters-obama-makes-israel-uncomfortable.html Does Obama stand for change?: http://www.thejakartapost.com/news/2009/07/30/letters-does-obama-stand-change.html Obama 2.0: http://www.thejakartapost.com/news/2012/11/10/your-letters-obama-2-.html 
===============
Sudhir Kale (Author) 4th attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 03:33 PM IST
Dear Mr Risbud, I suggest you to read a book "Being Indian" by Mr Pavan Kumar Verma, our current ambassador in Bhutan. It discusses why we are corrupt, why we committed treason (and still do), why democracy succeeded in India, etc. It is a painful experience but takes you to instant adulthood. It holds a mirror in front of the reader. Pl do read it. We get a government we deserve. I also was enamoured by military dictatorship, but not anymore. If you see history of dictatorships in the world, you will conclude that none did any good. There is nothing like 'benevolent' or 'temporary' dictatorship. 
===============
सुधीर काळे (या लेखाचा लेखक) (दुसरा प्रयत्न!) - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 01:31 PM IST
प्रीतीताई, माझे चीनवरचे दोन लेख वाचले नाहींत वाटते. तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेला खालील लेखही http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17151620.cms इथे वाचा. (प्रशस्त वाटत असेल तर) आपला ई-मेल मला माझ्या sbkay@hotmail.com या पत्त्यावर कळवा म्हणजे मी माझे सगळेच लेख तुम्हाला पाठवून देईन. सुहार्तोसाहेबांनी इंडोनेशियाची अजीबात वाट लावली नाहीं. माया केली असेल पण या देशाला खूप प्रगतीवर नेऊन बसविले. आजही लोक त्यांच्या काळच्या गुन्हेगारीरहित परिस्थितीची इथल्या इंडोनेशियन भाषेतील वाहिन्यावर स्तुती करतात. त्यांच्याकडून नक्कीच नरसंहार झाला पण त्यावेळी परिस्थिती अशी होती कीं तसे केले नसते तर ते स्वत:च मारले गेले असते. असो. यानंतरची तुमची फर्माइश ’ब्राझील’बद्दल असेल असा तर्क करून त्या दिशेला वळत आहे. धन्यवाद. 
===============
Sudhir Kale (Author) 3rd attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 12:46 PM IST
रिसबूडसाहेब, भारतात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत (दीड वर्षांची आणीबाणी वगळता) लोकशाही राबविली गेली हाच अत्यंत अभिमानाचा मुद्दा आहे. परंतु या लोकशाहीने सगळीकडे भ्रष्टाचार माजविला आहे. पण असे फक्त भारतातच झाले आहे असे नाहीं. इतर लोकशाही राजवटींमध्येही असे झाले आहे. निक्सन यांचे उपराष्ट्रपती स्पिरो अॅेग्न्यू हे यांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. लिंडन जॉन्सन आणि डिक चेनी यांच्याबद्दलही खूप कुजबूज होती. इतरत्र चालते म्हणून आपणही भ्रष्ट असावे असे नाहीं, पण अगदी चीनचे मावळते पंतप्रधान वेन ज्याबावसुद्धा त्याला अपवाद नाहींत (इथे वाचा त्याबद्दल http://m.indianexpress.com/news/wen-family-s-hidden-billions/1022617/). भ्रष्टाचाराला आपणच जन्माला घालतो व मग तो आपल्या छाताडावर बसतो! एक भ्रष्टाचार सोडला तर आपली लोकशाही तशी बरी चालली आहे. अनेक भाषा बोलणारे, अने धर्म पाळणारे, अठरापगड जातीचे लोक असूनही ती चालली आहे हेच नवल नाहीं कां? आपल्या देशाने इतक्या अडचणी असूनही नेत्रदीपक प्रगती केलेली आहे यात शंका नाहीं आणि ती पाहून मला वाटू लागले आहे कीं देव नक्कीच आहे आणि तोच आपला देश चालवितो आहे!
===============
Preeti - मंगळवार, 20 नोव्हेंबर 2012 - 06:05 PM IST
काळे साहेब जरा इंडोनेशियाबद्दल सुधा लिहा ना. अमेरिकेची लोकशाही किंवा पाकिस्तानमधली हुकुमशाही ह्यांच्या बद्दल लोक अनभिज्ञ आहेत असा बिलकुल नाही. सुहार्तोने लावलेली इंडोनेशियाची वाट असा लेख लिहिला तरी चालेल. 
===============
Kedar Risbud - मंगळवार, 20 नोव्हेंबर 2012 - 12:57 AM IST
काळेसाहेब, ६२ वर्षांच्या 'लोकशाही'ला मी काही 'बाल्यावस्थे'तली म्हणणार नाही. आणि या ६२ वर्षांत जगातील इतर लोकशाही पद्धतींचा अभ्यास करून त्यावरून काही चांगलं शिकणं वगैरे आहे की नाही? की सदैव आपलं माझंच खरं? (दुसराच शब्दप्रयोग करणार होतो, पण काही 'सोज्ज्वळ' लोक त्याला आक्षेप घेतील. असो.) उलट एकूणच भारतीय 'लोकशाही'ची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. आजचा सडलेला समाज सुधारायला अण्णांची आंदोलनं नाहीत तर मर्यादित ठोकशाहीच हवी. आज गुजरातचा अपवाद वगळता काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून ईशान्य भारतातील राज्यांपर्यंत सर्व सरकारे, बाळासाहेब ठाकरे म्हणत असत त्याप्रमाणे, या ना त्या कारणाने मुन्नीपेक्षाही बदनाम झाली आहेत. 
===============
Sudhir Kale (Author)-2nd attempt - शनिवार, 17 नोव्हेंबर 2012 - 08:11 AM IST
Mr. Vijaykumar, even my own sister and her husband voted early but it is still not widely used option. Also the Republican Administration in their home state (Florida) apparently put a lot of obstacles in the way as most of the early voters are low-income blue collar, African-American or Latino voters known for their preference for Obama. Though not 100% sure and so I stand corrected, but my own impression is that "early voting" a relatively new phenomenon in USA and has yet to reach all levels of electorate, particularly less educated. This is also the opinion of Stratfor author, but I got a personal input from my own US relatives that early voting is quite a new procedure. Another close relative of mine also voted on the day of voting. [Thanks to "Sandy", it was a holiday this year in his state.] 
===============
Sudhir Kale (Author) - शनिवार, 17 नोव्हेंबर 2012 - 08:07 AM IST
रिसबुडसाहेब, १०० टक्के सहमत! पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. २६ जानेवारी १९५० साली जन्मलेली आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे. फक्त ६२ वर्षे वयाची! अमेरिकेची आहे २००+ वर्षे वयाची आणि इंग्लंडची तर शेकडो वर्षे जुनी! तेंव्हां आपल्यालाही जरा वेळ हवाच. फक्त काळजीची गोष्ट इतकीच कीं आपण पुढे चाललो आहोत कीं मागे हेच कळेनासे झाले आहे. म्हणूनच मी अण्णा हजारे यांच्या चळवळीचे समर्थन करतो. आपला समाज किडत चालला आहे त्याला सुधारायला असेच स्वच्छ नेते हवेत! 
===============
Kedar Risbud - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 08:01 PM IST
एवढी मोठी निवडणूक अमेरिकेत दर चार वर्षांनी होते, पण 'जनसामान्यांचे लाडके नेते माननीय अमुकअमुक' किंवा 'सर्वसामान्यांचे लोकप्रिय प्रतिनिधी माननीय तमुकतमुक' वगैरेंच्या दंतपंक्ती दाखवणा-या पोस्टर्सनी विद्रुप केलेल्या भिंती, त्यांचे ५०-१०० फूट उंचीचे राक्षसांसारखे अंगावर येणारे cutouts हे प्रकार नाहीत. उलट निवडणुक झाल्यावर विशिष्ट कालावधीनंतरही ज्या उमेदवारांची लहानलहान पोस्टर्सही सार्वजनिक जागांमधून काढली जात नाहीत त्या उमेदवारांकडून दंड आकारण्याची स्थानिक सरकारी व्यवस्थापनांना कायदेशीर मुभा आहे. या लेखासोबतचे फोटो पहा. उमेदवार किंवा विजेता कोणत्याही पक्षाचा असो, अमेरिकेच्या ध्वजाखेरीज इतर कोणताही ध्वज फोटोत नाही. याला म्हणतात राष्ट्रप्रेम. 
===============
Jignesh - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 07:24 PM IST
श्री काळे, आपला व्यासंग प्रचंड आहे यात शंका नाही. तरीसुद्धा आपण श्री ओबामा यांच्या बद्दलचे विधान लिहिले होते. रहम मनुएलबद्दल नाही. तुम्ही डेली वरिष्ठ बद्दल लिहिले ते खरे आहे. पण तो जुना इतिहास आहे. त्यावेळी उघड नव नाझी परेड शिकागोच्या रस्त्यावर चालत आणि KKK यांची दहशत काळ्या वस्त्यांवर असे. आज काळ बदलला आहे. गुंड आज रिपब्लिकन पक्षात आहेत पैशाचा माज आलेले. आपण केवळ गोरे आहोत म्हणून महान आहोत असे वाटणारे लोक पराभवानंतर दिल मे दर्द लेके चुपचाप बैठे है. जसे भारतात आपण केवळ ब्राम्हण आहोत म्हणून बुद्धिवान आहोत असे समजणारे बरेच आहेत. IQ १०० च्या कमी असला तरी. 
===============
Sudhir Kale (Author) - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 04:36 PM IST
Jignesh-ji, he had called the current mayor of Chicago Mr Rahm Emanuel (incidentally the first Jewish mayor) as thug. Mayor Daley (1955 to 1976) was known for shrewd party politics and was a stereotypical machine politician, and his Chicago Democratic Machine, based on control of thousands of patronage positions, was instrumental in bringing a narrow 8,000 vote victory in Illinois for John F. Kennedy in 1960. A PBS documentary entitled "Daley" explained that Mayor Daley and JFK potentially stole the 1960 election by stuffing ballot boxes and rigging the vote in Chicago. In addition, it reveals, Daley withheld many votes from certain wards when the race seemed close. May be his opinion is based on this event! (You can read more on http://en.wikipedia.org/wiki/Richard_J._Daley) 
===============
vijaykumar - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 09:54 AM IST
नोंदणी केलेल्या मतदारांना मतपत्रिका २ आठवडे आधीच पोस्टाने येते, मी माझे मत नेहमी पोस्टाने पाठवतो आणि ह्या वेळेसही माझे मत आधीच पाठवून दिले होते. प्रत्यक्ष जावून तुम्हाला मत द्यावे लागत नाही त्यामुळे लेखकाचा मुद्दा अयोग्य वाटतो. 
===============
sbkay@hotmail.com - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 08:22 PM IST
shivanchitalz-ji, good point. But the only answer is what Warren Buffet said. He pays just 11% tax on his income & says he is embarrassed by that. In India, it is common to pay 30% tax in that bracket. Only taxing the 'filthy rich' can solve this problem. I think Obama is on the right track. 
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 06:51 PM IST
Jignesh-ji, why your response has nothing to do with the subject of my article? 
===============
shivanchital@hotmail.com - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 06:00 PM IST
People are against Obamacare mainly because they don't like him. However, American health care system is running on empty. They don't have any funds to sustain these programs. They will go bankrupt if they don't act. Most of the American people don't know what's in the Obamacare bill. It has several provisions that might create enormous debt and bankrupt the country. Every year 100 billion dollars are wasted in the Medicare program. That will show you how bad the system is. Also, people are living longer, and that puts enormous burden on the system.Any citizen at age 65, pays approx. $120,000 through taxes in Medicare, and uses approx. $350,000. All this can't continue..... 
===============
Jignesh - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 05:53 PM IST
श्री काळे, आपण आपल्या भूतपूर्व अमेरिकन बॉसचा हवाला देऊन श्री ओबामा यांना एक शिकागोचा गुंड असे संबोधित केले होते. अमेरिकेत gangster हा साधारण काळ्या लोकांना हिणवण्याचा शब्द आहे. तेसेही आपली संघीय विचारसरणी white supremacy सारखी आहे. धार्मिक कडवेपणा अमेरिकी कर्मठ लोकांचा सारखाच. फक्त फरक संख्या बलाचा आहे. भारतात लोकशाही असेपर्यंत संघ काही करू शकत नाही. अमेरिकेत मात्र अति सावध राहणे भाग आहे. बाकी काना मागून आले, आमची मजा संपली वगैरे रडणे सारखे.