Monday 13 June 2011

नवाज शरीफ यांचे समंजस उदगार!

नवाज शरीफ यांचे समंजस उदगार!
सुधीर काळे (sbkay@hotmail.com) जकार्ता.
Tuesday, May 24, 2011 AT 02:05 PM (IST)
Tags: pailteer, Sudhir Kale, jakarta

गेल्या आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज' या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे', असे उदगार काढले. ते पुढे म्हणाले, कीं पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल, तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे.
काही वर्षांपूर्वी याच नवाज शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण देऊन भारत-पाक मैत्रीचे पहिले पाऊल म्हणून 'लाहोर-दिल्ली बस सेवा' सुरू केली होती.*1) वाजपेयींचे स्वागत करण्यासाठी ते लाहोरला आले होते. त्यांचे हे उदगार फारच महत्त्वाचे आहेत. शरीफ यांना पाकिस्तानी जनतेला त्यांचे हे म्हणणे पटवून देण्यात आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी मनोवृत्तीत बदल करण्यात ज्या दिवशी यश येईल, तो दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाईल यात शंका नाहीं. भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे, हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील असेच सर्व भारतीयांना वाटेल.
अशा धीट आणि लोकमताच्या सद्यप्रवाहाविरुद्ध भासणार्‍या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याचे आणि मुत्सद्दीपणाचे (Statesmanship) मला खरोखरच कौतुक वाटते. या भावनेने जर मूळ धरले, तर ही एक परस्परसहकार्याची मुहूर्तमेढच ठरेल. भारताने जरी मैत्रीचा हात नेहमीच पुढे केलेला असला, तरी दोन्ही देशांत कांहीं अंशी अविश्वासाची भावना आहे. (हल्ली त्यासाठी Trust deficit हा फॅशनेबल शब्द वापरण्यात येतो!) तिला ओलांडून पाकिस्तान आपलाही मैत्रीच हात पुढे करेल काय? मला आशा वाटते, कीं सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलेला पाकिस्तान भारताच्या सद्यपरिस्थितीवरून योग्य तो बोध घेऊन असे पाऊल उचलेल.
भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची सवय सोडावी लागेल! आजपर्यंत पाकिस्तानला करावा लागणारा खर्च कधीच स्वकष्टाने कमवावा लागलेला नाहीं. मग तो खर्च लष्करी सामुग्रीवरचा खर्च असो, आपल्या देशातील मूलभूत सोयी (infrastructure) असोत किंवा भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत! पाकिस्तानने कर्ज जरूर काढावे व ते करारानुसार परतही करावे, पण फुकटची मदत घेऊ नये! कारण फुकटच्या मदतीबरोबर देशाच्या सार्वभौमत्वावर अनेक दबाव येतात व एक तर्‍हेचा मिंधेपणा येतो. तो कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे.
पाकिस्तानतही काही लोक भारतीयांप्रमाणेच कल्पक, मेहनती आणि कुशल आहेत. शिवाय आपण कित्येक बाबतीत सारखे आहोत. चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी, अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत. ज्या दिवशी देश या नात्याने पकिस्तान (आणि पाकिस्तानी जनता) कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या पायांवर उभे रहाण्याचा निर्णय घेतील, त्या दिवसापासून तेही आपल्यासारखेच यशस्वी होऊ लागतील.
भारताने टाकलेल्या एका अनुकरणीय पावलाचे उदाहरण मला इथे द्यावेसे वाटते. १९९१ मध्ये भारतालाही एका अत्यंत कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. भारताकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी संपली होती. रोजच्या गरजा भागविण्याचीही भ्रांत पडली होती. अशा परिस्थितीत भारताला आपल्याजवळचे तारण म्हणून बाळगलेले सोने हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा करायची नामुष्की सहन करावी लागली होती. तरीही भारताने मोफत मदतीचा स्वीकार न करता सोने पाठविण्याचे पाऊल उचलले. पाठोपाठ नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक धोरणात अमूलाग्र व क्रांतिकारक बदल घडवून आणला व भारताला प्रगतीपथावर आणून उभे केले. अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे. पाकिस्तानही भारताच्या अशा धोरणांचे अनुकरण करेल व स्वतःला प्रगतीपथावर घेऊन जाईल. 'डॉन' व 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या सारख्या वृत्तपत्रातील वाचकांच्या प्रतिसादांचा मागोवा घेतल्यास, आज पाकिस्तानची जनता अमेरिकेची मदत नाकारून तिच्याबरोबरचे गुलामीसदृष संबंध तोडून पाकिस्तानने स्वत:च्या पायावर उभे राहावे, अशा मताचे असल्याचे आढळून येईल.
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं. याबाबतचा जो गैरसमज पाकिस्तानी जनतेच्या मनात आहे, तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. सध्या चालू असलेल्या पंचायतीच्या निवडणुकीत गिलानीसारख्या फुटीरवाद्यांच्या चिथावणीला धिक्कारून ७०-८० टक्क्यांच्या प्रचंड प्रमाणात मतदान करून जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्या मनाचा कौलही दिला आहे. असेच दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच भरघोस मतदान झाले होते. पाकिस्तानला सद्यपरिस्थितीची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे. पोलाद गरम असतानाच आपल्याला हव्या असलेल्या वस्तूला ’घडवून’ योग्य तो आकार आपण दिला पाहिजे.
पाकिस्तानात काय पद्धतीची ’हवा’ चालू आहे, तेथील विचारवंत कसा विचार करत आहेत हे वाचणे मनोरंजक ठरेल. माझ्या आधीच्या लेखात मी अनेक दुवे दिले होते. खाली दिलेला दुवा वापरून वाचकांना डॉ. तारीक रहमान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचता येईल. माझ्या मते प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हा लेख वाचला पाहिजे.
आता पाकिस्तान-चीन मैत्रीकडे वळूया. गिलानी या मैत्रीला ’सदाबहार’ मैत्री म्हणतात. चीनहून निघता-निघता गिलानींनी तिचा ’निरंतर मैत्री’ असाही उल्लेख केला. चिनी लोक निमंत्रणाला मान देऊन एकाद्या देशात आले कीं ते त्या देशात ’निरंतरपणे’ ठिय्या मारतात. खरे तर त्यांना यासाठी निमंत्रणही लागत नाहीं. हा अनुभव आपल्याला अक्साईचिनबाबतीत आलेलाच आहे. माझ्या मते 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या कालबाह्य प्रणालीवर आधारलेले चीनचे हे धोरण कधीच यशस्वी होणार नाहीं. आपण बांगलादेशातून आपले सैन्य बाहेर काढून सत्ता मुजीबुर रहमान यांना बहाल केली हे पाकिस्तानने विसरू नये. या उलट तिबेटवरची आणखीच घट्ट आवळलेली मगरमिठी चीनच्या ’निरंतन मैत्री’चे प्रतीक आहे हेही पाकिस्तानने विसरू नये. आपला मित्र नीट पारखून निवडावा. सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं असे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.
*1) पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या 'कारगिल' मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती, पाठीत वार करू पाहाणारे मुशर्रफ हीच! पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे अध्यक्षामध्ये (President) रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!)

------------------------------------
प्रतिक्रिया
On 09/06/2011 10:21 AM hemant said:
मी गेली १० वर्ष अमेरिकेत राहतो....त्यामुळे बरायचं गोष्टी आगदी जवळून पहिली व अनुभवल्या सुधा...मला असं वाटत कि लोकांनी अमेरिकेला इतका डोक्यावर घ्येनाची कांही कारण नाही...ज्या लोकांना किंवा राष्ट्राला स्वाभिमान नाही त्या लोकांची प्रगती कासवाच्या चालीने होते...

On 05/06/2011 12:00 PM POPATRAO BALU SADGIR said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले.

On 03/06/2011 10:23 AM sanjay said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले. सुरेश काळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख दिला आहे आणि वाचकांनी देखील तो वाचून योग्य प्रतिक्रिया व्यक्त केल्यात , असेच लेखन अनेक समस्या सोडविण्यास योग्य ठरते व ठरेल, प्रामुख्याने आपल्याकडील सामाजिक स्तर व आता असलेल्या अनेक अंतर्गत मुलभूत व पायाभूत समस्या सुधारण्यासाठी असे लेखक व विचारवंत आणि त्यांचे सर्वंकष विचारच उपयोगी ठरतील याची दाखल घेतली जावी.

On 03/06/2011 12:17 AM Sudhir Kale said:
भा-४: फाळणीनंतर उरलेला आपला आजचा भारत शांततेने चालत आहे तसा चालला असता कां हा "आत्याबाईंच्या मिशा"सारखा काल्पनिक प्रश्न नाही तर अस्सल प्रश्न आहे. पण शेजारी म्हणून युद्धखोर पाकिस्तानपेक्षा शांततेने वागणारा पाकिस्तान आपण स्वार्थापोटी निर्मिलाच पाहिजे! पहा विचार करून पटते का! आणि आपण थेट पाठिंबा दिल्यास शरीफ नक्कीच पहिल्या कांहीं निवडणुका हरतील. तेंव्हां त्यांना पाठिंबाही मुत्सद्दीपणे द्यावा लागेल! (धंद्याच्या बाबतीत शरीफ आणि मी एकाच पोलाद धंद्यातले! शरीफ यांचा एक भाऊ मला भेटून गेलेला आहे!) समाप्त

On 03/06/2011 12:13 AM Sudhir Kale said:
भा-३: पण फाळणी किती पाकिस्तान्यांना मान्य होती व आजही आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यात मला प्राविण्य नाहीं पण असा सूर ऐकायला मिळतो, मीही ऐकलेला आहे. आज सुदानचे (मुस्लिम) उत्तर सुदान व (ख्रिश्चन) दक्षिण सुदान असे मताच्या पेटीद्वारा विभाजनही झालेले आहे. त्यादृष्टीने भारताचे विभाजन आपल्याला लाभप्रदच झालेले आहे. जरा विचार कारा! आज जर भारत एकसंध असता तर पाकिस्तानसारखीच आपलीही धर्मांधतेने वाट लागली नसती कां? फाळणीनंतर उरलेला आपला आजचा भारत शांततेने चालत आहे तसा चालला असता कां? (भा-४ पहा)

On 03/06/2011 12:09 AM Sudhir Kale said:
भा-२ त्यांच्यावर दोन्ही हातांनी पैसे उधळणार्‍या अमेरिकेची आर्थिक परिस्थितीही दिवाळखोरीत निघाली नसली तरी त्यांच्या डोक्यावरच्या कर्जाच्या आकड्यातील शून्ये मोजताना चक्करच येते. आज ना उद्या अमेरिकेला आपला हात आखडता घ्यावाच लागेल व हे स्वत: एक पोलाद कारखानदार असलेल्या व पैशाचा व्यवहार समजणार्‍या शरीफना कुणी समजावून सांगायची गरज नाहीं! आज पूर्व जर्मनीवर फाळणी लादली गेली होती, त्यांना ते पसंत नव्हते वगैरे विक्रांत यांचे मुद्दे वाचले. पण फाळणी किती पाकिस्तान्यांना मान्य होती व आजही आहे? (भा-३ पहा)

On 03/06/2011 12:01 AM Sudhir Kale said:
भा-१ विक्रांत-जी , सर्वप्रथम मी स्पष्ट करतो कीं मी एक स्वागतार्ह घटना म्हणून शरीफ यांच्या उद्गारांचा उल्लेख केला. शरीफ हे मूलत: सैन्याच्या पाठिंब्याने IJI या पक्षातर्फे निवडणूक लढले होते (व हरले होते) हे मला चांगले आठवते व तसा उल्लेख 'न्यूक्लियर डिसेप्शन’मध्येही ठळकपणे आहे. आपण जी रशिया/अमेरिका, पूर्व/पश्चिम जर्मनी यांची उदाहरणे दिली आहेत.ती "पैशाचे सोंग आणता न ये" या मराठी म्हणीची सत्यता पटवतात. दिवाळे निघालेल्या रशिया, पूर्व जर्मनी या देशांसारखीच आज पाकिस्तानची हालत आहे. (भा-२ पहा)

On 02/06/2011 07:05 PM Hindustani.... said:
पाकिस्तानशी मैत्री करणं म्हणजे फना काढलेल्या सापापुढे हात पुढे करणे आहे...तो चावणारच..ज्या देशाची स्थापना भारत द्वेषावर झालेली आहे..त्याच्याकडे कसली करताय मैत्रीची अपेक्षा...तुम्हाला विचार मांडायला काय..सीमेवर गोळ्या खाणार्या सैनिकांना विचारा..

On 02/06/2011 10:16 AM vikrant,chicago said:
भाग २.. व्यक्त केली होती. अमेरिका आणि सोविएत मधील शीतयुद्ध कधी संपेल असे वाटले नाही, पण हे झाले. ह्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होवू शकतीलही. आणि त्यामुळेच काळे साहेबांच्या मताबद्दल तथ्य वाटते. पण माझ्या मते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न,इस्रायेल आणि पालेस्तीन सीमा प्रश्न आणि काश्मीर प्रश्न हे हि प्रतिक्रिया वाचणार्या कोणत्याही वाचकाच्या हयातीत सुटणार नाहीत. हे प्रश्न चिघळत ठेवण्यात दुर्दैवाने बर्याच स्वार्थी लोकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.

On 02/06/2011 10:02 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब ह्या विषयातले तज्ञ आहेत आणि त्यांच्या मताचा आदर आहे. परंतु पूर्व आणि पश्चिम जर्मनी ह्या देशातील लोकांमाद्ध्ये धर्म, जात अशा भावना भडकवणार्या गोष्टी नव्हत्या. दोन्ही देशातील आम जनतेला हे विभाजन पसंत नव्हते आणि ते त्यांच्यावर लादले गेले म्हणून नेहमीच खंत होती. बर्लिन भिंत असताना मी दोन्ही जर्मनीला भेट दिली होती आणि तेथील नागरिकांशी सहज चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. पश्चिम जर्मनीतल्या लोकांना उघडपणे ह्या भिंतीची चीड होती तर पूर्व जर्मनीतील लोकांनी घाबरत खाजगीत ह्याबद्दल नाराजी ..2

On 01/06/2011 09:49 PM योगेश जोशी - बेंगळूरू (Bangalore) said:
सुधीरजी आपला लेख आवडला आणि त्यावरील आपल्या प्रतिक्रियाही. परंतु विभाजित जर्मनी आणि भारत-पाकिस्तान यांची तुलना खरच करता येईल? ज्या युरोप खंडात दोन जर्मन राष्ट्र एकत्र आली त्याच दरम्यान इतर काही राष्ट्र विभाजितही झाली. तसेच दोन कोरियन राष्ट्र आजूनही एकत्र झाली नाहीत.

On 01/06/2011 07:33 AM Sudhir Kale said:
पिनाकिन यांच्या प्रतिसादाचे आधीचे भाग गहाळ झालेला दिसत आहेत.

On 31/05/2011 08:21 PM Pinakin said:
...नकळत आपल्या विरोधात जात आहे. मुळात म्हणजे अमेरिकेशी तोंडदेखले संबंध ठेवणे आणि चीन, रशिया यांचाशी उत्तम संबंध ठेवणे हेच आपल्या फायद्याचे आहे(अमेरिकेमुळेच भारताला दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे). चीन मध्ये मोठे दुष्काळी संकट आले आहे. या पावसाळ्यानंतर जमेल तेवढे पाणी साठवून लष्कराच्या मदतीने ते चीन मध्ये नेले पाहिजे.जर एकदा या dragon चा विळखा पडला तर मग तो सोडवणे मात्र खूप कठीण आहे

On 31/05/2011 11:44 AM Sudhir Kale said:
जयंतराव, १) ज्याने 'न्युक्लीयर डिसेप्शन'चे भाषांतर केले आहे त्याला innocent म्हणणे जरासे धार्ष्ट्याचेच होईल! २) पाकिस्तानची जी आज वाट लागली आहे त्यात अमेरिकेशी केलेली फुकटी दोस्तीच कारणीभूत आहे. माझा खालील लेख वाचा! http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.हतं ३) आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जिथे सुरक्षित रहातील अशा राष्ट्राशीच मैत्री करावी. अमेरीकेशीही! पण कुणाचेच मिंधे होऊ नये! ४) फुकट मदत घेऊन परक्याचे युद्ध लढू नये! ५) पाकिस्तानशी मैत्री अपरिहार्य आहे. ती काळाची गरज आहे.

On 31/05/2011 09:02 AM Jayant said:
The author is very innicent. Remenbe Pakistan is no Germany. Grow up. Broaden your horizon. Look beyond Pakistan. You are defined by the friends you keep. Our benchmark should be USA and not Pakistan. (Thank god our young generation is US bound and they dont think about Pakistan)

On 31/05/2011 09:01 AM Sudhir Kale said:
माझ्या जकार्ता पोस्टने प्रकाशित केलेल्या वरील अर्थाच्या पत्राला (http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have-bury-hatchet.html) एका मूळ लाहोरच्या व सध्या जकार्ताचा रहिवासी असलेल्या वाचकाने लिहिलेले उत्तर वाचनीय आहे. जरूर वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/05/31/letter-india-pakistan-should-cooperate.html तसेच माझ्या पत्राखाली वाचकांनी दिलेले on-line प्रतिसादही वाचनीय आहेत. Janjua पाकिस्तानी राजदूतावासातला असावेत असे त्याच्या आधीच्या लिखाणावरून वाटते.

On 30/05/2011 08:01 PM Sudhir Kale said:
माझा दुसरा भाग पुन्हा लिहित आहे: आज जर्मनीच्या चेन्सलर असलेल्या आंगेला मेर्केल या मूळ पूर्व जर्मनीच्या आहेत. याला "कालाय तस्मै नम:"च म्हटले पाहिजे. मी भारत-पाकच्या एकीकरणाबद्दल बोलत नसून त्यांनी केवळ चांगले शेजारी म्हणून राहावे एवढेच म्हणत आहे. शिमला करारात एक अलिखित कलम होते कीं आजची LoC ही आंतरराष्ट्रीय सीमा मानावी व दोन्ही देशांनी एकमेकांना त्रास न देता शांतीने जगावे. हे कलम लेखी करायला भुत्तो तयार नव्हते कारण ते निवडणूक हरले असते. पण हे सांगायला आज ते, इंदिरा-जी वा बेनझीर जिवंत नाहींत.

On 30/05/2011 04:20 PM fattesingh gaikwad said:
कालेसाहेब, आपला शरीफ यांचे भारत पाक मैत्री विषयी चा लेख सध्या अशक्य वाटत आसला तरी भविष्यात आसे घडणार नाही असे छाती ठोक पणे म्हणता हि येणार नाही. एक जिना मुळे पाकिस्तानची निर्मिती hou शकते तर एस शरीफ मुळे दोस्ती का घडू शकत नाही? कोणत्या माता-पित्याला आपला तरुण मुलगा लढाईत मृत झालेला आवडतो ? चीन मुस्लीम देश नाही तरी आपले त्याच्याशी वैर आहे, नेपाल हिंदू राष्ट्र असून आपल्याला ते पाण्यात पाहते मग पाकिस्तान्सी i मैत्री का होणार नाही. चला आशा करूया शरीफ लवकर राष्ट्राध्याक्ष्या होवोत.

On 28/05/2011 04:59 PM Yogesh said:
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं...हे जरी खरा असला तरी त्याचबरोबर जो मुलूख खरोखर भारताचाआहे त्या मुलुखाची अभिलाषा पाकिस्तानने नेहेमीच धरली आहे...त्याचे काय?आपले जे आओ बच्चो गाणे आहे त्याची कॉपी youtube वर आहे आणि त्यात काश्मीर मिळवायचा आहे असा संदेश आहे...तो बदलला पाहिजे..भारत पाकिस्तान यांच्यातला वाद मिटला तर दोन्ही देशांची प्रगती होईल.पण आपल्या राजकारण्यांच्या हातातल्या डील्स आणि कमिशन जाईल त्याचे काय?आणि अमेरिका,चीन या देशांना खूप नुकसान होईल ना!!!

On 27/05/2011 06:50 PM Sudhir Kale said:
मी एक सत्य घटना सांगतो! १९८८ साली मी हाम्बुर्गला एका माझ्या जर्मन मित्राला विचारले कीं दोन जर्मनी कधी तरी एका होतील काय? (माझ्या वयाच्या लोकांना त्यांच्यातील जुना खुन्नस माहीत असेलच.) माझ्या मित्राने सांगितले कीं माझ्या हयातीत तरी नाहीं कारण आम्ही भोगवादी (materialistic) आहोत तर ते तत्ववादी (dogmatic) आहेत! पुढच्या वेळी आम्ही भेटलो तेंव्हां मी बोलायच्या आधीच तो म्हणाला, "ज्या वेगाने आम्ही एकत्र झाक़्लो त्याने मीच थक्क झालो! समझाने वालेको इशारा काफी है! (भाग-२ पहा)

On 27/05/2011 04:58 AM asmita said:
अभ्यासपूर्ण लेख आहे . पण साध्या भारत पाक क्रिकेट मध्ये सुधा प्रेक्षक इतकी खुन्नस धरतात, इतकी दुष्मनी मनात भरलेली असते . मग तुम्हाला खरच अस वाटत कि हि दुष्मनी संपेन , मनातील कटुता जाईन? हा भाबडा आशावाद नाहीये का ? आम्ही भारतीय असा प्रयत्न तरी करू, पण पाकिस्थानातील जनता अस करू शकेन?

On 26/05/2011 03:26 PM jay said:
लेख सुंदर आहे पण लेखकाचा भाबडेपणा जाणवतो ... पाकिस्तान हा विषय इतका सरळ सोपा नाही... :(

On 26/05/2011 09:58 AM Sudhir Kale said:
In this context, I really admired the courage & statesmanship of out-of-power Nawaz Sharif who urged Pakistani people to stop considering India as their biggest enemy & re-appraise Indo-Pak relations to improve growth. Thus the role of Pakistani intelligentsia like you would be crucial in changing the mindset of Pakistani people. I have written a letter to Jakarta Post on this subject & I will send you the link if it gets published. Contd. 5

On 26/05/2011 09:57 AM Sudhir Kale said:
"Balanced view" seems to be the hallmark of your writing, going by two articles of yours I have read so far. In this article, you have brought out fickleness in the future development of Sino-Pakistani friendship very well. In the end, I wonder whether Pakistan, now itself a budding democracy, should seek friendship with a Chinese totalitarian regime (with natural affection for Pakistani Military brass) or a genuine democracy across its Eastern border. Contd-4

On 26/05/2011 09:55 AM Sudhir Kale said:
From: "Huma Yusuf" To: "K. B. Kale" Thank you for writing. We were also pleased by Mr. Sharif's statement to boost Indo-Pak ties. I think there is a very slow (almost imperceptible) change in the mind of the establishment on these issues, and we can only hope for the best. Best regards, Huma Yusuf On Tue, May 24, 2011 at 9:01 PM, K. B. Kale wrote: Dear Ms. Huma, I read your latest article "Over the Himalayas" and liked it very much. Really excellent! Contd 3

On 26/05/2011 09:54 AM sudhir Kale said:
डॉनवर ज्या निवडक स्तंभलेखकांचे/लेखिकांचे लेख मी नियमित वाचतो (कारण ते समतोल वाटतात) त्यात हाजरा मुमताज, हुमा युसुफ या लेखिका आणि इर्फान हुसेन हा लेखक हे प्रामुख्याने आहेत व त्यांचा एकादा लेख आवडला तर त्यांना मी लिहितोसुद्धा! त्यातल्या श्रीमती हुमा यांना मी लिहिलेली मेल आणि त्यांचे उत्तर अशा दोन्ही मेल्स मी खाली दिल्या आहेत. दोन्ही वाचनीय आहेत. त्यांनाही मला वाटते तसेच वाटत आहे असे दिसते. काळे

On 25/05/2011 06:52 AM Sudhir Kale said:
मी पत्रकारही नाहीं किंवा 'तज्ञ'हि नाहीं. मी एक इंजिनियर आहे व तुमच्यासारखाच एक वाचक. माझ्या मते "सावधान राहून" दोन्ही बाजूच्या जनतेने/सरकारने आपली मानसिकता बदलायची तयारी ठेवायला हवी. समजा उद्या पाकिस्तान आपण पादाक्रांत केला तर या 'व्याह्याने आणलेल्या घोड्या'ला सांभाळू शकू? नाहीं. तो स्वतंत्रच राहिला पाहिजे पण मित्र असला पाहिजे! असो. मी परदेशी जात आहे. त्यामुळे आतापासून एक आठवडा मी नेटवर येऊ शकणार नाहीं. उत्तर देऊ शकलो नाहीं तरी प्रतिक्रिया देता रहा. संधी मिळाल्याबरोबर मी नक्कीच उत्तरे देईन.

On 25/05/2011 01:12 AM abhay said:
सकाळचे काही वाचक आणि काही लेखक नक्की कशात तज्ञ-अनुभवी आहेत हे मला माहित नाही. पण इथे कोणीही कशावरही लेख व मत लिहु शकतो. आणि सकाळ बिचारे सर्व समावेशक धोरण ठेवून छापते. २५-३० वर्षे पत्रकरिता करणारे अथवा स्तंभ लेखन करणारे सुद्धा ठराविक खास विषयाचा भरपूर व्यासंग-अभ्यास करून त्यावरच सूचक पणे लिहितात. धोरणात्मक विषयवर तर शब्द मोजके असतात. असो. माझी प्रतिक्रिया नाही का छापत. चालू द्या.

On 25/05/2011 12:45 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब, उत्तम लेख! भारताशी हजार वर्षे युद्ध करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री आपल्या हयातीत शक्य नाही. जिथपर्यंत मुशर्रफ सारख्या भारत द्वेषाने पछाडलेल्या लबाड कोल्ह्यांचा पाकिस्तानच्या सैन्यावर पगडा आहे तोपर्यंत ह्याबाबतीत प्रगती शक्य नाही. नवाज शरीफ यांना मात्र ते पंतप्रधान असल्यापासून मनापासून भारताशी मैत्री करायची इच्छा होती आणि मुशर्रफनी त्यांच्या आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर आज चित्र वेगळे असते. पाकिस्तानच्या सैन्यामाद्ध्ये जोपर्यंत भारतद्वेष आहे तोपर्यंत हे होणे नाही.

On 24/05/2011 10:18 PM Amruta said:
माझ्यामते पाकिस्तान हा भारताला कर्करोगासारखा आहे. समूळ उच्चाटनाशिवाय बरा होणे हे कदापि शक्य नाही. शेवटी कुत्राचे शेपूट .....

On 24/05/2011 10:17 PM kishan patil said:
सौ चुहे खाके बिल्ली चाली हाज सावधान शत्रू जेव्हा चागले बोलतो तेव्हा काही तरी कट कारस्थान असते हे विसरून चालणार नाही .

On 24/05/2011 09:22 PM abhay said:
मुळातच अंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण हा गुंतागुंतीचा किचकट विषय. त्यात पाकिस्तान तर शेजारी, शत्रु आणि इस्लामिक. त्यामुळे खूप तोलुन-मापुन आणि अत्यंत अभ्यासपूर्ण -अनुभवयुक्त विचार मांडावे लागतात. त्यातले तज्ञ (बागाईतकर,विजय नाईक, ऐर मार्शल इनामदार, प्रेम झा, श्री शशांक, एस. के. शर्मा, ) देल्ही इथे असलेल्या अनेक अभ्यासु संस्था यांच्याशी नेहमी संपर्कात राहतात. वाचकांच्या प्रतिकिया सारखा साधा विषय नाही.सरळ आणि भावनिक नाहीच नाही.

On 24/05/2011 09:16 PM Suresh said:
काळे साहेब तुमचे लेख खूप अभ्यास पूर्ण असतात. या विषयावर तुमचा व्यासंग मोठा आहे. परंतु पाकिस्तानशी मैत्रीची शक्यता हा तुमच्या लेखाचा विषय तरी कशी बनली याचे मला आश्चर्य वाटते. "पाकिस्तानशी मैत्री" या दिवास्वप्नातून आपण भारतीयांनी बाहेर पडावं असं माझं प्रामाणिक मत आहे. ते कधीही होणे नाही.

On 24/05/2011 08:35 PM aditya said:
लेख खूप छान आहे. पाकिस्तान ने जर आपले हे मत कायम thewale तर भारत आणि पाकिस्तान आणि पर्यायाने संपूर्ण आशिया खंडात शांतता राहील.

On 24/05/2011 08:34 PM PRASHANT said:
सततआ गएलयआननतर शहआनपण कआय कआमआचए ?

On 24/05/2011 08:24 PM swati said:
वाह, खूपच चांगले लेख आहेत आपले. अभ्यासू आणि प्राक्टिकॅल!

On 24/05/2011 07:41 PM YuvraJ Patil said:
लेख मस्त लिहिला आहे. थान्क्स सुधीर....

On 24/05/2011 07:01 PM SHIVRAM VAIDYA said:
....हिंदुस्थान मधील तथाकथित सेकुलर नेते दोघानाही हिंदुस्थान-पाकिस्तान संबंध सुधारलेले नको आहेत. दोन्ही देशांनी आपापसात लढण्यातच त्यांची सत्तेची गणिते लपलेली आहेत. जोपर्यंत हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी सामान्य नागरिक आपापसात संबंध वाढवणार नाहीत तोपर्यंत हे राजकारणी दोन्ही देशात वाद निर्माण करून परिस्थिती कायम चिघळत ठेवतील. त्याला तालिबानी, अल-कायदा आणि इतर मुस्लीम अतिरेकी संघटना खतपाणी घालतील.

On 24/05/2011 07:01 PM SHIVRAM VAIDYA said:
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे हे उद्गार योग्यच आहेत. तथापि पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दोघेही नेहमीच हिंदुस्थान विरुद्ध गरळ ओकून पाकिस्तानी जनतेला गुमराह करत आलेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बस सुरू करून हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधाना नवीन आयाम देण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला होता. परंतू पाकिस्तान मधील सरकारने त्याचा गैर फायदा घेतला. तसेच हिंदुस्थान मधील काँग्रेजी नेत्यांनी वाजपेयी यांची खिल्ली उडवली. खरी मेख ही आहे की पाकिस्तान मधील धर्मवेडे मुस्लीम नेते आणि...1....

On 24/05/2011 06:54 PM D. Patil said:
अति उत्तम लेख! सकाळ वर फारच मोजके लेख असे वाचले.

No comments:

Post a Comment